![]() |
भ्रष्टाचार म्हणजे नक्की काय? What exactly is corruption? संपूर्ण माहिती वाचा: |
भ्रष्टाचार मुक्त - एक संकल्पना : भ्रष्टाचार म्हणजे नक्की काय? : What exactly is corruption?
भ्रष्टाचार मुक्त गांव ही संकल्पना आपल्यासमोर मांडताना मला अत्यंत आनंद होत आहे. मित्रानो चला तर आपण भ्रष्टाचार मुक्त गाव ही संकल्पना समजून घेऊया! भ्रष्टाचार म्हणजे नक्की काय ? हे आपण पहिल्यांदा पाहिलं पाहिजे भ्रष्टाचार म्हणजे म्हणजेच खराब किंवा बिघडलेले आणि आचार म्हणजे आचरण किंवा वागणूक ! असा या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे. अनैतिक व अनुचित असे कोणत्याही प्रकारचे आचरण (कृती) म्हणजेच भ्रष्टाचार होय. जेव्हा एकादी व्यवती स्वतःच्या फायद्यासाठी न्याय व्यवस्थेच्या आणि मान्य नियमांच्या विरोधात जाऊन एकादे चुकाचे कृत्य करतो तेव्हा त्या व्यक्तीच्या कृत्तीला भ्रष्टाचार असे म्हणता येईल.मित्रानो आज भ्रष्टाचार नावाच्या या राक्षसाने फार मोठे रौद्ररूप धारण केलेल आपणास दिसते. भ्रष्टाचार कुठे आणि कसा करावा हे आज सांगायलाच नको! जसे काही अनुवांशिक गुण हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत पिढ्यांनपिढ्या संक्रमित होत जातात तसेच या भ्रष्टाचाराच्या बाबतीत संक्रमण होत आहे. याला वेळीच आवर घातला नाही तर सर्वसामान्य जनता होरपळून निघाल्याशिवाय राहणार नाही. या साठी गरज आहे ती फक्त योग्य त नियंत्रण ठेवण्याची.
सरकारी यंत्रणा या बाबतीत कमकुवत व काही अर्थी अपयशी होताना आपणास दिसत आहे. सरकारी यंत्रणा अपयशी होण्यामागे खूप मोठी कारो आहेत, त्यात मुख्यतः मळणजे सरकारी यंत्रणेवर असणारा सर्वसामान्य माणसांचा (जनतेचा) विश्वास दिसेंदिवस ढासळत चाललेला आहे. या सर्वाना कारणीभूत म्हणजे काही सरकारी भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी जे स्वतःच्या स्वार्थासाठी व मुठभर स्वार्थी लोकांच्या हितासाठी आपले कर्तव्य विसरतात आणि स्वतःला भ्रष्टाचारी राक्षसांच्या स्वाधीन करून देतात.
आज खऱ्या अर्थाने गरज आहे ती या कर्त्यव्याची आठवण करुन देण्याची शासनाने सोपवून दिलेली कर्त्यव्ये पार पाडण्याची अगदी निस्वार्थपणे ! या साठी गरज आहे ती आजची युवाशक्ती एकत्र करण्याची. दक्ष नागरिकांची, आणि संविधानाने दिलेली मूलभूत कर्त्यव्ये पार पाडण्याची. माहिती अधिकार अधिनियम २००५ या कायद्याची अंमलबजावणी करुन हे धारधार शस्त्र सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करून दिले आहे. या मागील प्रमाणिक हेतू एकच की भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविणे. या शस्त्राचा खरोखरच योग्य वापर केला तर भ्रष्टाचारावर जवळपास ९० टक्के नियंत्रण मिळविणे सोपे आहे. गरज आहे ती फक्त जागरुक आणि दक्ष नागरिकांची,
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे कार्यकर्ते विनोद जोशी पनवेल यांनी भ्रष्टाचार मुक्त गाव (CURPTION FREE VILLAGE ) ही संकल्पना मांडली दन नागरिक या सकंल्पनेचे स्वागत करुन गांव भ्रष्टाचार मुक्त करण्याचा कृतिकार्यक्रम अंमलात आणतील ही अपेक्षा आहे.
उदा. जर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला मिळवयाचा असेल तर मिळविण्यासाठी पन्नास शंभर रुपये माननीय तलाठी साहेबांना द्यावे लागतात. Digital 7/12 दाखला व रहिवाशी दाखला मिळवायचा असेल तर तो रेट आणखी वाढतो. सामान्य माणूस / शेतकरी इतका लाचार व हिनदीन झालाय की तलाठ्याला इतके पैसे कसले? बकि जरा पावती मिळेल का ? असे विचारण्याची हिमत गोळा करु शकत नाही. हीच सामान्य माणसाची कमजोरी भ्रष्टाचाऱ्यासाठी संजवनीचे काम करते.
