![]() |
SVAMITVA Yojana : जळगाव जिल्ह्यात स्वामीत्व योजने अंतर्गत 18 जानेवारी रोजी सनद वाटप कार्यक्रमाचे आयोजन.
जळगाव दि.16 ( जिमाका ) : मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 18 जानेवारी रोजी दुपारी 12.20 वाजता देशभरात 50 लाख मालमत्ता पत्रकांचे आभासी वितरण करत लाभार्थ्यांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात जळगाव जिल्हयात स्वामित्व योजने अंतर्गत ६० गावांमध्ये सनद वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.राज्य महसूल विभाग, राज्य पंचायत राज विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार यांचे वतीने स्वामित्व (SVAMITVA Yojana) योजनेची अमंलबजावणी करण्यात येत आहे.
SVAMITVA Yojana 18 जानेवारी रोजी सनद वाटप कार्यक्रमाचे आयोजन. या योजनेद्वारे गावातील मिळकत धारकाला मालमत्ता पत्रक उपलब्ध करून देतांना संबधित मिळकत धारकाला दस्तऐवजाचा हक्क प्रदान करण्यात येणार आहे.
जळगाव जिल्हयातील सर्व गावांचे गावठाण भूमापन करून मिळकत पत्रिका स्वरूपात अधिकार अभिलेख तयार करणे,गावातील मालमत्तांचे जी.आय.एस. प्रणालीवर आधारीत मालमत्ता पत्रक तयार करणे, हे स्वामीत्व योजनेचे स्वरूप आहे.
जळगाव जिल्हयात स्वामीत्व योजने अंतर्गत चोपडा तालुक्यातील २ गावे, यावल तालुक्यातील ५ गावे, मुक्ताईनगर तालुक्यातील ६ गावे, बोदवड तालुक्यातील १६ गावे, भुसावळ तालुक्यातील ३ गावे,

जळगाव तालुक्यातील १ गाव, पाचोरा तालुक्यात २७ गावे, असे एकुण ६० गावांमध्ये सनद वाटप करण्यात येणार आहे. तरी गावातील जास्तीत जास्त नागरीकांना स्वामीत्व योजने अंतर्गतचे मालकी हक्काचे सनद प्राप्त करून घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख एम. पी. मगर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.