Rojgar Mahaswayam Vinanti Arj Namuna : नमस्कार वाचक मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत ग्रामपंचायत योजना दूत : जि. पं प्रा. शाळा : माध्यमिक शाळा : पशुसंवर्धन दवाखाना प्रा. आरोग्य केंद्र. : प्रा. आरोग्य उप केंद्र. अशा ६ जागांसाठी ऑनलाईन नोदणी सुरु झालेली आहे. परंतु नोदणी करण्यास किंवा लॉगिन (Registration Id ) पासवर्ड साठी जिल्ह्या लेवल ला अर्ज कसा करावा. याची संपूर्ण माहिती दिलेली आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अर्ज करण्यसाठी भूतकाळात आपण कधीतरी जॉब सिकर वर नोंदणी केली असेल, किंवा लॉगिन (Registration Id ) पासवर्ड मिळत नसेल तेव्हा, आम्ही खालील नमुना अर्ज देत आहे त्या पद्धतीने अर्ज आपल्या जिल्हा सहाय्यक संचालक / जिल्हा समन्वयक अधिकारी यांच्या कडे ईमेल ने पाठवू शकता. किंवा आपण स्वत त्या जिह्याच्या Skill Development, Employment & Entrepreneurship Guidence Centre ला भेट घेऊ शकता.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना : Rojgar Mahaswayam Vinanti Arj Namuna
- मा. सो जिल्हा सहाय्यक संचालक / जिल्हा समन्वयक अधिकारी
- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार
- आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र
- धुळे यांच्या सेवेशी
- दिनांक : 01/09/2024
- अर्जदार : शैलेश लालसिंग पावरा
- न्यू बोराडी पो. बोराडी ता. शिरपूर जिल्हा धुळे
- मो. ७०६६४८७००८ ईमेल. Pawarashailesh2@gmailcom
- विषय : नोकरी शोधणारा/CMYKPY प्रशिक्षण लॉगिन (Registration Id ) पासवर्ड मिळणे बाबत.
महोदय,
मी वरील विषयान्वये आपणास विनंती पूर्वक लेखी विनंती करितो कि, मी शैलेश लालसिंग पावरा मौजे न्यू बोराडी गावाच्या कायमस्वरूपी रहिवासी असून, उच्च सुशिक्षित बेरोजगार तरुण असून, मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मध्ये जि. पं प्रा. शाळा ( BAHUUDESHIY KARMACHARI DATA ENTRY OPERATOR ) या पदासाठी फोर्म भरावयाचा आहे. तरी. मी जॉब/ सिकर / find जॉब ह्या tab वरून नवीन नोंदणी करत होतो. परंतु माझे पहिले पासून नोंदणी झालेली आहे. म्हणून नोंदणी होत नाही आहे.
मी जॉब/ सिकर / या पोर्टल वर २०१७ रोजी नोंदणी केलेली होती परंतु त्या वेळेस अशा अटी शर्ती नवत्या परंतु आजच्या घडीला अशा अट नुसार मी नवीन नोदणी करत असतांना माझे पहिले पासून नोंदणी झालेली आहे. असे दाखवत आहे. नवीन नोंदणी होत नसल्याने मी Forgot Password? केले. आधार नंबर टाकले. नंतर तेथे एक मासेज आला कि “ आपण आपल्या जिल्ह्या समन्वयक अधिकारी यांच्या शी संपर्क करा.” असे आल्या नंतर मी माझा पद्धतीने email आणि आपले सरकार पोर्टल तक्रार नुसार आपल्या कार्यालयात अर्ज करत आहे. आणि बेरोजगार असल्याकारणाने मला जि. पं प्रा. शाळा ( BAHUUDESHIY KARMACHARI DATA ENTRY OPERATOR ) या पदासाठी फोर्म भरावयाचा आहे. तरी माननीय महोदय साहेबांनी Registration Id आणि Password माझा ईमेल किंवा sms च्या माध्यमातून अर्ज करणाच्या अगोदर लवकरात लवकर द्यावा. हि नम्र विनंती.
खालीलप्रमाणे माझी माहिती.
- नाव : शैलेश लालसिंग पावरा
- पत्ता : न्यू बोराडी पो. बोराडी ता. शिरपूर जिल्हा धुळे.
- मो. 7378371256 ( टीप : वाचकांसाठी आहे. माझाशी संपर्क करावयाचा असेल तर whatsapp वर संपर्क करा.)
- ईमेल : pawarashailesh@gmail.com
- आधार नंबर : Link
आपल्या जिल्ह्याशी संपर्क नंबर किंवा ईमेल id हवी असल्यास आम्ही telgram ग्रुप वर pdf टाकलेली आहे. प्रथम तुम्हाला आमच्या ग्रुप ला जॉईन व्हावे लागेल. तेव्हाच ती फाईल दिसेल.
Follow Us