![]() |
मा. गट विकास अधिकारी सो. पंचायत समिती शिरपूर यांना घरकूल सर्वेची मुदतवाढ मिळणे आणि घरकूल चालू असलेल्या लाभार्थ्यांना शासनाच्या वाळू धोरणा नुसार 5 ब्रास वाळू उपलब्ध करून देणेबाबत सविस्तर चर्चा केली.
सदर निवेदन मा. बीडीओ पवार साहेब व मा. सहायक बीडीओ गायकवाड साहेब यांना दिले. यावेळी सरपंच उप सरपंच समेत युवा टीम मोठ्या संख्येने उपस्थित होती.
मा. गट विकास अधिकारी यांनी संबंधित विभागाला बोलावून मुदत वाढीबाबत सीईओ धुळे यांना लागलीच पत्र व्यवहार करण्याच्या सुचना तात्काळ दिल्या.
घरकूल लाभार्थ्यांना शासनाच्या वाळू धोरणानुसार देय असलेल्या 5 ब्रास वाळूबाबत मा. बीडीओ यांनी तहसीलदार महोदयांशी तात्काळ संपर्क करून चर्चा केली. दरम्यान चर्चेअंती तहसील कार्यालयाला घरकूल लाभार्थी यादी पाठवली गेली. ज्यामुळे वाळू उपलब्ध होण्यास मदत होईल. आणि वाळू कारवाईही टळेल. (नियमात असणे आवश्यक)_
घरकुल आवास प्लस सर्व्हे ची मुदत वाढवा -@ टीम बिरसा आर्मी, शिरपूर तालुका._
शिरपूर तालुक्यातील गावा-गावांत सद्या Online Awas Plus Sarve चे काम चालू आहे. ज्यासाठी शासनाने 30 एप्रिल हि अंतिम मुदत दिली आहे. घरकुल सर्व्हे करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भात शिरपूर गट विकास अधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिले.
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणावर घरकुलास मान्यता दिली आहे. 2018 मध्ये Awas Plus ऑनलाइन सर्वेक्षणामधील तयार करण्यात आलेल्या प्रतीक्षा यादीमध्ये समावेश नसलेल्या, यंत्रणेद्वारे अपात्र ठरलेल्या व सद्यस्थितीत पात्र असलेल्या कुटुंबाचे PM Awas Yojana - ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सुधारीत सर्वेक्षण केले जात आहे.
या सर्वेक्षणाची जबाबदारी संबंधीत गावातील ग्रामसेवकांवर सोपविण्यात आली आहे व स्वत: गावातील ग्रामस्थ देखील आपल्या mobile मधून online Gharkul सेल्फ सर्वे करीत आहेत तशी सेवा शासनाकडून ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सदरहू Online Gharkul Sarve ची अंतिम मुदत 30/04/2025 निश्चित करण्यात आलेली आहे. परंतु Online Gharkul Sarve करतांना ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. Awas plus Shelf Sarve करतांना नेटवर्कच्या अडचणीमुळे सर्वे होऊ शकत नाहीय.
आदिवासी पाड्यांमध्ये Mobile Network तसेच बऱ्याच ग्रामस्थांचे आधार अपडेट नाहीत व जॉब कार्ड संबंधित अडचणी असल्यामुळे Online Gharkul Sarve बऱ्याच जणांचे बाकी आहेत. म्हणून Gharkul Awas Plus Sarve ची मुदतवाढ 31/05/2025 पर्यत व्हावी यासंदर्भांत टीम बिरसा आर्मी, शिरपूर तालुका. यानी गट विकास अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.