![]() |
इंग्रजांनी भारतात सत्ता प्रस्तापित केल्यानंतर संपूर्ण भारताला गुलाम केले. या गुलामगिरीच्या वेढ्यातून भारतमातेला मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतीविरांनी स्मशेर हातात घेतले. त्यापैकी एक क्रांतिवीर म्हणजे खाज्या नाईक होय.
खाज्या नाईक हे एक असे वादळ होते की, ज्यांनी १८५७ च्या उठावात खान्देश भूमीचे नेतृत्व करून पाच पन्नास नव्हे तर तब्बल २००० पेक्षाही जास्त सेना दुर्गम डोंगराळ भागात रस्ते, वाहतुकीची सुविधा नसतांनाही उभारली व इंग्रजांविरुद्ध बंड पुकारुन इंग्रजांना सळो की पळो करून हैराण करून सोडले. याचाच सूड म्हणून इंग्रजांनी खाज्या नाईकच्या मृत्यू नंतरही त्याचे शीर आठ दिवस धरणगाव येथे निंबाच्या झाडाला टांगुन ठेवले.
खाज्या नाईकाचे या यूद्धात कौटूबीक नुकसानामुळे मानसिक खचीकरण झाले असले तरी इंग्रजांपुढे न झुकता आपले छुपे हल्ले चालूच ठेवले "आपल्या असंख्य साथीदारांचा मृत्यू, आपल्या कुटुंबाची झालेली वाताहत अनुभवूनही खाज्या नाईकाची हिंमत खचली नव्हती. ब्रिटीशांशी सामना देण्याची त्याची तयारी होती आणि तसा तो सतत लढतही राहिला.
अशा या क्रांतीविरानी आपल्या मातृभूमीला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आपल्या संपूर्ण परिवारासह तन मन धनाने सर्वस्वी अर्पण करून देशासाठी बलिदान दिले. परंतू अशा या खाज्या नाईकाचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा असा ओजस्वी आणि तेजस्वी असतांनाही मात्र त्यांच्या विषयी साध्या चार ओळीही कुठे पाठ्यपुस्तकात पहावयास मिळत नाही. हे खाज्या नाईकाचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
२) खाज्या नाईकांचा इतिहास उजेडात आणणे.
३) खाज्या नाईकच्या अंगी असलेले नेतृत्व गुणांचा अभ्यास करणे.
उद्दिष्टे :- History of Khajya Naik
१) खाज्या नाईक यांच्या १८५७ च्या उठावातील योगदानाचा अभ्यास करणे.२) खाज्या नाईकांचा इतिहास उजेडात आणणे.
३) खाज्या नाईकच्या अंगी असलेले नेतृत्व गुणांचा अभ्यास करणे.
संशोधन पद्धती:- History of Khajya Naik
प्रस्तुत शोधनिबंधात ऐतिहासिक विश्लेषणात्मक संशोधन पद्धतीचा वापर करून प्राथमिक व दुय्यम साधनांचा वापर करण्यात आला आहे.खाज्या नाईकाचे प्रारंभिक जीवन :-
खाज्या नाईकाचे वडील गुमानसिंग नाईक हे इंग्रजांच्या सैन्यात नोकरीला होते. त्यांच्याकडे खान्देश-मध्यप्रदेशाच्या सीमेवरील मुंबई, आग्रा रस्त्यावरील शिरपूर-सेंधवा घाटाची संरक्षणाची जबाबदारी देण्यात आली होती. त्याने "साधारण (१८१८ ते १८३१) अशी १३ वर्ष त्यांनी सेवा बजावली. त्याच्या प्रामाणिक कार्याची दखल घेत सरकारने गुमानसिंगाची जबाबदारी त्याचा मुलगा काजेसिंग (खाज्या नाईक) वर सोपवली." खाज्या नाईकाकडे सेंधवा घाटाची संरक्षणाची जबाबदारी देण्यात आली.![]() |
हा रस्ता व्यापारी दृष्ट्या अत्यंत महत्वाचा व घनदाट जंगलाचा असल्याने लुटपाट होण्याची जास्त भिती होती. मात्र खाज्या नाईकाने (१८३१ ते १८५१) या २० वर्षाच्या काळात एकही दरोडा, खून व चोरी होऊ दिली नाही. त्याच्या या प्रमाणिक सेवेमुळे ब्रिटिशांना मोलाची मदत झाली होती. परंतु १८५१ साली एका लुटारूला पकडून त्याची कबुली जबाब विचारताना मारहाण केल्याने लुटारू मरण पावला. यामुळे खाज्या नाईकाला खुनाच्या खटल्याखाली १० वर्षाची शिक्षा झाली.
