Birth And Death certificate online : जन्म-मृत्यू या महत्त्वाच्या. जन्म व मृत्यूचे प्रमाणपत्र ऑनलाइन देणाऱ्या शासकीय संकेतस्थळात तसेच त्याच्या नियमात नुकतेच महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार जन्म-मृत्यू दाखल्यासाठी आता २१ दिवसांत अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रमाणपत्रासाठीही ३० दिवसांनंतर ते १ वर्षाच्या आत अर्ज केल्यास संबंधित बीडीओ व मुख्याधिकारी यांना आदेश काढावा लागतो.
या अर्जाला जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांची मंजुरी हवी असते. या बदलामुळे प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी येऊ शकतात. जन्म-मृत्यू प्रमाणपत्र केंद्र शासनाच्या https://dc.crsorgi.gov.in/crs/ या संकेतस्थळावरून जन्माच्या सात दिवसांतच मिळवून घ्यावे, असे आरोग्य विभागाने कळवले आहे.
विशेष म्हणजे जर बाळाचे नाव ठेवले नसेल तर ते रिक्त ठेवूनही पालकांच्या हातात जन्म प्रमाणपत्र देण्याची सोय केली गेली आहे. नाव ठरल्यानंतर त्या साइटवर अपडेट करता येते. त्यामुळे आता जन्म-मृत्यू प्रमाणपत्र काढणे सोयीचे झाले आहे. पालकांनी जागरुकपणे वेळीच जन्म व मृत्यूची नोंद करून प्रमाणपत्र मिळवून घेणे गरजेचे आहे.
जन्म मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र २१ दिवसांत बंधनकारक
नव्या नियमानुसार जन्म व मृत्यूची नोंद २१ दिवसांत करणे बंधनकारक आहे. जन्म-मृत्यू रुग्णालय अथवा घरी झाल्यास ते क्षेत्र ज्या विभागाच्या अखत्यारित येते, त्या संबंधित विभाग कार्यालयात नोंद करण्यात येते.ऑनलाइन स्पेलिंग बदलही करता येणार
केवळ आई-वडिलांचे नाव, आडनाव, पत्ता, आधार क्रमांक आदींमध्ये स्पेलिंग दुरुस्ती करता येणार आहे. फक्त्त कुटुंबातील व्यक्त्तींनाच जन्म नोंदणी दुरुस्ती अर्ज करता येईल.कसा करायचा ऑनलाइन अर्ज
संबंधित वेबसाइटवर लॉगिन करा. जन्म प्रमाणपत्र नोंदणी फॉर्म डाऊनलोड करा आणि प्रिंटआऊट मिळवा, योग्यरीत्या भरावा. पडताळणीनंतर प्रमाणपत्र मिळते.२१ दिवसांनंतर अर्ज केला तर...
जन्म नोंदणी विलंब झाल्यास जादा शुल्क लागेल. तीस दिवसानंतर आणि जन्माच्या एका वर्षाच्या आत नोंदणी केल्यास बीडीओ किंवा सीओंचे आदेश घ्यावे लागतील.ऑनलाइन करा नोंदणी Birth And Death Certificate online apply
जन्म व मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी केंद्र शासनाची https://dc.crsorg i.gov.in/crs/ येबसाइट सुरू झाली आहे. यावर ऑनलाइन नोंदणीही करता येते.People also search for
नागरिकांनी वेळेवर नोंदणी करावी
21 दिवसाच्या आतच नोंदणी करणे बंधनकारक आहे. शासनाने वेबसाइटमध्ये केलेल्या बदलानुसार ३० दिवसांनंतर जर नोंदणी केली तर संबधित बीडीओ किंवा सीओंचे आदेश लागतील. ते आदेश आमच्याकडे येतील. आम्ही मंजुरी दिल्यानंतर नोंदणी होईल. - डॉ. रवींद्र सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार.निष्कर्ष
जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठी २१ दिवसांत करा ऑनलाइन नोंदणी माहिती मोफत उपलब्ध करून देत आहे. Birth And Death certificate online Apply 'फॉर्म' कसा भरायचा आहे त्या साठी आम्ही Video उपलब्ध करून देत आहे. Video पाहण्यासाठी आमच्या खालील सोअसिअल मिडीयाला मिळेल. तसेच हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती कडे, हि माहिती शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आम्ही शेअर करत असतो. म्हणून आम्ही सांगतो कि आमच्या सोअसिअल मिडीयाला जॉईन व्हा.
Follow Us