![]() |
काय आहे अक्षय्य तृतीया आदिवासी आखाती सण परंपरा
आखाती सणाच्या सात दिवस अगोदर बांबूपासून विनलेल्या व शेणाने सारवलेल्या एका लहान टोपलीत(दुरडी) माती घेऊन त्यामध्ये पाच/सात प्रकारचे धान्य पेरले जाते.यात भात,नागली,मका,तूर,उडीद इत्यादी धान्यांच्या बियांचा समावेश केला जातो.धान्य पेरलेल्या टोपलीला "गौर" किंवा "गौराई" असे म्हटले जाते.नंतर पेरलेल्या धान्याला पाणी शिंपडतात. हि गौर तीला सुर्यप्रकाश व हवा न लागो म्हणून घरातील एका कोपऱ्यात मोठ्या टोपली(झिला) खाली झाकूण ठेवतात.पूढील सात दिवस गौराईला सकाळ-संध्याकाळ पाणी दिले जाते.या दरम्यान रात्रीच्या वेळी महिला 'गौराईची गाणी' म्हणतात.
आखातीचा दिवस: अक्षय्य तृतीया आदिवासी आखाती सण
आखातीच्या दिवशी सकाळी चांगला स्वयंपाक केला जातो. त्या विशेष करुन मासे, मटण यांचा समावेश असतो. तर काही भागात गोड जेवण बनवले जाते. त्यातीलच थोडासा नैवद्य काढून गौराईला दिला जातो. हा नैवद्या परिसरानुसार वेगवेगळा असू शकतो. त्यात मासे, किंवा वरण-भात, नागलीची भाकरी इ. चा समावेश असतो.
काही ठिकाणी वाफेवर शिजविलेली तांदळाची भाकरी असते. त्यातच मास्यांची भाजी ठेऊन तो नैवद्या दाखविला जातो. कोडईच्या झाडापासून बनविलेली टिपरी गौराईत रोवली जाते. त्या टिपरीलाच नागलीची भाकर/गव्हाची चपाती टोचली जाते. उगवलेली गौर थोडीशी तोडून आपल्या कुलदैवतांसमोर ठेवली जाते व त्यानंतर गौराई गावातील मोक्याच्या ठिकाणी जमा केल्या जातात.
गौराईची मिरवणूक:
आखातीच्या दिवशी मिरवणूक काढण्यात येते.तीन ते चार वाज्याच्या सूमारास महिला आपआपल्या घरी पेरलेल्या गौराईला कागदी गजरा लावून सजवतात.नैवेद्य दाखवून पूजा करतात.नंतर गौराईला डोक्यावर घेऊन घराबाहेर येतात.सतत झाकून ठेवल्यामूळे उगवलेल्या रोपांचा रंग हा पिवळा दिसतो.
गावातील मंदिरात किंवा गावचा पाटिल यांच्या घरी संपूर्ण गावातील महिला एकत्र येतात.मोकळ्या जागेत गौराई खाली ठेवून तीच्या भोवती गोल रिंगण धरुन 'कोडई' च्या झाडापासून बनवलेल्या टिपरी घेऊन गौराईची गाणी म्हणत नाचतात.नंतर पारंपारिक वादय 'संबळ' (सांबळ्या,कहाळ्या) यांच्यासंगे मिरवणूक पूढे चालते.
गौराईला गावाजवळील नदी,तलाव किंवा विहिरीवर नेतात.तिथे पूजा करुण उगवलेली गौर(पिवळी रोप) तोडून घेतात व खालील माती-मूळांचा भाग पाण्यात विसर्जन करतात.तोडलेली गौर देवाला अर्पन करतात व बाकी उरलेली महिला आपल्या केसात माळतात.

- आखाती सणाला नवविवाहित मूली सासरहून माहेरी येत असतात.
- हा सण शेवटचा असल्यामूळे या सणाला 'बुडीत सण' असेही म्हटले जाते.
उद्देश:
पेरलेल्या धान्यापासून उगवलेले रोप हे योग्य आहे कि कमजोर आहे,म्हणजे येणाऱ्या पूढील पावसाळ्यात हे पीक आपल शेतात कस येणार याचा अंदाज हा आदिवासी शेतकरी बांधव लावत असतो.
![]() |