सरपंचासह ग्रामसेवकाचा जामीन / Sarpanch and Gram Sevak
Admin
12:17 PM
0
Bail granted to Sarpanch and Gram Sevak : सरपंचासह ग्रामसेवकाचा जामीन अर्ज फेटाळला, बेटावद ग्रामपंचायत अपहार प्रकरणी न्यायालयाचे आदेश.
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील बेटावद ग्रामपंचायतीच्या अपहार प्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी सरपंच सुशीलाबाई कोळी व ग्रामसेवक संतोष राठोड या दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. शिंदखेडा तालुक्यातील बेटावद Gavat Zali Aahe.
ग्रामपंचायतीत संशयित आरोपी
तत्कालीन ग्रामसेवक संतोष मानसिंग राठोड व महिला सरपंच सुशीलाबाई आत्माराम कोळी यांनी संगनमताने सुमारे १२ लाख ४९ हजार २९६ रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी विस्तार अधिकारी महेशकुमार सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नरडाणा पोलिसात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघा संशयित आरोपींकडून अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. अर्जाच्या सुनावणीच्या वेळी जिल्हा सरकारी वकील अॅड. देवेंद्रसिंह तंवर
या म्हणाले, गुन्ह्याचा तपास सुरू असताना
पाणीपट्टी किंवा भूमीगत गटारीचे काम, नळ जोडणी, गुरांचा हाळ यांची विकास कामे केलेली नव्हती. तसेच समितीच्या अभियंत्याने स्वतः सर्वेक्षण करून कामकाज झाल्याचे प्रमाणपत्र दिलेले नाही. तरी देखील बनावट मूल्यांकन प्रमाणपत्राच्या आधारे कंत्राटदाराला पैसे अदा करण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आल्याचा युक्तिवाद अॅड. तंवर यांनी केला.
दोघांनी अपहार केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास तत्कालीन महिला सरपंच सुशीलाबाई कोळी व तत्कालीन ग्रामसेवक संतोष मानसिंग राठोड या दोघांनी संगनमताने सुमारे १२ लाख ४९ हजार २९६ रुपयांचा अपहार केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. याशिवाय बेटावद ग्रामपंचायत येथील सन २०२१-२२ या वर्षाचे लेखापरीक्षण झाले असून, लेखापरीक्षकांनी बेटावद ग्रामपंचायतच्या लेखापरीक्षण अहवालात कामांचे मूल्यांकन नसतानाही दाखविले आहे. त्यामुळे ते दोघे दोषी आढळून येत आहेत.
युक्तिवाद ग्राह्य Bail granted to Sarpanch and Gram Sevak
जामीन अर्जाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायमूर्ती डी. एम. आहेर यांच्या न्यायालयापुढे झाली. सुनावणीवेळी न्यायालयात सरकारी वकील अॅड. देवेंद्रसिंग तंवर यांनी सरकारी पक्षाकडून प्रखर युक्तिवाद केला. यावेळी न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरून दोघा संशयित आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.