![]() |
Gram Panchayat Nuvadnuk Aharta Apatrata |
ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडणूक लढवण्यासाठी अर्हता व अपात्रता.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ अंतर्गत काही अर्हता आणि अपात्रता निश्चित करण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यापूर्वी या अर्हता पूर्ण केल्या आहेत की नाही याची खात्री करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून नामनिर्देशनपत्र अवैध होण्यापासून किंवा निवडणुकीनंतर अपात्र ठरविण्यापासून बचाव केला जाऊ शकेल.
चुकीच्या कागदपत्रांमुळे नामनिर्देशन अवैध ठरू शकते.
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्हता आणि अपात्रता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम अंतर्गत स्पष्टपणे नमूद केल्या आहेत. उमेदवारांनी या नियमांचे पालन करून सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत, त्यामुळे तुमचे नामनिर्देशनपत्र वैध राहील आणि निवडणुकीनंतर अपात्र होण्याचा धोका टाळता येईल.आगामीकाळात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ अंतर्गत, ग्रामपंचायतीचे सदस्य / सरपंच म्हणून निवडणूक लढवण्यासाठी खालील अर्हता निश्चित करण्यात आल्या आहेत.
उमेदवार नामनिर्देशनपत्र
उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यापूर्वी या अर्हता पूर्ण करीत असल्याची खात्री करावी, जेणे करून नामनिर्देशनपत्र अवैध होण्यापासून किंवा निवडणुकीनंतर अपात्र ठरविण्या पासून स्वतःचा बचाव करता येईल.
अर्हता (Eligibility Criteria)
ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच म्हणून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांनी खालील अर्हता पूर्ण केल्या पाहिजेत1 वय
नाम निर्देशनपत्र दाखल करण्याच्या अंतिम तारखेला उमेदवारा चे वय किमान २१वर्षे असावे.2 मतदार यादी
उमेदवाराचे नाव ग्रामपंचायतीच्या सध्याच्या मतदार यादीत समाविष्ट असावे.3 कायदेशीर पात्रता
उमेदवार ग्रामपंचायत अधिनियमांतर्गत अपात्रताबाबत असलेल्या कलाम १३ अन्वय ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून अपात्र ठरलेला नसावा.4 शैक्षणिक पात्रता
सरपंचपदासाठी : १ जानेवारी १९९५ नंतर जन्मलेल्या उमेदवारांनी किमान ७ वी उत्तीर्ण केलेली असावी.5 एकाधिक वार्ड
उमेदवार एकाच वॉर्डमध्ये एका पेक्षा जास्त जागांसाठी उमेदवारी दाखल करू शकत नाही, परंतु वेगवेगळ्या वॉर्डामध्ये उमेदवारी दाखल करू शकतो.6 आरक्षित जागा
अनु. जाती/अनु. जमाती नागरिकांचा मागासप्रवर्ग जागांसाठीः उमेदवाराने जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे. जात वैधता प्रमाणपत्र प्रलंबितअसल्यास, निवडणुकी नंतर ०६ महिन्यांच्या आत सादरकरण्याचे बंधपत्र दाखल करणेआवश्यकआहे अन्यथा नामनिर्देशन रद्द होऊ शकते.7 इतर राज्यातील उमेदवार
इतर राज्यांतून स्थलांतरित SC/ST/OBC उमेदवार त्यांच्या जातीच्याआरक्षित वॉर्डात उमेदवारी दाखल करू शकत नाहीत.महत्वाच्या सूचना
नामनिर्देशनपत्र तपासणीः
नामनिर्देशनपत्र दाखल करण्यापूर्वी सर्व अर्हता आणि अपात्रता तपासा. चुकीच्या कागदपत्रांमुळे नामनिर्देशन अवैध ठरू शकते.
आवश्यक कागदपत्रे :
जातप्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, मतदारयादीतील नाव,
हमीपत्र
ग्रामपंचायत कराची थकबाकी नसल्याबाबत ना हरकत आणि शौचालय वापराचे हमीपत्र तयार ठेवा.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ अंतर्गत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्हता आणि अपात्रता स्पष्टपणे नमूद केल्या आहेत.