खाज्या नाईक तुरुंगात जाताच सेंधवा घाटात चोर्यामाऱ्याचे, दरोडे, खूनाचे प्रमाण वाढले. शिवाय खान्देशात विविध भिल्ल टोळ्यांनी इंग्रजांना जेरीस आणले. यामुळे ब्रिटीश अधिका-यांच्या लक्षात आले की, जर खाज्या नाईकाला तुरुंगातून सोडले तर सर्व गोष्टीवर नियंत्रण मिळविता येईल. म्हणून खाज्या नाईकाने २० वर्ष प्रामाणिकपणे केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना चांगल्या वर्तणुकीचा दाखला देत पाच वर्ष आधिच त्यांची सुटका करण्यात आली व "इंग्रजांनी खाज्याला पुन्हा कामावर घेतले व एका लहानशा चुकीमुळे कॅ. बर्च यांनी अपमानित वागणूक दिली.
" या अन्यायकारक वागणुकीमुळे खाज्या नाईकाचा स्वाभिमान जागृत झाला व त्याला समजले की इंग्रज आपल्याला फक्त कामापुरते वापरून घेतात व काम संपले की विचारूनही पहात नाही. आपला वापर फक्त त्यांच्या स्वार्थासाठी केला जातो. त्यांना आपल्या जीवनाशी काहीही देणेघेणे नाही.
आपल्याच लोकांच्या कतली आपल्याच लोकांकडून केल्या जात आहेत. आपल्याच मातृभूमीवरील निसर्गातच मिळालेले आपले हक्क दूर करून त्यांचे वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न इंग्रज करीत आहेत. हे खाज्या नाईकाच्या लक्षात येताच त्यांनी इंग्रजांच्या सैन्याचा राजीनामा दिला व स्वतःच इंग्रजांविरुध्द नवीन सेना उभारण्यास सुरवात केली. याचवेळी उत्तर भारतात इंग्रजांविरुद्ध १८५७ च्या उठावाची वारे वाहू लागले होते.
खाज्या नाईकाचे सैन्य संघटन:-
खाज्या नाईकाने इंग्रजांविरुद्ध सैनिकांची जमवाजमाव करण्यास सुरवात केली. याचवेळी भीमा नाईक हा पराक्रमी शुरवीर नायक खाज्या नाईकाला येऊन मिळाला. या दोघांनी मिळून सैन्य जमवण्यास सुरवात केली. अल्पावधीतच खाज्या व भीमा नाईकांच्या नेतृत्वाखाली मेवासीय नाईक, महादेव नाईक, दौलू नाईक, अक्राणीचा काळुबाबा, आनंदा नाईक, भाऊसिंग रावळ, मंदाण्याचा रुमाल्या नाईक या सर्व आदिवासी प्रमुखांना व त्यांच्या हाताखाली असलेल्या सर्व सैन्यासह धार व इंदूरच्या राजांनी कमी केलेले अरब, रोहिले,मकरानी या सैनिकांना खाज्या नाईकांनी एकत्र आणले होते. ऐवढेच नव्हे तर आदिवासी स्त्रियांनीही या उठावात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. आपला लढा हा इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी आहे. म्हणून इंग्रजांच्या पदरी असलेल्या भारतीय पोलिसांनी आमच्या उठावात सामील व्हावे, अशी प्रेरणादायी सिंहगर्जना खाज्या नाईकांनी केल्याने अनेकांचे मत परिवर्तन झाले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
खाज्या व भीमा नाईकांनी जवळजवळ १५०० पेक्षा जास्त सैनिकांची जमवाजमव केली व १८५७ च्या उठावात "सातपुडा भागातील कजरसिंग नाईक व भीमा नाईक यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी पुनरुपी उठाव केला."" या उठवाला सुरुवात होताच हणमंतराव, मेवासी नाईक, आनंद यासह "खानदेशातील सगळ्या भागातून भिल्ल येऊन त्याच्या सैन्यात दाखल झाले. त्याने सुलतानपूरजवळच्या खेड्यांमध्ये दहशत निर्माण केली आणि सैंधवा घाट कब्जात घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या बैलगाड्यांवर करवसुली करण्यास सुरवात केली."
