Amdar Amrishbhai Patel Police Bharati Prashikshan Kendra Shirpur | "आ. अमरिशभाई पटेल पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र" शिरपूर मार्फत शिरपूर तालुक्यातील युवक व युवतींसाठी पोलीस भरती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, तिसऱ्या बॅचसाठी सोमवारी ७ मे रोजी निवड चाचणी
![]() |
तिसऱ्या बॅचसाठी ७ मे २०२५ रोजी आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी ६ वाजता मुलामुलींची निवड चाचणी घेण्यात येणार आहे.
एस.व्ही.के.एम. अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम दादा पावरा, एस.व्ही.के.एम. सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्यातील युवक व युवतींसाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ तर्फे पोलीस भरती प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
टप्प्याटप्प्याने हे प्रशिक्षण देण्यात येणार
आता पर्यंत २ तुकडी चे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आतापर्यंत एक पीएसआय मनोज पाटील, १७ होमगार्ड, एक महाराष्ट्र पोलीस राजश्री भिल, एक एसआरपीएफ रितेश पावरा, चार वनरक्षक रंजना पावरा, आरती पावरा, रवीन पावरा, मनोज पावरा तसेच सात आर्मी तेजस आबा मराठे (उंटावद), महाजन मानव मनोहर (अंबिका नगर),पावरा विशाल बळीराम (खामखेडा), प्रमोद विक्रम पारधी (उंटावद), मराठे वैभव भानूदास (जनता नगर), राजपूत सिद्धांत ईश्वरसिंग (जातोडा), दिपक पवार (तांडे), स्पोर्ट्स विद्यापीठ राज्यस्तर कास्य पदक ४ बाय ४०० मीटर रिले मध्ये आकाश पावरा अशा प्रकारे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत.
या सर्व शारीरिक प्रशिक्षणाची जबाबदारी ही सुभाष पावरा यांना देण्यात आली असून, बौद्धिक प्रशिक्षण साठी उच्च दर्जीय शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या मैदानावर ७ मे रोजी सकाळी ६ वाजता मुलामुलींची निवड चाचणी घेण्यात येऊन नंतर त्यांना शारीरिक व बौद्धिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावेळी इच्छुक विद्यार्थ्यांनी मुलामुलींनी उपस्थित राहण्याचे आवाहन सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांनी केले आहे.
पोलीस भरतीसाठी शारीरिक प्रशिक्षण नेमणूक
पोलीस भरतीसाठी शारीरिक प्रशिक्षण घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले सुभाष पावरा यांची सुद्धा नेमणूक करण्यात आली आहे. मेरिट प्रमाणे प्राधान्य क्रमाने पुढील उर्वरित विद्यार्थी प्रशिक्षण साठी घेण्यात येणार आहेत. सदर भरतीपूर्व प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी शिरपूर शहर सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांनी घेतली आहे.प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणाऱ्या मुलामुलींसाठी नियम व अटी लागु आहेत. उमेदवार कमीतकमी १२ वी उत्तीर्ण असावा. उंची जनरल मुलांसाठी १६५ से.मी व आदिवासी मुलांसाठी १६० से. मी. तसेच जनरल मुलींसाठी १५४ से.मी व आदिवासी मुलींसाठी १४९ से.मी. असे राहणार आहे.