अपात्रता (Disqualifications)
खालील परिस्थितींमध्ये उमेदवार ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडणूक लढवण्यास अपात्र ठरतो1 राज्य विधानमंडळाद्वारे अपात्रता
कोणत्याही कायद्यांतर्गत राज्य विधानमंडळाने अपात्र ठरवलेले व्यक्ती, तो कालावधी संपेपर्यंत. (कलम१४(१) (अ-१))
2 गुन्हेगारी दोष
अस्पृश्यता (अपराध) कायदा, १९५५ किंवा मुंबई मद्यपान कायदा, १९४९ अंतर्गत दोषी ठरलेले, ५ वर्षात, सरकारने सूट दिल्यास वगळता. (कलम १४ (१) (अ) (१), १४ (१) (अ) (२)) -इतरगुन्ह्यांसाठी ६ महिन्यांपेक्षा जास्त तुरुंगवास, सुटकेनंतर ५ वर्षापर्यंत. (कलम १४ (१) (अ) (२))
3 जामीन आणि प्रलंबित अपील
जामिनावर असलेले आणि अपील प्रलंबित असलेले, दोष रद्द होई पर्यंत.
4 दिवाळखोरी
प्रांतीय दिवाळखोरी कायदा, १९२० अंतर्गत दिवाळखोर घोषित, तो कालावधी संपे पर्यंत. (कलम १४ (१) (क))
5 मानसिक आरोग्य
भारतीय मानसिक रुग्णता कायदा, १९९२ अंतर्गत मानसिक रुग्ण ठरवलेले. (कलम१४ (१) (ब))
6 परदेशी नागरिकत्व
परदेशी नागरिकत्व स्वीकारलेले किंवा परदेशाला निष्ठा शपथ घेतलेले. (कलम१४ (१) (ज))
7 सरकारी कर्मचारी
सरकारी किंवा स्थानिक प्राधिकरणाचे कर्मचारी. (कलम १४ (१) आय))
8 अनुशासन हीनतेमुळे बरखास्त
सरकारी किंवा स्थानिक प्राधिकरणातून अनुशासन हीनतेमुळे बरखास्त, ५ वर्षांसाठी. (कलम१४ (१) (क-१))
9 कर थकबाकी
ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेला कर/शुल्क थकबाकी. (कलम१४ (१) (ह))
10 पंचायतीचे पगारीपद
पंचायतीच्या नियंत्रणाखालील पगारी किंवा लाभदायक पदधारण करणे. (कलम१४ (१) (फ))
11 पंचायतीचे ठेके
पंचायतीच्या ठेक्यांमध्ये थेट/अप्रत्यक्षहित संबंध. (कलम १४ (१) (ग))12 मुलांची संख्या
१२ सप्टेंबर २००१ नंतर ३ किंवा अधिक मुले (१३ सप्टेंबर २००० पूर्वी किंवा १२ सप्टेंबर २००१ पर्यंत एकाच प्रसूतीतील मुले वगळता). (कलम १४ (१) (ज-१))13 इतर निवडणुका
जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचे सदस्य. (कलम १४ (१) (ज-२))14 अतिक्रमण
सरकारी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण. (कलम १४ (१) (ज-३))15 निवडणूक आयोगाची अपात्रता
राज्य निवडणूक आयोगाने ५ वर्षांसाठी अपात्र ठरवलेले. (कलम १४ (१) (ज-४))16 निवडणूक खर्च उल्लंघन
निवडणूक खर्चाच्या उल्लंघनासाठी दोषी, तो कालावधी संपे पर्यंत.17 स्थानिक प्राधिकरण कर्मचारी
स्थानिक प्राधिकरणाचे कर्मचारी/शिक्षकअपात्र; खाजगी शाळांचे कर्मचारी पात्र.18 परदेशी नागरिक
परदेशी नागरिक अपात्र. (कलम१४ (ज-५))19 शौचालय वापर
ग्राम सभेच्या ठरावानुसार शौचालय वापराचे स्वयं घोषणापत्र नसणे. (कलम १४ (ज-५), महाराष्ट्र सुधारणा कायदा, २०१०)20 सदस्यत्व रद्द
कलम ३९ अंतर्गत ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द, ५ वर्षांसाठी अपात्र (सरकारी सूट वगळता).महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम अंतर्गत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्हता आणि अपात्रता स्पष्टपणेनमूद केल्या आहेत. उमेदवारांनी या नियमांचे पालन करून सर्वकागदपत्रे तयार ठेवावीत. यामुळे तुमचे नामनिर्देशनपत्र वैध राहील आणि निवडणुकी नंतर अपात्र होण्याचा धोका टाळता येईल.![]() |