![]() |
/ Bogas Khate Biyane Vikri Takrar Arj Namuna |
बोगस खते-बियाणे विक्री विरोधात तक्रार अर्ज नमुना / Bogas Khate Biyane Vikri Takrar Arj Namuna
- प्रति,
- मा. जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय.
विषय:- जिल्ह्यातील शेतकर्यांना खरीप हंगामात उत्कृष्ठ दर्जाचे खते - बियाणे मिळण्यासाठी उपयोजना कारणे. व बोगस खते-बियाणे विक्री विरोधात तालुकानिहाय भरारी पथकांची स्थापना कारणे बाबत.
महोदय,
या वर्षी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेतकर्यांना खरीप हंगामात उत्कृष्ठ दर्जाचे खते-बियाणे मिळावे या करिता उपयोजना करावे. कारण वर्षे २०२० साली मराठवाड्यात व पश्चिम महाराष्ट्रात बोगस बियाणामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. विशेषतः सोलापूर जिल्हातील शेतकरी दुबार पेरणीमुळे प्रचंड संकटात सापडला होता.
विशेषतः शेतकर्यांना सोयाबीन पिकाचे चे बियाणे उत्कृष्ठ दार्जाचे मिळणे गरजेचे आहे. व खते-बियाणे उपलब्ध असताना सुद्धा ती शेतकर्यांना मिळत नाहीत. काही व्यापारी खते व बियाणे एकाच वेळेस घेणे अनिवार्य करत असतात. नाही तर युरिया सारखे खते उपलब्ध असून सुद्धा शेतकर्यांना देत नाहीत. याची पुढील काळात प्रशासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे. व बोगस खते- बियाणे विक्रीविरोधात तालुकानिहाय भरारी पथकांची स्थापन करावे. व पथका मार्फत दोषी विरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. हि विनंती.
- आपलाच
- विश्वासू शेतकरी
Bogas Khate Biyane Vikri Takrar Arj Namuna 2 / बोगस खते-बियाणे विक्री विरोधात तक्रार अर्ज नमुना 2
- प्रति,
- मा. कृषी तालुका अधिकारी,
- ता. बार्शी जि. सोलापूर
- 1) बियाण्यांची चढ्या दराने होणारी विक्री थांबवावी.
- 2) प्रत्येक कृषी आस्थापन केंद्रावर खते व बियांनाचे भावफलक लावण्यात यावेत.
- 3) शेतकऱ्यांना बियाणे व खत खरेदीची पक्की पावती न देणाऱ्या दुकांदारांवर कारवाई करण्यात यावी.
- 4) खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात येऊ नये.
- 5) शेतकऱ्यांना आवश्यक तेवढेच खत खरेदी करण्याचा त्यांचा अधिकार आहे त्यामुळे लिंकिंग प्रमाणे खत विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी.
- 6) बोगस बियाणे विक्री करणाऱ्या दुकदारांवर व कंपनीवर कारवाई करण्यात यावी.
महोदय,
वरील विषयी विनंती अर्ज करते की, खरीप हंगामास सुरुवात होत आहे. या काळात शेतकरी पेरणीच्या तयारीसाठी बियाणे व खते खरेदी करत असतात. परंतु यावेळी शेतकऱ्याच्या अडचणींचा फायदा घेऊन त्यांची मोठ्या प्रमाणात लूट करण्यात येते. हे होऊ नये याकरिता आपल्याला वरील मागण्या करत आहोत.
या सर्व गोष्टीवर अंकुश ठेवण्याचे काम हे आपल्या तालुका कृषी कार्यालयाचे आहे. त्यामुळे अधिकारी हफ्ते घेऊन अश्या चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालणार असेल तर, शेतकरी संघटना हे खपवून घेणार नाही याची कार्यालयाने नोंद घेऊन वरील मागण्याची पूर्तता करावी.
नसता . शेतकरी संघटना अश्या घटना उघडकीस आणून कृषी कार्यालयांच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात रस्त्यांवर उतरून आंदोलन करेल. तरी आपल्या कार्यालयांकडून याची गंभीर दखल घेण्यात यावी.
आपला विश्वासू