![]() |
मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने 'स्मार्ट बाजार'ने आपल्या स्टोअर्समध्ये पाच दिवसांसाठी अनेक मजेदार उपक्रमांचे आयोजन केले आहे. या काळात ग्राहकांना खरेदीवर अनेक आकर्षक ऑफर्स दिल्या जाणार आहेत. महिला दिनाच्या निमित्ताने हे उपक्रम ५ ते ९ मार्च या काळात भरविण्यात येतील. यात सेलिब्रिटीही सहभागी होणार आहेत.
स्मार्ट बाजारच्या ९०० हून अधिक स्टोअर्समध्ये याचे आयोजन केले जाईल. वॉर्डरोब खरेदीवर आकर्षक सवलत दिली जाणार आहे.
महिलांच्या कपड्यांवरही आकर्षक सवलत दिली जाणार आहे. खालीलप्रमाणे
ब्युटी एसेंशियल्स, फेस क्रीम, फेस वॉशवर आकर्षक सूट दिली जाणार आहे. हेअर ड्रायर आणि स्ट्रेटनर्स सवलतींच्या किमतीत खरेदी करता येणार आहेत. महिला दिनानिमित्त सॅनिटरी नॅपकिन्स आणि सॅनिटरी पॅड्स यांच्या खरेदीवरही आकर्षक सूट दिली जाणार आहे.