खाज्या नाईकाची कामगिरी :-
खाज्या व भीमा नाईकांच्या नेतृत्वाखाली मोठी फौज जमा झाली होती. परंतु एवढ्या मोठ्या फौजेसाठी हत्यारे, दारुगोळा, अन्नधान्य आणायचा कोतून असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. हा प्रश्न सोडविण्यासाठी इंग्रजांचा सरकारी खजाना, इंग्रजांना साथ देणारे व गरिबांना लुटणारे श्रीमंत व्यापारी, जमीनदार वर्ग, सावकार यांची धनवान गावे लुटून भागविण्याचे ठरविले आणि "२९ ओक्टोंबर १८५७रोजी खाज्या व भीमा नाईकाने शिरपूरवर हल्ला करून मोठी लुट मिळवली." त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न बर्च ने केला परंतु काही उपयोग झाला नाही. याचवेळी खाज्या नाईकांना खबर मिळाली कि इंदूरच्या राज्यातून ब्रिटीशांचा खजाना मुंबईला जाणार आहे. याचा फायदा खाज्या नाईकाने ३०० भिल्लांना सोबत घेऊन जांभळी चौकीजवळ सेंधवा घाटात १७ नोव्हेंबर १८५७ रोजी ब्रिटीशांचा ७ लाख रुपयांचा खजिना इंदोरहून मुंबईला जात होता. या खजिन्या बरोबर ब्रिटीशांनी २०० लोकांचे लष्कर होते.
असे असूनही काजी सिंगने खजिना लुटून ब्रिटीश सत्तेला हादरा दिला." ते ऐवढयावरच थांबले नाहीत तर काही दिवसात सरकारच्या मालकीच्या अफूच्या ६० बैलगाड्या टोलटॅक्स म्हणून लुटून घेतल्या. यासह एकामागुन एक असे पळासनेर, नंदुरबार, शहादा, सुलतानपूर, शिरपूर ही गावे लुटून या परिसरात मोठा दरारा निर्माण केला. इंग्रजांना आपल्या हालचाली टेलिफोन, पोस्ट ऑफीसमुळे कळतात म्हणून टेलिग्राफच्या तारा तोडून दळणवळण यंत्रणाच बंद पडाली तर सेंधवाचे पोस्ट ऑफिसही लुटून घेतले.
या संपूर्ण लुटीतून मिळालेल्या पैशातून सैन्यासाठी हत्यारे व अन्नधान्ये खरेदी करून काही रक्कम गरिबांना दान म्हणून वाटून देण्यात आली. यामुळे तो लोकांमध्ये अल्पावधितच लोकप्रिय झाला व त्याचे नेतृत्व सर्वांनी स्वीकारले. त्या काळामध्ये जमीनदार, सावकार, ब्रिटीश यांच्याकडून गरिबांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात होती.
त्यांचे सर्वत्र दबदबा व वर्चस्व असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध बंड करण्याचे धाडस कोणामध्येही नव्हते. मात्र ते धाडस खाज्या नाईकाने केले. गरिबांना लुटणारे ब्रिटीश, सावकार, जमीनदार यांच्यावर ते वाघासारखे तुटून पडत असे व गावाचे गावे लुटून काही क्षणात अदृश्य होत. मिळालेल्या खजिन्यातून सैन्याचे व गरिबांची पोटापाण्याचा प्रश्न सोडवत असे.