भ्रष्टाचार निर्मूलनाची सुरुवात ही प्रत्येक गावाततून झाली तरच भ्रष्टाचाराची पाळेमुळे उखडून पडतील. त्यासाठी प्रत्येक गाव पातळीवर समजदार व प्रशिक्षित युवकांची युवाशक्ती एकत्र आली व शासनाचे आवश्यक तेवढे सर्व महत्त्वाचे नियम व कायदे तसेच हक्क अधिकार व कर्त्यव्येसुद्धा सामान्य माणसांना समजावून सांगितले व सामान्य जनतेचा विस्वास संपादन करून सक्षम अशी नागरिक अधिकाराची कार्यप्रणाली विकसीत करावी लागेल.
आज खऱ्या अर्थाने गरज आहे ती या कर्त्यव्याची आठवण करुन देण्याची शासनाने सोपवून दिलेली कर्त्यव्ये पार पाडण्याची अगदी निस्वार्थपणे ! या साठी गरज आहे ती आजची युवाशक्ती एकत्र करण्याची. दक्ष नागरिकांची, आणि संविधानाने दिलेली मूलभूत कर्त्यव्ये पार पाडण्याची. माहिती अधिकार अधिनियम २००५ या कायद्याची अंमलबजावणी करुन हे धारधार शस्त्र सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करून दिले आहे. या मागील प्रमाणिक हेतू एकच की भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविणे. या शस्त्राचा खरोखरच योग्य वापर केला तर भ्रष्टाचारावर जवळपास ९० टक्के नियंत्रण मिळविणे सोपे आहे. गरज आहे ती फक्त जागरुक आणि दक्ष नागरिकांची,
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे कार्यकर्ते विनोद जोशी पनवेल यांनी भ्रष्टाचार मुक्त गाव (CURPTION FREE VILLAGE ) ही संकल्पना मांडली दन नागरिक या सकंल्पनेचे स्वागत करुन गांव भ्रष्टाचार मुक्त करण्याचा कृतिकार्यक्रम अंमलात आणतील ही अपेक्षा आहे.
जागृत युवापिढीची !
आजही सर्वसामान्य जनता खेडचात राहते. आणि त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शहरी भागांशी संपर्क येतो. महात्मा गांधीनी म्हटले आहे की खेड्याकडे परत चला। खेड्यातूनच क्रांती (विकास) घडू शकते. असा त्यांचा दृढविश्वास होता. आणि तो काही अर्थी खराही आहे. गांधीच्या चाच दुरदृष्टीचा आजच्या परिप्रेक्षात विचार करून भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त गांव या अप्रतिम संकल्पनेला आपण सुरूवात करणार आहोत, गावात भ्रष्टाचार हा प्रत्येक शासकीय यंत्रणेत मुरलेला आहे.![]() |
भ्रष्टाचार म्हणजे नक्की काय? What exactly is corruption? संपूर्ण माहिती वाचा: |
भ्रष्टाचार निर्मूलनाची सुरुवात ही प्रत्येक गावाततून झाली तरच भ्रष्टाचाराची पाळेमुळे उखडून पडतील. त्यासाठी प्रत्येक गाव पातळीवर समजदार व प्रशिक्षित युवकांची युवाशक्ती एकत्र आली व शासनाचे आवश्यक तेवढे सर्व महत्त्वाचे नियम व कायदे तसेच हक्क अधिकार व कर्त्यव्येसुद्धा सामान्य माणसांना समजावून सांगितले व सामान्य जनतेचा विस्वास संपादन करून सक्षम अशी नागरिक अधिकाराची कार्यप्रणाली विकसीत करावी लागेल.
मित्रहो ! तुम्ही तुमच्या गावात करप्शन फ्री व्हिलेजची संकल्पना सुरु करा. तुमचे अनुकरण शेकडो हजारो गावातून केले जाईल अन गावातला, तालुक्यातला जिल्हातल्या पुढे राज्यातला व देशातला असा गल्ली ते दिल्ली असा समग्र भ्रष्टाचाराचा राक्षस मरुन पडायला वेळ लागणार नाही. विनोद जोशी, पनवेल
भ्रष्टाचार चे कारणे ?
भ्रष्टाचाराचे परिणाम सामाजिक परिणामी कारणे असून, एक म्हणजे भ्रष्टाचार लाचखोरी, दुसरी दुटप्पी व्यवहार तर तिसरी गुंतवणूक दारांची फसवणूक आशा काही भ्रष्टाचार चे कारणे आहेत. तसेच भ्रष्टाचार मध्ये आर्थिकदृष्ट्या असुरक्षित आहेतच परंतु सरकारी हस्तक्षेप हे भ्रष्टाचाराचे मूळ आणि मुख्य कारण आहे. जो आर्थिक व्यवहाराचा मोठा परिणाम आहे.
भ्रष्टाचार म्हणजे नक्की काय?
हे तुम्हाला समजलेच असेल, तसेच भ्रष्टाचार कसा काढला जातो. त्यासाठी तुम्हाला माहिती अधिकाराचा वापर करावा लागेल, आणि माहिती अधिकार अर्ज कसा करायचा, याची संपूर्ण माहिती वाचावी लागेल, माहिती अधिकाराचा अर्ज PDF हवे असल्यास त्या साठी आम्ही आमच्या सोशल मीडियाला टेलिग्राम ग्रुपला pdf उपलब्ध करून दिलेले आहे.