![]() |
'हमरा भोंगऱ्या आयो रे भाया, हमरो भोंगऱ्या देखने आवजो रे भाया, शिरपूर तालुक्यातील १६ गावात आज ७ मार्चपासून भोंगऱ्या बाजाराची धाम धूमया
From today, Bhongriya Bazaar will be the place to be. /-शिरपूर आदिवासी समाज बांधवांसाठी होळी हा महत्वपूर्ण मुख्य सण असून सर्वाधिक महत्व आहे.
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्याचील १६ गावात आज शुक्रवार (ता. ७) मार्चमासून 'भरल्या जाणाऱ्या भोंगऱ्या बाजाराचे वेध सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्यागावांमध्ये लागले असून, सीमा लगत मध्येप्रदेशातील आदिवासी गावे या बाजारासाठी सज्ज झाली आहेत. आदिवासी बांधवांना होळीचे वेध लागले असून 'हमरा भोंगऱ्या आयो रे भाया हमरा भोंगऱ्या देखने आवजो रे भाया... असा सूर कानी पडण्यास सुरुवात झाली आहे. होळीच्या पूर्वसंध्येला भरणाऱ्या बाजाराला भोंगऱ्या बाजार म्हटले जाते.
भोंगऱ्या उत्सवात सहभागी होण्यासाठी राज्यासह परराज्यात कामानिमित्त गेलेले आदिवासी बांधव तसेच अन्य मान्यवर मोठ्या संस्ख्येने होळी सण साजरा करण्यासाठी आपल्या मूळ गावी येत असतांना दिसत आहे. आदिवासी सण-परंपरेमध्ये होळीला सर्वाधिक महत्व आहे. होळीपूजनासाठी आवश्यक डाळ्या, खोबरे, खजूर आदिनेवेद्यसह साहित्याची खरेदी करण्यासाठी भोंगऱ्या बाजार भरविण्यात येतो.
भोंगऱ्या उत्सवात सहभागी होण्यासाठी राज्यासह परराज्यात कामानिमित्त गेलेले आदिवासी बांधव तसेच अन्य मान्यवर मोठ्या संस्ख्येने होळी सण साजरा करण्यासाठी आपल्या मूळ गावी येत असतांना दिसत आहे. आदिवासी सण-परंपरेमध्ये होळीला सर्वाधिक महत्व आहे. होळीपूजनासाठी आवश्यक डाळ्या, खोबरे, खजूर आदिनेवेद्यसह साहित्याची खरेदी करण्यासाठी भोंगऱ्या बाजार भरविण्यात येतो.
हेही वाचा 👉 : विश्व् भोंगऱ्या बाजार हाट ची माहिती
या बाजारात आदिवासी बांधव एकत्र जमतात. एकमेकांची ख्यालीखुशाली विचारतात. पारंपारिक वेषभूषा परिधान करुन ढोल, बासरी, कास्याचीथाळी वर सामूहिक नृत्य करून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडते. संसारोपयोगी वस्तू व मेवामिठाईची दुकानेही या बाजारात लावली जातात. यात लाखो रुपयांची उलाढाल होत असते.शिरपूर तालुक्यातील १६ गावांत सात मार्चपासून भोंगऱ्या बाजार भरविण्यात येणार आहे. India's history-making Bhongriya Bazaar festival begins today Time table
- ७ मार्चला सांगवी, वरला,
- ८ मार्चला पळासनेर, भोईटी,
- ९ मार्चला हाडाखेड, रोहिणी,
- १० मार्चला शिरपूर, महादेव दोंदवाडा,
- ११ मार्चला सुळे, आंबे, फत्तेपुर
- १२ मार्चला पनाखेड, कोळीद, दहिवद,
- १३ मार्चला बोराडी, लाकड्या हनुमान व लौकी
- येथे भोंगऱ्या बाजार भरविण्यात येणार आहे.
पहिली होळी कधी पासून सुरवात होणार?
१ ३ मार्च रोजी बुडकी, नवागाव व सामऱ्यापाडा येथे मानाची होळी उत्सव सुरवात होणार आहे, तर १४ मार्चला आदिवासी गाव-पाड्यावर सरकारीहोळीचा सण साजरा केल्यानंतर १४ मार्चला चाँदीपाडा, १५ मार्चला दुर्बड्या तर १६ मार्चला शेमल्या येथे मेलाद्याचा उत्सव होऊन भोंगऱ्या पर्वाची सांगता होणार आहे. India's history-making Bhongriya Bazaar festival begins today
आपल्या सर्वांची आपली सामाजिक जबाबदारी.!
महाराष्ट्र व मध्यप्रदेश सातपुड्याच्या कुशीतील आदिवासींचा सर्वात मोठा उत्सव होळी - भोंगऱ्या हाट(बाजार) आज ७ मार्च शुक्रवार पासून मोठ्या उत्साहात व मोठ्या अभिमानाने सुरू होतोय ह्यानिमित्त आलेल्या सर्व बांधवांचे आदिम सहर्ष स्वागत आहे.
ह्यानिमित्त आपण सर्वांना आपली सामाजिक जबाबदारी म्हणून सांगावेसे वाटते की, जिथं जिथं भोंगऱ्या मेवादा बाजार आहे तिथं आलेल्या प्रत्येक तरुणांनी आलेल्या आपल्या माता भगीनींची सुरक्षाच सर्वांची आपली प्राथमिकता ठेऊन भोंगऱ्या बाजार सुरक्षित व सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी प्रत्येकाने घेऊन एक आदर्श सण आदर्श समाज म्हणून पुढे आणणे पुढे येणे काळाची गरज आहे.!
भोंगऱ्या बाजाराविषयीचे गैरसमज थांबवा.! Dr. हिरा पावरा
भोंगऱ्या बाजाराविषयी कोणी सोशल मिडियाद्वारे अपूर्ण माहितीच्या आधारावर गैरसमज करणाऱ्या बातम्या जाणूनबुजून पसरवत असेल तर जयस संघटन व आदिवासी समाजाकडून मानहानी दावा करायचा विचार केला जाईल.!
महाराष्ट्र व मध्यप्रदेश सातपुड्याच्या कुशीतील आदिवासी समाजाचा सर्वात मोठा उत्सव होळी - भोंगऱ्या हाट(बाजार) आज ७ मार्च शुक्रवार पासून मोठ्या उत्साहात व मोठ्या अभिमानाने सुरू झालाय याप्रसंगी अनेक समाजमाध्यम अथवा सोशल मीडिया द्वारे भोंगऱ्या बाजारात असणाऱ्या चांगल्या रूढी परंपरा चांगल्या प्रथा ह्यांचा प्रचार प्रसार न करता काही तथाकथित लोकांकडून एकिव माहितीच्या आधारावर ह्या आदिवासी संस्कृती विषयी गैरसमज पसरवित असतात. ही बाब आदिवासी समाजाला वेदनादायी व आदिवासींच्या अभ्रुसाठी निंदनीय आहे असे आम्ही कायम सांगत आलेलो आहे.!
सोशल मीडियाद्वारे असे वर्तन कोणी करत असेल तर आम्ही समाजाकडून अश्या खोट्या दाव्यांविरोधात कायद्याच्या कचाट्यात अभ्रूनुकसान मानहानी दावा ठोकू शकतो. आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा. Link.
आपलाच समाजबांधव
- डॉ.हिरा पावरा
- जयस, महाराष्ट्र
📞 9975085483