![]() |
पोलीस पाटील ची माहिती
पोलीस पाटीलांसाठी लागू असलेला कायदा म्हणजे 'महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम, १९६७' अधिनियम कार्यकक्षाः म.ग्रा.पो.अ. १९६७' कलम १(२) अन्वये हा अधिनियम मुंबई वगळता सर्व महाराष्ट्रात लागू आहे. स्वातंत्त्यापूर्वी, स्वातंत्यानंतर आणि आजच्या आधुनिक युगातही पोलीस पाटील है पद स्वतःचे महत्व टिकवून आहे. पोलीस पाटलांना त्याच्या कामकाजाची, दफ्तराची माहिती असणे अत्यावश्यक आहे.पोलीस पाटील म्हणजे काय
ब्रिटिश काळात प्रथमच 'मुंबई ग्राम पोलीस अधिनियम, १८६७ अंमलात आणला गेला व त्यातील तरतुदीन्वये गाव पोलिसांचे अधिकार निश्चित करण्यात आले. याकायद्यानुसार पोलीस पाटील हे पद वंशपरंपरागत होते. स्वातंत्ल्यानंतर वंशपरंपरागत पदे बंद केली गेली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर 'महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम, १९६७' अंमलात आला आणि पोलीस पाटील या पदाला शासकीय दर्जा देण्यात आला,.पोलीस पाटलांचे कर्तव्य काय
- निवृत्ती वेतनधारी व्यक्ती मयत झाल्यास सक्षम अधिकाऱ्यास कळविणे.
- पोलीस नियम पुस्तिका, १९५९, खंड ३, नियम ४९३ (३) अन्वये, नौका भंग झाल्यास खलाशांना व प्रवाशांना मदत करणे.
- ज्या गावात तलाठी नाहीत, त्या गावी नैसर्गिक आपत्ती आल्यास मदत करणे आणि सक्षम अधिकाऱ्यास कळविणे.
- आणिबाणीच्या काळात गावातील रेल्वेमार्ग, पुल, तारा यांचे संरक्षण करणे.
- गावात झालेले अकस्मित मयत, अपघात, संशयास्पद मृत्यू, बेवारस प्रेत, टोळ्या, गुन्हेगार यांची माहिती सक्षम अधिकाऱ्यास कळविणे,
- गावात रात्रीची गस्त करणे.
पोलीस पाटलांचे काम काय
- शासन, एका गावात एक किंवा अधिक पोलीस पाटीलांची नेमणूक करू शकेल.
- गावातील कोतवाल पोलीस पाटीलाच्या अखत्यारीत असतील.
- पोलीस पाटील है ग्राम पोलीस प्रमुख म्हणून काम करतात.
पोलीस पाटलाची निवड कोण करतात?
पोलीस पाटील होण्यासाठी काय करावे लागते?
पोलीस पाटील होण्यासाठी काय करावे लागते?
पोलीस पाटलाच्या पगार किती?
८ हजार रुपये मासिक वेतन असून राज्य शासनाच्या आदेशाने पगार कमी जास्त असू शकते. त्याची अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास लिंक वर क्लिक करा.
पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात'
म.ग्रा.पो.अ., १९६७' कलम ४ अन्वयेः जिल्हाधिकारी हे प्रशासन प्रमुख असल्यामुळे, ग्राम पोलीस प्रशासनाचे काम जिल्हाधिकारी यांच्याकडून चालविले जाते. जिल्हाधिकारी त्यांचे हे अधिकार पोलीस अधिक्षकांना सोपवू शकतील.
