![]() |
Application form for installation of CCTV cameras in private and government schools : खाजगी शाळा व सरकारी शाळा मध्ये CCTV cameras बसवने, अर्ज नमुना.
- प्रति,
- मा.संपादक/वार्ताहर
महाराष्ट्रा राज्यात बदलापूर व पुणे जिल्ह्यातील तालुका मळद गांवात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक पाचपुते जिल्हा अध्यक्ष ज्ञानमाता सहभागी संस्था यांनी आज भास्कर पाटील शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद यांना ई-मेल द्वारे निवेदन दिले आहे.
खाजगी शाळा व सरकारी शाळा मध्ये सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवने,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी,तक्रार पेटी, सखी सावीत्री समिती बाबतच्या तरतुदीचे अनुपालन,विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रस्तावित गडन,राज्य सदस्य विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती यांनची अंमलबजावणी करण्याची मागणी दीपक पाचपुते यांनी गट भास्कर पाटील शिक्षण अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.
दि.७ एप्रिल २०१६,दि.०५ मे २०१७, दि.१० मार्च २०२२,दि.१३ मे २०२२ व दिनांक २१ ऑगस्ट २०२४ च्या परिपत्रक कायदयाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी मागणी केली आहे. खाजगी शाळा व सरकारी शाळा मध्ये हया कायदया प्रमाणे तातडीने गटशिक्षण आधिकारी यांनी पत्रव्यवहार करून अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. जेणे करून अशा घटना भविष्यात घडणार नाही आणि जे संस्था चालक व मुख्याध्यापक हे ह्या शासनाच्या परिपत्रक ,आदेशाचे उल्लंघन करतील त्याच्या वर या कायदयाने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कृपया वरील वृत्त आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रामध्ये प्रकाशित करून आम्हाला सहकार्य करावे ही विनंती.
Application form 2 for installation of CCTV cameras in private and government schools : खाजगी शाळा व सरकारी शाळा मध्ये CCTV cameras बसवने, अर्ज नमुना 2
- प्रति,
- मा.संपादक/वार्ताहर,
- शैक्षणिक धोरण अंमलबजावणी करावी.
प्रतिनिधी अहमदनगर : महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक धोरणान्वये काढलेल्या परिपत्रकाची तातडीने अंमलबजावणी करावी, असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार दीपक पाचपुते जिल्हाध्यक्ष ज्ञानमाता सहभागी संस्था व इतर सदस्य यांनी भास्कर पाटील यांच्याकडे ईमेल द्वारे दिले आहे.
शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या हितासाठी सरकारी आणि खासगी शाळेमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात यावेत, विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीची अंमलबजावणी करण्यात यावी, सखी सावित्री समितीबाबतच्या तरतुदीचे अनुपालन करण्यात यावे, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत, बदलापूर आणि दौंड तालुक्यातील विद्यार्थिनींसोबत मळद येथे झालेल्या अन्यायाच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य ती पावले उचलणे काळाची गरज आहे.
शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेली मुले सर्व जातीधर्माची आहेत. त्यानुसार सर्व जाती धर्मातील घटकांना न्याय देणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता आणि बंधुत्व या तत्त्वात आहे. त्यानुसार कुठल्याही विद्यार्थी, विद्यार्थिनींवर अन्याय, अत्याचार होऊ नये यासाठी योग्य ती पावली उचलणे काळाची गरज आहे.
कृपया वरील वृत्त आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रामध्ये प्रकाशित करून आम्हाला सहकार्य करावे ही विनंती.
- Application form for installation of CCTV cameras in private and government schools Link facebook Page
- Application form for installation of CCTV cameras in private and government schools Link Whatsapp Page
- Application form for installation of CCTV cameras in private and government schools Link Instagram Page
- Application form for installation of CCTV cameras in private and government schools Link Telegram Page