जिल्हाधिकारी कडे तक्रार अर्ज कसा लिहावा? : Complaint Letter to the Collector In Marathi
- प्रति,
- मा.सो. जिल्हाधिकारी ( जिल्ह्याचे नाव लिहा )
- यांच्या सेवेशी
- दिनांक लिहा :
- अर्जदार चे पूर्ण नाव लिहा
- संपूर्ण पत्ता लिहा
- मोबाईल नंबर लिहा
- विषय :- महाऑनलाईन पोर्टल सुरूळीत होणे बाबत.
उपरोक्त विषयी सविनय सादर करण्यात येते की, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत नागरिकांना महाऑनलाईन प्रणालीद्वारे उत्पन्न प्रमाणपत्र, वय व अधिवास प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलिअर प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्र ऑनलाईन प्रणालीद्वारे उपलब्ध करुन देण्यात येतात.
त्याअनुषंगाने शैक्षणिक व शासकिय कामासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणपत्राची आवक जास्त प्रमाणात असल्यामुळे महाऑनलाईन प्रणालीचे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना सादरचे प्रमाणपत्र विहीत मुदतीत वितरीत करण्यात विलंब होत आहे. त्यामूळे विद्यर्थ्याचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
करिता महा आयटी महाऑनलाईन प्रणाली, मुंबई यांना सदरचे सर्व्हर सुरूळीत चालू होण्यासाठी आपले स्तरावरुन आवश्यक त्या सुचना होणेस विनंती आहे.
आपली विश्वासु
प्रतिलिपी :-
1. मा. संचालक, महा आयटी, मुंबई यांना माहितीस्तव सविनय सादर.
2. मा. उपविभागीय अधिकारी यांना माहितीस्तव सविनय सादर.
जिल्हाधिकाऱ्यांना ऑनलाइन तक्रार पत्र कसे लिहायचे? : How to write online complaint letter to Collector?
जिल्हाधिकारी कडे ऑनलाईन तक्रार करण्यसाठी तुम्हाला प्रथम आपले सरकार च्या https://grievances.maharashtra.gov.in/en अधिकृत संकेतस्थळ ला भेट द्यावी लागेल. आणि आपले काय म्हणणे आहे. ते स्पष्ट स्वरुपात लिहा.
Related Post :
निष्कर्ष
आम्ही दिलेला लेख आमच्या पद्धतीने लिहिलेला आहे. यात आपल्या पद्धतीने बदल करून घ्यावा. जसे काही कारणास्तव इतर तक्रारी असल्यास बदल करावा. हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती कडे, किंवा आपण शहरी भागात राहत असाल तर हि माहिती शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आम्ही शेअर करत असतो. म्हणून आम्ही सांगतो कि आमच्या सोअसिअल मिडीयाला जॉईन व्हा.