त्यांच्या या कार्यामुळे अनेकांनी त्यांची प्रेरणा घेऊन इंग्रजांविरुद्ध खाज्या नाईकाला साथ दिली. याचा प्रत्यय ज्यावेळी मेजर इव्हान्स बडवानिजवळ खाज्या नाईक व त्याच्या साथीदारांना गाठण्यास यशस्वी झाला होता, तेव्हा "बडवानीचा कोतवाल त्याला सामोरा गेला. मेजर इव्हान्सने खाज्या नाईक, भीमा नाईक यांच्याबाबत वारंवार विचारूनही कोतवालाने त्याला काही पत्ता लागू दिला नाही.
यावरून समजते की खाज्या नाईक लोकांना प्रिय असून त्याला लोकांची साथ होती, कोतवालाला खाज्या नाईकच्या ठिकाणांची माहिती असतानाही त्याने इंग्रजांना त्यांचा पत्ता दिला नाही.
आंबापाणीचा वेढा खाज्याने तोडला :-
खाज्या नाईकाने इंग्रजांविरुद्ध केलेले उठाव, खजिन्याची लूट या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या इंग्रजांना खाज्या नाईकचा बंदोबस्त करणे आवश्यक होते. त्यामुळे मेजर इव्हान्सने कॅप्टन बर्ज, सर फ्रैंक, लेफ्टनंट कागलन यांच्या मदतीने खाज्याच्या बंदोबस्तासाठी जय्यत तयारी करण्यात आली. यासाठी शिस्तबद्ध सैनिकांची संख्या वाढविण्यात आली."लेफ्टनंट केनेडी, मेजर इव्हान्स, कर्नल बर्ज, कॅप्टन ब्रिग्ज, कर्नल औट्रम यासारख्या लष्करी हुद्द्याच्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका भिल्लांच्या (खाज्याचा) उठावासाठी करण्यात आल्या." इंग्रजांना गुप्तहेरांकडून खाज्या नाईकच्या ठिकाणाची बातमी लागली होती. खाज्या व भीमा नाईक त्यांच्या साथीदारांसोबत सातपुड्याच्या डोंगरात महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या आंबापानीच्या ठिकाणी मुक्कामाला आहेत.
ही बातमी इंग्रजांना लागताच नऊ पलटणींना घेऊन मेजर इव्हान्सने सुसज्ज प्रशिक्षित अशी कवायती सैन्य घेऊन आंबापाणीला चौबाजूनी मजबुत वेढा दिला. सकाळी ८.०० वाजेच्या सुमारास आंबापानी येथे ११ एप्रिल १८५८ रोजी घनघोर युद्धाला सुरुवात झाली. या युद्धात खाज्या नाईक, भीमा नाईक, दौलतसिंग, काळूबाबा, पौलादसिंग, दौलत नाईक, बारवाणीचे राजे, सिद्दी, मकरानी, अरब, रोहिले व आदिवासी स्वियाच्या नेतृत्वासह ३००० भिल्लांनी या युद्धात मोठ्या संख्येने सहभाग घेऊन इंग्रजांशी मोठा संघर्ष केला.
या घनघोर झालेल्या लढाईत "भिल्ल नेते काजीसिंग, दौलतसिंग व काळूबाबा हे होते. ते निकराने लढले, इंग्रज सेनेला त्यांनी पूरा मार दिला. सैन्याने मोठा पराक्रम गाजवला कॅप्टन बर्च, लेफ्टनंट बेसवी हे अधिकारी जखमी झाले व एक हिंदी अधिकारीही मारला." तर १६ इंग्रज सैनिकांना ठार मारले. यात खाज्या नाईकच्या सैन्याचेही मोठे नुकसान झाले.
