![]() |
विषय :- प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत पात्र कुटुंबाचे सर्वेक्षण करणेबाबत. PM Awas 2.0 sarve
- संदर्भ: १) उप महानिदेशक, ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र क्र.No.J-११०१४/१/२०२४-RH-Pol. (९-३८७५७९), दि. १४ ऑगस्ट, २०२४ रोजीचे पत्र.
- २) संचालक, ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र क्र.No.M- १२०१८-RH-(M&T) Part (१), दि. २२ ऑगस्ट, २०२४ रोजीचे पत्र
- ३) संचालक, ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांचे कडील पत्र क्र.No.M-१२०१८/०२/२०१९-RH (M&T) (e-३६८१४६), दि.२७/१२/२०२४.
सुधारीत Exclusion Criteria पुढील प्रमाणे आहेत.
१) तीन/चार चाकी वाहन असणारे कुटूंबे.२) तीन/चार चाकी कृषी उपकरण असणारे कुटूंबे/
३) रु. ५०,००० किसान क्रेडिट कार्ड किंवा त्याहून अधिक क्रेडिट मर्यादा असलेले कुटूंबे.
४) कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी असलेले कुटूंबे,
५) शासनाकडे नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग असलेली कुटुंबे,
६) कुटुंबातील कोणताही सदस्य दरमहा रु. १५,००० पेक्षा जास्त कमवत असलेले कुटूंबे.
७) आयकर भरणारे कुटुंबे.
८) व्यवसायीक कर भरणारे कुटुंबे.
९) २.५ एकर किंवा त्याहून अधिक बागायती जमीन असणारे कुटूंबे.
१०) ५ एकर पेक्षा जास्त परंतु जिरायती जमीन असणारे कुटूंबे.
त्यानुसार, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत पात्र कुटुंबाचे सुधारीत Exclusion Criteria नुसार सर्वेक्षण करण्यासाठी संदर्भ क्र. २ अन्वये, सुधारीत Awaas+ मोबाईल अॅपमध्ये सर्वेक्षकाची नोंदणी करणेबाबत ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांनी कळविले होते. त्यानुसार राज्यामध्ये Awaas+ २०२४ मोबाईल अॅपमध्ये सर्वेक्षण करण्यासाठी सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची (ग्रामसेवक / ग्राम विकास अधिकारी) सर्वेक्षक (Surveyor) म्हणून ग्रामपंचायत निहाय नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. संदर्भ क्र.३ अन्वये, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत सुधारीत आवास प्लस २०२४ मोबाईल अॅपद्वारे सर्वेक्षण करण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत आदर्श कार्यपध्दती (SOP) प्राप्त झाली असून, त्यामध्ये पुढील प्रमाणे Modules दिले आहेत.
याबाबत सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी जसे प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, गट विकास अधिकारी, पंचायत समिती व ग्रामपंचायत अधिकारी यांचे ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार ऑनलाइन पद्धतीने वेबीनारद्वारे दोनवेळा orientation करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना -ग्रामीण टप्पा-२ PM Awas 2.0
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा २ अंतर्गत सर्वेक्षणाची सर्व जिल्ह्यामध्ये सर्व सामान्य जनतेला त्याची माहिती करुन द्यावी व प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा २ अंतर्गत पात्र कुटुंबाचे (Potentially eligible households under PMAY-G) सर्वेक्षण करण्याची कार्यवाही विहीत वेळेत पूर्ण करावी अशा सूचना ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांनी दिल्या आहेत.या सर्वेक्षणाकरिता खालीलप्रमाणे मनुष्यबळ-पद
१ सर्वेक्षक (Surveyor) पद ग्रामपंचायत अधिकारीकामाचे स्वरुप
आवास प्लस सर्वेक्षणामध्ये तयार करण्यात आलेल्या प्रतिक्षा यादी (Priority List) मध्ये समाविष्ट न झालेले व सिस्टीमद्वारे अपात्र झालेले पंरतु सद्यस्थितीत पात्र असलेले कुटुंबाचे प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत सुधारित Exclusion Criteria नुसार सर्वेक्षण करणे.![]() |
या सर्वेक्षणाचे नियोजन व सनियंत्रण करण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करावी..
- १. जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (अध्यक्ष),
- २. जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी (सदस्य).
- ३. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (सदस्य सचिव)
This comment has been removed by the author.
ReplyDelete