![]() |
केंद्रीय माहिती अधिकारी अधिनियम २००५ नियम क्र. १ (३) अन्वये माहिती अभिलेख मोफत निरीक्षण करण्यासाठी अर्ज
- प्रती,
- दिनांक :- ......./....../२०२५
- श्री. / श्रीमती
- शासकीय राज्य जन माहिती अधिकारी सो,
- यांचे सेवेशी,
- अर्जदारांचे नाव 2-
- अर्जदारांचा पत्ता :-
- ईमेल आईडी :-
- अर्जदारांचे संपर्क क्र./ दुरध्वनी क्र. :-
- विषय :- माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत संदर्भित अभिलेख, दस्तऐवज मोफत निरीक्षण करणेसाठी मिळणेबाबत विनंती अर्ज
- संदर्भ :- महाराष्ट्र शासनाचे सामान्य प्रशासन विभागाचे शासन परिपत्रक क्र. संकिर्ण-२०१८/--प्र.क्र.४५/कार्या-६, दिनांक २६.११.२०१८
सेवामध्ये, सविनय सादर नमस्कार,
मी वरील नमूद अर्जदार वरील विषयान्वये विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो तो की, उपरोक्त संदर्भानुसार महाराष्ट्र शासनाचे परिपत्रकामध्ये
"शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता येण्यासाठी व माहिती अधिकार अधिनियमांतर्गत प्राप्त माहिती अर्जाची. प्रथम व द्वितीय अपीलांची संख्या कमी होण्याच्या दृष्टीने राज्यातील जिल्हा स्तरीय कार्यालयांपासून ते निम्नस्तरीय सर्व कार्यालयात तसेच महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद इत्यादी सर्व कार्यालयात प्रत्येक सोमवारी किंवा सदर दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी दुपारी ३.०० ते ५.०० या वेळेत नागरिकांना, माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत विहित प्रक्रियेनुसार, त्यांच्या मागणीनुसार अभिलेख अवलोकनासाठी उपलब्ध करुन द्यावेत.
२. प्रत्येक कार्यालय प्रमुखांनी स्थानिक परिस्थितीच्या अनुषंगाने आवश्यक दुरुस्तीसह नागरिकांना अभिलेख अवलोकनासाठी उपलब्ध करुन देण्याच्या प्रयोगाची आपापल्या कार्यालयात अंमलबजावणी करावी." असे नमूद करण्यात आले आहे.
तरी त्या वरील नमूद संदर्भीय परिपत्रकानुसार व उपरोक्त विषयानुसार खालील नमूद तपशीलप्रमाणे अभिलेख सोमवार दि. / / २०२५ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत मला अवलोकनासाठी उपलब्ध करून दयावेत. अवलोकन अभिलेख विषय तपशील.....
१)
२)
३)
४)
५)
मला या अभिलेख, दस्तऐवज निरीक्षण, करावयाचे असून, आवश्यक त्या टिपण्या, उतारे घेण्यासाठी किंवा प्रमाणित प्रती घेणेसाठी मला निरीक्षणासाठी मोफत उपलब्ध करून दयावेत. माहिती अभिलेख दस्तऐवज निरीक्षण करणेस शासनाने ठरून दिलेले वेळपेक्षा जास्त वेळ लागल्यास पुढील प्रत्येक १५ मिनिटांस ५ रू. प्रमाणे शुल्क भरणेस मी तयार आहे.
- धन्यवाद
- कळावे.
- अर्जदार
- सही
- नाव
अन्याय सहन का?? करायचा
खालील माहिती देखील वाचा :
- माहितीचा अधिकार अर्ज ग्रामपंचायत pdf :
- माहिती अधिकारातून ग्रामपंचायतची माहिती कशी मांगावी?
- ऑनलाईन माहितीचा अधिकार :
- ग्रामपंचायत अर्ज नमुना :
- ग्रामपंचायत योजना :
- ग्रामपंचायत तक्रार अर्ज नमुना pdf :
- माहितीचा अधिकार अपील अर्ज :