एक रुपयात पीकविमा योजनेत सहभागी व्हा तालुका कृषी विभागाचे आवाहन; 31 जुलैपर्यंत अंतिम मुदत.
विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण देण्यासाठी राज्यात प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येत आहे. खरिपासाठी एक रुपयात पीकविमा योजनेत सहभागी होता येणार आहे.
पीक विमा अर्ज भरण्याची अंतिम मुदत काय आहे. 1 Rupayat Pik Vima
अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत आहे. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी , कृषी अधिकारी यांनी केले आहे.
पीकविमा घेण्यास कोण पात्र आहे.
पीकविमा योजनेत अनुसूचित क्षेत्रात पीक घेणारे कूळ अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतीसह सर्व शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत. पीकविमा कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार
शेतकऱ्यांना योजनेत सहभाग ऐच्छिक असेल. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील पीकविमा चा लाभ मिळणार आहे त्या साठी त्यांना पोर्टलवर नोंदणीकृत भाडेकरार अपलोड करावे लागणार आहे. या योजनेंतर्गत विमा कंपनीवर नुकसान भरपाईचे विमा हप्त्याच्या ११० टक्क्यांपर्यंत दायित्व राहणार आहे.
यापेक्षा नुकसानभरपाई विमा हप्त्याच्या ८० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास विमा कंपनी एकूण २० टक्के रक्कम स्वतःकडे नफा म्हणून ठेवेल व उर्वरित रक्कम
राज्य शासनाला परत करेल. या योजनेत खरीप हंगामातील भुईमूग, सोयाबीन, खुरासणी, मूग, उडीद,भातशेती, ज्वारी, बाजरी, नाचणी, तूर, मका, कांदा, कापूस या पिकांचा समावेश आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमार्फत राबवली जाणार आहे.
पीक विमा हमीपत्र साठी येथे क्लिक करा.
यासाठी सात-बारा, सन २०२४ मध्ये खरीप हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई मिळण्यासाठी कळवण-सुरगाणा-दिंडोरी-देवळा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे. उपविभागीय कृषी अधिकारी.
पीक पेरा स्वयंघोषणा साठी येथे क्लिक करा.
तालुक्यात कोरडवाहू शेती असून, केवळ पावसाच्या भरोशावर खरीप हंगामात शेती केली जाते. अवेळी पाऊस, पावसाचा खंड पडल्याने रोपवाटिका पावसाअभावी जळली. अजूनही अपेक्षित पाऊस पडलेला नाही. यासाठी एक रुपया पीकविमा भरणे आवश्यक आहे. तालुका कृषी अधिकारी.
कोणते कागदपत्रे लागणार : कोठे संपर्क करावा?
८अ उतारा, आधारकार्ड व बँक पासबुक झेरॉक्स, पीकपेरा स्वयंघोषणा पत्र यांचा समावेश आहे. पीकविमा भरण्यासाठी व अधिक माहितीकरिता कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तसेच नजीकच्या सेवा केंद्राशी संपर्क साधावा. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
निष्कर्ष
7/12 धारकांना सरकार कडून 1 रुपयात पीक विमा योजना देत आहे. हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती कडे हि माहिती शेअर करा. जेणेकरून पीक विमा योजनाचा लाभ त्यांना मिळेल. अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आम्ही शेअर करत असतो. म्हणून आम्ही सांगतो कि आमच्या सोअसिअल मिडीयाला जॉईन व्हा.