या घनघोर झालेल्या लढाईत "भिल्ल नेते काजीसिंग, दौलतसिंग व काळूबाबा हे होते. ते निकराने लढले, इंग्रज सेनेला त्यांनी पूरा मार दिला. सैन्याने मोठा पराक्रम गाजवला कॅप्टन बर्च, लेफ्टनंट बेसवी हे अधिकारी जखमी झाले व एक हिंदी अधिकारीही मारला." तर १६ इंग्रज सैनिकांना ठार मारले. यात खाज्या नाईकच्या सैन्याचेही मोठे नुकसान झाले.
त्यात खाज्या नाईकचा एकुलता एक मुलगा पोलादसिंग यासह ६४ आदिवासी वीरांना वीरमरण आले. १७० लोक जखमी झाले. ७२ जणांना इंग्रजांनी कैद केले. त्यापैकी ५५ जणांना ११ एप्रिल व उरलेले १७ जणांना १२ एप्रिल १८५८ रोजी सामुदायिक मृत्युदंड देऊन लष्करी ढोल वाजवून एका रांगेत उभे करून गोळ्या घालून ठार मारण्यात आले. पोलीस सुपेरिटेण्डेण्ट वुडच्या पत्रानुसार ४५० बंडखोरांना अटक करण्यात आली. यात स्त्रियांचाही समावेश होता.
खाज्या नाईक यांची पत्नी तुलसी नाईक, काजीसिंगची बहीण, सून, मेवासीया, भाऊ रावळ यांच्या पत्न्या यासह भीमा नाईकांची पुतणीही या युद्धात सहभागी झाल्या होत्या. त्या या संघर्षात अग्रस्थानी होत्या.
खाज्या नाईकांच्या तर संपूर्ण कुटुंबांनीच सहभाग घेतला होता. खाज्या नाईकचा मुलगा पौलादसिंग इंग्रजांशी लढता लढता रनमैदानातच शहीद झाले. तर त्याच्या पत्नीला लष्करी ढोल वाजवून ठार मारण्यात आले. इंग्रजांनी सर्व बाजूने वेढा देल्यामुळे कधी न हाती लागणारा खाज्या नाईक आपल्या या मजबुत वेढयात लवकरच पकडला जाईल असा पूर्ण विश्वास इंग्रजांना वाटत होता.
हेही वाचू शकता. "जागतिक आदिवासी दिवस" का म्हणून साजरा केला जातो.
परंतु इंग्रजांचा शिस्तबद्ध असा मजबूत वेढा असताना देखील हा वेढा तोड्नइंग्रजांच्या हातावर तुरी देऊन खाज्या नाईक सुखरूप निसटले होते. इंग्रजांना खाज्या नाईकाला पकडण्यात अपयश आल्याने त्यांनी खाज्या नाईकाने शरण यावे यासाठी त्यांच्या बहिणीला व पत्नी तुळसी नाईक यांच्यासह ४०० खियांना इंग्रजांनी कैद केले. स्त्रियांना लाता बुक्यांनी मारणे.
"स्त्रियांच्या गुप्तांगात मिरची पावडर भरणे व वक्षः स्थळांना डाग देणे अशा प्रकारचा अमानुष छळ केला" जेणेकरून खाज्या नाईक ब्रिटिशांना शरण येईल. परंतु मातृभूमीच्या स्वातंत्र्य प्रेमाने भारवलेल्या आदिवासी महिलांनी देश स्वातंत्रासाठी सर्व काही हालअपेष्टा सहन केल्या परंतु इंग्रजांपुढे दयेची भिक माघीतली नाही.
खाज्या नाईकाचे या यूद्धात कौटूबीक नुकसानामुळे मानसिक खचीकरण झाले असले तरी इंग्रजांपुढे न झुकता आपले छुपे हल्ले चालूच ठेवले "आपल्या असंख्य साथीदारांचा मृत्यू, आपल्या कुटुंबाची झालेली वाताहत अनुभवूनही खाज्या नाईकाची हिंमत खचली नव्हती. ब्रिटीशांशी सामना देण्याची त्याची तयारी होती आणि तसा तो सतत लढतही राहिला.
