रमाई घरकुल योजना नोंदणी सुरु | Ramai Awas Yojana 2024 |
रमाई घरकुल योजना महाराष्ट्र 2024
रमाई घरकुल योजना महाराष्ट्र या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नवबौद्ध असणाऱ्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी तसेच ग्रामीण क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नवबौद्ध जातीच्याच्या नागरिकांसाठी घराचे २६९ चौरस फूट क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्ट्याने अमलात आणली गेली आहे. या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नवबौद्ध लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यात स्वतंत्र आर्थिक मदत देण्याची तरतूद देखील आहे. सन २०११ च्या सर्वेक्षणानुसार या योजनेसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नवबौद्ध समुदाय पात्र आहे आणि त्यांना लाभ दिला जातो. रमाई घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करताना ग्रामसभा, पंचायत समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या ठिकाणी योग्य ती कार्यवाही करून मंजुरी देण्यात येते. [ Ramai Awas Yojana 2024 ]रमाई घरकुल योजनेचा तपशील
या आर्टिकल चे नाव काय आहे? | रमाई घरकुल योजना नोंदणी सुरु | Ramai Awas Yojana 2024 |
या योजनेचे नाव काय ? | “Ramai Awas Yojana 2024” |
योजनचे सुरवात केव्हा झाली.? | ----------- |
योजना अर्ज करण्याची फॉर्म PDF | |
कोणत्या विभाग तर्फे ? | समाज कल्याण विभाग द्वारे |
या योजनेत किती % अनुदान दिले जाते ? | १००% अनुदान |
लाभार्थी कोण ? | अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नवबौद्ध बांधव |
आधिकारिक वेबसाइट |
रमाई घरकुल योजना उद्दिष्ट्य काय?
रमाई घरकुल योजने अंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नवबौद्ध जमातीच्या ज्या लोकांना स्वतःची राहण्यासाठी पक्की घरे नाहीत, त्यांना पक्की घरे उपलब्ध करून देणे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नवबौद्ध जमातीच्या लोक हे मातीच्या घरात, झोपडित आणि तात्पुरत्या केलेल्या निवाऱ्यात राहतात त्यांना राहण्यासाठी पक्का निवारा उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. रमाई घरकुल योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नवबौद्ध जमातीतील कुटुंबांना नवीन घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य सरकारकडून मिळते. सदर घरकुल योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नवबौद्ध पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी १.२० लाख रुपये इतकी आर्थिक मदत करण्याची तरतूद आहे. तसेच या योजने द्वारे मनरेगा माध्यमातून या लाभार्थ्यास रोजगार देखील उपलब्ध होतोत.[ Ramai Awas Yojana 2024 ]रमाई घरकुल योजना Latest GR –
- रमाई घरकुल योजना २०२२-२३ उद्दिष्ट्य निश्चित करण्याबाबत शासन निर्णय GR – लिंक
- रमाई घरकुल योजना शासन निर्णय GR दिनांक १८ जुलै २०१४
रमाई घरकुल योजनेचे उद्दिष्ट
रमाई घरकुल योजनेअंतर्गत २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक १८ जुलै २०१४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या शासन निर्णयानुसार कोणत्या जिल्ह्यासाठी रमाई घरकुल योजनेचे उद्दिष्ट किती असेल, हे ठरवण्यात आले. प्रत्येक जिल्ह्याचे रमाई घरकुल योजनेअंतर्गत किती उद्दिष्ट आहे, आणि आपल्या जिल्ह्याचे घरकुल योजनेचे सन २०२२ -२३ उद्दिष्ट किती आहे ते तपासा. [ Ramai Awas Yojana 2024 ]रमाई घरकुल योजनेसाठी लाभार्थी पात्रता काय आहे?
- लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा.
- लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण भागासाठी एक लाख, असावा.
- लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न मर्यादा नगर परिषदांसाठी दीड लाख असावा.
- लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न मर्यादा महानगरपालिकासाठी दोन लाख असावा.
- लाभार्थ्याकडे पहिले पासून राहण्यासाठी पक्के घर नसावे.
- पात्र लाभार्थ्याकडे स्वतःची घर बांधण्यासाठी जमिन असावी. किंवा शासनाने दिलेली जमीन असावी.
- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नवबौद्ध प्रवर्गातील, या लाभार्थ्यांना अधिक प्राधान्य देण्यात येईल.
रमाई घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- जागेचा सातबारा उतारा आणि ७-अ प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला किंवा वयाचा पुरावा
- जागा उपलब्ध आहे असे प्रमाणपत्र
- ग्रामसभेचा ठराव
- तहसिलदाराकडील उत्पन्न प्रमाणपत्र
रमाई घरकुल योजनेअंतर्गत किती रक्कम मर्यादेपर्यंत लाभ देय आहे?
- ग्रामीण क्षेत्रासाठी 1,32,000/- रुपये एवढी घराची किंमत मर्यादा असेल.
- डोंगरा क्षेत्रासाठी 1,42,000/- रुपये एवढी घराची किंमत मर्यादा असेल.
- महानगरपालिका क्षेत्राकरिता घराची किंमत मर्यादा 2,50,000/- रुपयांची एवढी असेल.
रमाई घरकुल योजनेकरीता संपर्क कुठे करावा?
रमाई घरकुल अधिक माहितीसाठी संबंधित ग्रामपंचायत कार्यालय, नगरपालिका कार्यालय, महानगरपालिका कार्यालयात किंवा जिल्ह्याच्या समाज कल्याण येथे संपर्क करावा. आणि या योजने संबंधित अधिक माहिती मिळवावी.Important Links
Notification (जाहिरात) |
|
Official Website (अधिकृत वेबसाईट) |
|
Join Us On WhatsApp |
|
Join Us On Telegram |
|
Join Us On Facebook |
|
Ramai Awas Yojana PDF |
|
Helpline Number |
0253 2315860 |
Follow Us