![]() |
शेवगाव नगर परिषद स्थापनेपासून आजपर्यंत शेवगाव शहरातील व्यवसायीकांनी जी नियमबाह्य बांधकामे केली त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्वरित पाडावेत ! यासाठी वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव नगर परिषद समोर जोरदार "थाली बजाओ" आंदोलन
Vanchit Bahujan Aghadi अविनाश देशमुख शेवगांव ] 9960051755
तारीख :-19 मार्च 2025 गुरुवार ~ या बाबतचे सविस्तर वृत्त असे की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेवगाव नगर परिषदेस दिलेल्या लेखी निवेदनास अनुसरून शेवगाव नगर परिषद स्थापनेपासून आजपर्यंत शेवगाव शहरातील व्यवसायीकांनी जी नियमबाह्य बांधकामे केली.
त्या धनदांडग्यांची नियमबाह्य बांधकामांची चौकशी करून सदरची बांधकामे निष्कासित करावी या करिता आज गुरुवार दि २०-३-२०२३ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांच्या नेतृत्वात जोरदार थाली बजाओ आंदोलन करण्यात आले यावेळी शेवगाव नगर परिषदेचे निष्क्रिय अधिकारी तसेच मनमानी, अरेरावी करणारे अधिकारी विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या
या प्रसंगी शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई, अरूण झांबरे पाटील,ऑगस्टीन गजभीव, राजूशेठ आहुजा,विजयकुमार शहाणे, भगवान भागवत सर,रवींद्र निळ, शेख सलीम जिलाणी, सागर गरुड, सुरेश जाधव,प्रमोद गजभीव,बर्वे मामा, शेख नबीभाई,
बाळासाहेब साळवे, दिपक गायकवाड,संजय निकाळजे, अनिल चव्हाण, सचिन पिपंळे, ज्ञानेश्वर ताकवाले, अनिल काळे, कैलास धुमाळ, सोमनाथ ढाकणे, विशाल फलके,अन्वर सैय्यद, यांच्या सह उपनगराध्यक्ष सागर फडके नगरसेवक शब्बीर शेख व इतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवगाव नगर परिषदेने नगर परिषद स्थापन झाल्या पासून ची सर्व व्यावसायिक बांधकामा ची सखोल चौकशी करून परवानगी देतांना ज्या अटी आणि शर्ती नगर परिषणने घालून दिलेल्या आहेत त्यांची काटेकोर अंमलबजावणी केली नसेल त्यांची चौकशी करून ती नियमबाह्य ठरवून निष्काशीत करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने
तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले प्रा किसन चव्हाण म्हणाले की गोरगरीब टपरी धारकांना वेगळा नियम व धनदांडग्यांना वेगळा नियम असे वंचित बहुजन आघाडी खपवून घेणार नाही अन्याय अत्याचारा विरोधात नेहमी लढा देत राहील
ताजा कलम Vanchit Bahujan Aghadi
सार्वजनिक बांधकाम विभाग नगरपरिषद शेवगांव महसूल विभाग शेवगांव व पोलीस प्रशासन शेवगांव यांच्या बंदोबस्तात मागील महिन्यात राज्य महामार्गाच्या दुतर्फा 15 मीटर पर्यंत गोरगरीब टपरीधारकांचे व 12 मीटर पर्यंत धनदांडग्यांची अतिक्रमण हटविली
त्यात अनेक व्यापारी संकुल शैक्षिणक संस्था जुन्या गावपुढाऱ्यांचे कॉम्प्लेक्स वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न काही गावपुढाऱ्यानी प्रशासनातील काही झारीतील शुक्राचार्यांनी केला पण कारवाई मध्ये सब घोडे बारटक्के असतात हे कोण दाखवुन देणार पैठण रोड आंबेडकर चौक मीरी रोड या भागात अतिक्रमण तोंड पाहुन पाडल्याची भावना सर्वसामान्य शेवगावकरांमध्ये आहे या बांधकामावर हातोडा कधी चालवणार प्रशासन ? एक चर्चा.
क्रमशः Vanchit Bahujan Aghadi
शहर विकास आराखडा DP प्लॅन मध्ये शेवगांव शहराच्या सर्व मुख्य बाजारपेठा 40 ते पन्नास फुटांच्या आहेत मुख्याधिकारी म्याडम घ्या मनावर
अविनाश देशमुख शेवगांव सामाजिक कार्यकर्ता पत्रकार