![]() |
Bekaydeshir Gatirodhank Viridha Arj Namua : बेकायदेशीर उभारण्यात आलेले गतिरोधक विरुद्ध अर्ज नमुना
- प्रति,
- मा.आयुक्त
- वसई विरार शहर महानगरपालिका,
- विरार पूर्व,ता.वसई,जि. पालघर.
- विषय :- वसई विरार शहर महानगरपालिका परिसरातील, इंडियन रोड काँग्रेस स्टॅंडर्ड मधील नियम व तरतूदींचे उल्लंघन करून बेकायदेशीर उभारण्यात आलेले गतिरोधक तात्काळ हटवून इंडियन रोड काँग्रेस स्टॅंडर्ड प्रमाणे उभारण्यात येणे बाबत.
उपरोक्त विषयान्वये अत्यंत गंभीर बाब आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की,वसई विरार शहर महानगरपालिका अधिनस्त परिसरात इंडियन रोड काँग्रेस स्टॅंडर्ड चे उल्लंघन करून उभारण्यात आलेले गतिरोधक बेकायदेशीर असून,शहरात अनेक ठिकाणी टाकण्यात आलेले बेकायदेशीर गतिरोधक अपघातांना रोखण्यासाठी टाकण्यात आलेले आहेत.
मात्र हेच गतिरोधक अपघातांना नीमंत्रण देत आहेत. त्यामुळे अनेक गंभीर स्वरूपाचे आजारांनी वसई विरार कर त्रस्त होत असून पाठ, मान, मणक्याचे आजार गंभीर होत असतांनाही प्रशासन मात्र साखर झोपेत आहे. दररोज गतिरोधकाच्या त्रासामुळे दवाखान्यात जाणाऱ्यांची संख्या मात्र वाढली आहे.
वाहनांच्या वेगावर मर्यादा आणण्यासाठी रस्त्यावर बसवल्या जाणाऱ्या गतिरोधकांसाठी आखून दिलेल्या नियमांची सर्रास पायमल्ली केली जात असून रस्त्यावरील गतिरोधकांची उंची आणि अरुंद विस्तार वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.तसेच स्कूल बस मधून प्रवास करणाऱ्या चिमुकल्यांना व हॉस्पिटल ला जाता - येताना गरोदर स्त्रियांना सुद्धा याच्या मोठा सामना करावा लागत आहे.
तरी वरील जनतेच्या मूलभूत प्रश्नावर गंभीरपणे विचार करून व विषयांकित मुद्यांच्या अनुषंगाने त्वरित कार्यवाहीला सुरवात करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल नोंदणिकृत टपालाने उपलब्ध करून देण्यात यावा ही विनंती.
- कळावे,
- आपला विश्वासूं,
- श्री अनंत पुंडलिक पाटील
- माहिती अधिकार वापरकर्ता व सुप्रशासन कार्यकर्ता
- पत्ता :- रु.नं. 101,रामबलराम अपा., प्रथमेश नगर,
- फूलपाडा रोड,विरार पूर्व,ता.वसई,जि. पालघर.
मो.नं. :- 7083315588
ईमेल :- anantpatilapp@gmail.com
प्रमाणित स्पीड ब्रेकरचा आग्रह धरा. चूकीच्या स्पीड ब्रेकरचा विरोध करा. Bekaydeshir Gatirodhank Viridha Arj Namua
इंडियन रोड काँग्रेस या संस्थेच्या स्टैंडर्डनुसार नुसार रस्त्यावरील स्पीडब्रेकरच्या गोलाकार कुबडाची उंची ०.१० मिटर आणि रुंदी ३.७मिटर्स असणे आवश्यक आहे. पण आपल्या देशात ९० टक्के स्पीडब्रेकर बांधताना हे प्रमाण पाळले गेलेले नाही. स्पीडब्रेकर बांधणारे इंजिनिअर (अपवाद वगळता) बेजबाबदार आहेत आणि वाहनचालक नियम व शिस्त पाळत नाहीत.चूकीच्या स्पीडब्रेकर मुळे जेष्ठ नागरिकांना मणक्याचे आजार वाढले आहेत. तर अप्रमाणीत स्पीडब्रेकर वर झटका बसल्यामुळे गरोदर स्त्रिया दवाखान्यात पोहचण्यापूर्वीच बाळंत झाल्याची उदाहरणे आहेत. जागरूक नागरिक म्हणून आपल्या भागातील स्पीडब्रेकर्स वरील स्टेंडर्डनुसार आहेत का ? हे तपासा. आणि नसल्यास संबंधीत बांधकाम विभागाकडे तक्रार करा. आणि चूकीचे स्पीडब्रेकर्स हे इंडियन रोड कॉग्रेसच्या स्टैंडर्ड प्रमाणे तयार व दुरुस्त करण्याची लेखी मागणी करा.