खाज्या नाईकाने शरण यावे यासाठी ''ब्रिटीश सरकारने खाजा नाईकाला बिनशर्त माफी जाहीर केली. पण तो शरण आला नाही. त्याने छोट्या-मोठ्या चकमकी व लुटालूटी चालूच ठेवल्या. अंबापानीच्या पराभवाचा बदला नांदगाववर हल्ला करून घेतला. १८५९ जानेवारीत त्याने चाळीसगावला धाडसी दरोडा टाकला येथे इंग्रजांच्या अनेक सैनिकांना ठार केले व अनेकांना जखमी करून इंग्रजांचा बदला घेतला. पुढेही इंग्रजांविरुद्ध ठिकठिकाणी लुटालुटीचे सत्र चालूच ठेवून इंग्रजांना सळो की पळो करून हैराण करून सोडले.
![]() |
इंग्रजांच्या हाती खाज्या नाईक लागत नसल्याने त्याला पकडण्यासाठी २००० चे बक्षीस जाहीर केले. त्यांचा बंदोबस्त फितुरीच्या मार्गाने करण्याचे ठरविले. यात कपटाने कट रचून खाज्या नाईकांच्या अंगरक्षकाला लाच देऊन आपल्या बाजूला वळविले. नोकरीत बढती व पैशाच्या लोभापायी त्याच्याच अंगरक्षक रोहीद्दिन मकरानी याने खाज्या नाईक बेसावध असताना १८६० रोजी त्याच्या पाठीत गोळ्या घातल्या व इंग्रजांचे बक्षीस मिळवण्यासाठी पुरावा म्हणून इंग्रजांना खाज्या नाईकाचे शीर कापून धरणगावला पाठविण्यात आले.
हे "शीर ब्रिटीशांनी धरणगाव येथे बखारीजवळ आठवडाभर कडूलींबाच्या झाडाला टांगून ठेवले. जेणे करून लोकांमध्ये दहशत निर्माण व्हावी, आदिवासी बंडखोरांनी पुन्हा बंड करू नये, त्यांच्या या कारवायांवर वचक बसावे, ऐवढेच नव्हे तर इंग्रजांचे वर्चस्व निमूटपणे मान्ये करावे, पुन्हा असा क्रांतीवीर निर्माण होऊ नये म्हणून. एक सच्या क्रांतीविराची मृत्युनंतरही करूरतेणे विटंबना करण्यात आली.
अशाप्रकारे देशाच्या स्वतंत्र्यासाठी तन, मन, धनाने सर्वस्व अर्पण करून आपल्या परिवारासह देशासाठी बलिदान देणाऱ्या १८५७ च्या उठावातील खान्देशाचे नेतृत्ववीर खाज्या नाईक मात्र आजही इतिहासाच्या पानापासून दुर्लक्षित आहेत. हिच एक मोठी शोकांतिका आहे.
२) खान्देशातील दुर्गम भागातही खाज्या नाईकाने मोठे सैन्ये बळ उभारले हाते.
३) खाज्या नाईकाच्या अंगी नेतृत्व गुण असल्यामुळेच अनेक आदिवासी प्रमुखासह, सैन्य व महिलांनीही मोठी साथ दिली होती.
४) इंग्रजांचे वर्चस्व खाज्या नाईकाला मान्य नव्हते.
निष्कर्ष :
१) खान्देशात १८५७ च्या उठावात खाज्या नाईकची भूमिका महत्वपूर्ण होती.२) खान्देशातील दुर्गम भागातही खाज्या नाईकाने मोठे सैन्ये बळ उभारले हाते.
३) खाज्या नाईकाच्या अंगी नेतृत्व गुण असल्यामुळेच अनेक आदिवासी प्रमुखासह, सैन्य व महिलांनीही मोठी साथ दिली होती.
४) इंग्रजांचे वर्चस्व खाज्या नाईकाला मान्य नव्हते.