SATHI Portal Maharashtra | शेतकर्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे मिळालेच पाहिजे, यासाठी सातत्याने प्रयत्न होत असताना आता सत्यप्रत बियाण्यांच्या (ट्रुथफुल सिड्स) उत्पादनापासून ते विक्रीपर्यंतच्या संनियंत्रणासाठी साथी पोर्टलची राज्यात अंमलबजावणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्यात खरीप हंगाम 2025 पासून राज्यात सत्यप्रत बियाणांची विक्री, वितरण हे साथी (Seed Authentication Traceability and Holistic Inventory ‘SATHI’) पोर्टलद्वारे करावे लागणार आहे.
यामुळे शेतकर्यांना प्रमाणित आणि खात्रीशीर बियाणे उपलब्ध होईल. परराज्यात उत्पादित मात्र, राज्यात विक्री होणार्या बियाण्यांवर यामुळे नियंत्रण ठेवणे शक्य होईल. या निर्णयाचा निश्चितपणे आमच्या शेतकरी बांधवांना लाभ होईल.
राज्यात बऱ्याच वेळा काळा बाजार होऊन बनावट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जात होते..शेतकऱ्यांनी ऑलरेडी लागवडीसाठी पूर्ण खर्च केलेला असतो..जर अशा बियाण्याची उगवण झाली नाही तर लवकर लक्षात येते पण उगवण होऊन नंतर त्यास मालच लागला नाही तर आणखी जास्त नुकसान होते..तसेच कोणत्या दुकानदाराकडे किती स्टॉक उपलब्ध आहे ते पण कळत नव्हते..
सत्यप्रत बियाणे साथी पोर्टलवर घेण्याचे उद्देश :- SATHI Portal Maharashtra
- (१) सत्यप्रत बियाणे मुख्यता खासगी बियाणे उत्पादक संस्थामार्फत उत्पादित केलेले संशोधित वाणाचे बियाणे असते.
- (२) शेतकऱ्यांना उपलब्ध होणाऱ्या बियाणांमध्ये ७०-८०% सहभाग सत्यप्रत बियाणाचा आहे.
- (३) बियाणे वितरण प्रणालीमध्ये शोधण्यायोग्यता (Traceability) वाढण्यास मदत होईल.
- (४) बियाणांच्या संपूर्ण प्रवासावर (वितरण, विक्री इ.) नियंत्रण ठेवता येते, त्यामुळे पारदर्शकता वाढेल.
- (५) बनावट, कालबाह्य आणि अनधिकृत बियाण्यांच्या विक्रीस प्रतिबंध घालून बियाणे व्यवसायातील अपप्रवृत्ती आणि गैरव्यवहारांना आळा घालता येईल.
- (६) बियाणे उत्पादन कंपन्या, वितरक आणि विक्रेते यांच्यातील समन्वय वाढून त्यांचे व्यवस्थापन सोपे होईल.
म्हणून शेतकर्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे मिळालेच पाहिजे, यासाठी सातत्याने प्रयत्न होत असताना आता सत्यप्रत बियाण्यांच्या (ट्रुथफुल सिड्स) उत्पादनापासून ते विक्रीपर्यंतच्या संनियंत्रणासाठी साथी पोर्टलची राज्यात अंमलबजावणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्यात खरीप हंगाम २०२५ पासून राज्यात सत्यप्रत बियाणांची विक्री, वितरण हे साथी (Seed Authentication Traceability and Holistic Inventory ‘SATHI’) पोर्टलद्वारे करावे लागणार आहे. यामुळे शेतकर्यांना प्रमाणित आणि खात्रीशीर बियाणे उपलब्ध होईल.
परराज्यात उत्पादित मात्र, राज्यात विक्री होणार्या बियाण्यांवर यामुळे नियंत्रण ठेवणे शक्य होईल. यामुळे शेतकऱ्यांना योग्य व खात्रीशीर प्रतीचे बियाणे उपलब्ध होण्यास मदत होईल. या निर्णयाचा निश्चितपणे शेतकरी बांधवांना लाभ होईल.
![]() |
Truthful Labelled and SATHI Portal Maharashtra Gr |