Jal Jeevan Mission Mahiti Adhikar Arj In Marathi : नमस्कार वाचक मित्रांनो आज मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे.जल जीवन मिशन चा माहिती अधिकार अर्ज नमुना मराठीत, गावात किंवा शहरात जल जीवन मिशन खुलाशा करावयाचे असल्यास त्या वेळी अशा खालील तक्रारी अर्ज करावा संपूर्ण माहिती वाचा.
जल जीवन मिशन चा माहिती अधिकार अर्ज नमुना : Jal Jeevan Mission Mahiti Adhikar Arj Format
जोडपत्र 'अ' (नियम ३ पहा) माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ६ (१) अन्वये अर्ज
प्रती.
- जन माहिती अधिकारी तथा पाणी पुरवठा विभाग कार्यालय:- ------------------------------------ ता.--------- जि.-----
- अर्जदाराचे संपूर्ण नावं व पत्ता:-----------------------------------------------------मो. नं
- माहितीचा विषय:- जल जीवन मिशन योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामाबाबत माहिती मिळावी.
माहितीचा तपशील:- आपल्या ग्रामपंचायतीचे जल जीवन मिशन योजनेसाठी तयार केलेले अंदाजपत्रक प्रत , प्रत्यक्ष एकुण आलेला निधी,झालेला खर्च , ठेकेदाराचे नाव , वर्क ऑर्डर प्रत, प्रशासकीय मान्यता प्रत , तांत्रिक मान्यता प्रत, कार्यारंभ आदेश प्रत , निविदा प्रत , साहित्य खरेदीसाठी विक्रेत्यांकडून मागविण्यात आलेले दरपत्रकाची प्रत ,
प्रत्यक्ष वापरलेल्या साहित्याचे , बिले पावत्या , काम सुरू होण्यापूर्वीचे , काम चालू असताना , आणि काम पूर्ण झाल्यानंतरचे फोटो , एम बी प्रत , तसेच जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नळ कनेक्शन जोडण्यासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी विक्रेत्यांकडून मागविण्यात आलेल्या दरपत्रकाची प्रत, प्रत्यक्ष वापरण्यात आलेल्या साहित्याचे बिले, पावत्या, तसेच नळ कनेक्शन धारकांची यादी ,
तसेच खाजगी नळ कनेक्शन धारकांची यादी , तसेच जल जीवन मिशन योजना राबविण्यासाठी करण्यात आलेल्या संपूर्ण पत्रव्यवहाराच्या प्रत. व त्या पत्रव्यवहारा संबंधी नोंद असलेल्या आवक , जावक नोंदवहीच्या प्रत. तसेच जल जीवन मिशन योजना राबविण्याबाबत घेण्यात आलेले ग्रामसभेतील/ग्रामपंचायतीच्या ठरावची प्रत, तसेच ग्रामसभेसाठी उपस्थित असलेल्या महिला व पुरुष सदस्यांची संख्या व त्यांचे नावे, सह्या असलेल्या नोंदवहीची प्रत.
तसेच जल संसाधनांची गुणवत्ता, तपासणी अधिकाऱ्यांचे पदनाम , हुद्दा व त्यांनी वरिष्ठांकडे पाठवलेल्या अहवालाची प्रत , व जल जीवन मिशन योजनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात शासनाचे असलेले शासन निर्णय , परिपत्रक , वरिष्ठांच्या आदेशाची प्रत, आणि त्याची अंमलबजावणी झालेल्या अहवालाची प्रत,
तसेच जल जीवन मिशन योजनेअंतर्गत ज्या जागेवर जल कुंभ उभारण्यात आले ती जागा ग्रामपंचायतीची (स्वतंत्र असल्यास) सदर जोगेची नोंद असलेल्या नोंदवहीची प्रत. किंवा सदर जागा (खजगी असल्यास) ग्रामपंचायतीने जागा ताब्यात घेतल्याचा पुरावा. जसे की जागा मालकाचे बक्षीस पत्र , स्टॅम्पपेर , नोंदणी , दानपत्र इ. व जागा ताब्यात घेतल्यानंतर त्या जागेची नोंद केलेल्या नोंदवहीची प्रत तसेच जल कुभाचे काम सुरू होण्यापूर्वीचे , काम चालू असतानाचे व काम पूर्ण झाल्यानंतरचे फोटोग्राफ
टीप:- वरील सर्व माहिती , माहिती अधिकार लोगो सह साक्षांकित करून. शासनाने ठरवून दिलेल्या विहित मुदतीत मला व्यक्तिशः देण्यात यावी.
- ठिकाण:- --------------
- दिनांक / / 2024
- अर्जदाराची सही
- अर्जदाराचे संपूर्ण नाव
- अर्जदाराचे मोबाईल नंबर
- अर्जदारचे संपूर्ण पत्ता.
निष्कर्ष
जल जीवन मिशन चा माहिती अधिकार अर्ज माहिती मोफत उपलब्ध करून देत आहे. Jal Jivan Mishan Mahiti Adhikar Arj 'फॉर्म' कसा भरायचा आहे त्या साठी आम्ही Video उपलब्ध करून देत आहे. Video पाहण्यासाठी आमच्या खालील सोअसिअल मिडीयाला मिळेल. तसेच हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती कडे, हि माहिती शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आम्ही शेअर करत असतो. म्हणून आम्ही सांगतो कि आमच्या सोअसिअल मिडीयाला जॉईन व्हा.