![]() |
24 December Pesa Day | 24 डिसेंबर पेसा दिवस अधिनियम
पंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करणे) अधिनियम, १९९६ अर्थात पेसा कायदा दि. २४ डिसेंबर २०२४ रोजी "पेसा दिन" अनुसूचित क्षेत्रातील सर्व बांधवांना पेसा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
पेसा दिवस ची प्रतिज्ञा |Pesa Day Pledge
माझा देश भारत आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. मी आदिवासी आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. मी गरीब, लाजरा आहे. परंतू दुर्बळ नाही.
आदिवासी जमातीवर माझे प्रेम आहे. आदिवासी जमातीवर माझा दृढ़ विश्वास आहे. आदिवासी जमातीच्या भाषा, रुढी, परंपरा, रितिरीवाज, सांस्कृतिक मुल्ये यांचा मला अभिमान आहे. आणि त्यांचे जतन करणे हे माझे कर्तव्य आहे.
आदिवासीवर अन्याय झालेला मी सहन करणार नाही. आम्ही सर्व आदिवासी जमाती एक आहोत. मी आदिवासी जमातीचे परस्परांतील स्नेह, जिव्हळा व सद्भावना वृध्दिंगत करण्यासाठी प्रयत्न करेन.
मी विस्थापित होणार नाही. जंगलाचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. स्वायत्तता ही आदिवासीची नैसर्गिक देणगी आहे. स्वायत्तता हा माझा संविधानात्मक हक्क आहे. आणि तो मी मिळविनच अशी मी प्रतिज्ञा करतो.
![]() |
'नाहार-कंद' चे पहिले संपादक भगतसिंग पाडवी यांनी लिहिले पेसा दिवस ची प्रतिज्ञा
पेसा दिना निमित्त सर्व पेसा गावात ही प्रतिज्ञा घ्यायला हवी. प्रत्येक गृप वरील सभासदांनी सदर प्रतिज्ञा आपल्या गावात पोहोचवली पाहीजेत व ती आज आणि उद्या आप आपल्या पेसा गावात सांगितली गेली पाहिजे.
- पेसा कायदा अभ्यासक
- हेमंत किसन चौधरी. मु नाळेगाव पो उमराळे बु. ता दिंडोरी जि नाशिक.
हेही वाचा :👇👇