पोलीस पाटलास कोण रजा मंजूर करतो'
स.ग्रा.पो.अ., १९६७' कलम ३ अन्वयेः ग्राम पोलीस प्रशासनाच्या नियंत्रण, मार्गदर्शनाची जबाबदारी राज्य शासन आणि महसूल आयुक्तांच्या वतीने जिल्हाधिकारी यांची आहे. जिल्हाधिकारी त्यांचे हे अधिकार उपविभागीय दंडाधिकारी व तहसिलदार यांना सोपवू शकतील,
पोलीस पाटील अधिनियम 1967
'महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम, १९६७' या नावाने, खाजगी लेखकांनी लिहिलेली अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. अशा पुस्तकांचे वाचन केले असता, उपरोक्त अधिनियम व अनुषंगिक नियमांमध्ये फरक असल्याचे आढळते. मी हा लेख लिहितांना शासकीय मुद्रणालयातर्फे प्रकाशित पुस्तकांचा आणि शासन निर्णय, परिपत्रके यांचा संदर्भ घेतला आहे. त्यामुळे हा लेख बाजारात उपलब्ध इतर खाजगी पुस्तकांच्या तुलनेत जास्त अधिकृत आहे. पूर्वी महाराष्ट्रातील खेडेगावात करवसुलीचे काम आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दायित्व आहे.पोलीस पाटील पात्रता
- स्थानिक गावातील रहिवासी असणे
- त्याचे २१ वर्ष पूर्ण असावे.
- महाराष्ट्र चा रहिवासी असणे
- किमान १२ वी पास असणे आवश्यक
- शारीरिक दृष्ट्या चांगले असणे
पोलीस पाटील अधिकार व कर्तव्य
पोलीस पाटीलांची अधिकार व कर्तव्य खालील प्रमाणे नमूद आहेत.
- पोलीस पाटीलाच्या नेमणूकीचे गाव ज्या कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या हद्दीत असेल, त्या कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या आदेशाचे पालन करणे,
- कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या मागणीनुसार अहवाल सादर करणे.
- फौजदारी गुन्हे, गावातील सार्वजनिक आरोग्य व दंडाधिकाऱ्यांना कळविणे, गावातील समुदायांची सर्वसाधारण माहिती कार्यकार collector
- पोलीस अधिकाऱ्यांना त्याच्या कामात शक्यतो सर्व मदत करणे.
- कार्यकारी दंडाधिकारी व पोलीस अधिकारी यांनी सोपविलेल्या कामांचे (वॉरंट बजावणे इत्यादी) अनुपालन करणे.
- सार्वजनिक शांतता भंगाची शक्यता कार्यकारी दंडाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांना कळविणे.
- गुन्हे प्रतिबंध, सार्वजनिक उपद्रव प्रतिबंध, गुन्हेगारांचा तपास यात यंत्रणेला सहाय्य करणे.
- शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे,
पोलीस पाटीलांची कर्तव्येः
'म.ग्रा.पो.अ., १९६७' कलम ६ अन्वयेः
पोलीस नियम पुस्तिका, १९५९, खंड ३, नियम ४९३ (२) (अ) अन्वये, आजारी प्रवाशांची काळजी घेणे. पोलीस नियम पुस्तिका, १९५९, खंड ३, नियम ४९३ (२) (ब) अन्वये, निखात निधि सापडल्यास सक्षम अधिकाऱ्यास कळविणेपोलीस पाटील गावातील प्रशासकीय यंत्रणा व पोलीस यंत्रणा यातील दुवा
वतनदार/जमीनदार पाटील आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे रामोशी, भिल्ल, जागल्या यांच्याकडे असे. त्यामुळे वतनदार/जमीनदार पाटील यांच्याकडे अनिबंध सत्ता होती. वतनदारी जमीनदारी पध्दती खालसा झाल्यानंतर, गाव कामगार व पाटील यांच्यावरील देखरेखीचे काम मामलेदाराकडे सोपविले गेले.पोलीस पाटील परीक्षा प्रश्नपत्रिका
वरील बाबींवरून पोलीस पाटील हा गावातील प्रशासकीय यंत्रणा व पोलीस यंत्रणा यातील दुवा म्हणून काम करतात हे लक्षात येते.
- Police Patil Mahiti Marathi Link facebook Page
- Police Patil Mahiti Marathi Link Whatsapp Page
- Police Patil Mahiti Marathi Link Instagram Page
- Police Patil Mahiti Marathi Link Telegram Page