श्रीरामपूर (प्रतिनिधी)- सेवक आहात, मालक नाही. नागरिकांचे प्रश्न सोडवायचे नसेल तर घरी जा, असा सज्जड दम आमदार हेमंत ओगले यांनी नगरपरिषदेच्या हद्दीतील प्रश्नांच्या संदर्भात आयोजित आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिला.
यावेळी मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्यासह सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते. आ. ओगले पुढे
म्हणाले. प्रशासकीय राजवट असल्यामुळे अधिकारी मनमानी पद्धतीने काम करत आहेत. या बाबत अनेक लेखी तक्रारी माझ्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्यावर त्वरित कार्यवाही करा, अन्यथा मला टोकाचे पाऊल उचलावे लागेल, अशी आक्रमक भूमिका आ.ओगले यांनी घेतली.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन तक्रारी देखील अधिकारी सोडवू शकत नाहीत. शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, पाणीपुरवठा बाबत देखील अनेक तक्रारी येत आहेत. परंतु प्रशासनातील काही उदासीन अधिकाऱ्यांमुळे सर्वच प्रशासन बदनाम होताना दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत आपण आपल्या कामात सुधारणा करावी, अशी सर्वांची माफक अपेक्षा आहे.
जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष
सचिन गुजर म्हणाले, शहरामध्ये सर्वात मोठी समस्या शिवाजी रोड संगमनेर रोडवरील बँकांची आहे. सदर बँकांना ना हरकत देताना पार्किंग असल्याचे बघितले का? तसेच, मोठ्या शहरांप्रमाणे पार्किंगसाठी सम-विषम पद्धत राबविण्याचे सुचवले. सध्या चालू असलेले चौक सुशोभीकरणाचे काम हे चौक चुकीच्या पद्धतीने चालू आहे, त्यामुळे वाहतुकीचे नियोजन कसे करणार? स्मारके चौकशी
समकक्ष पदवीचा गोंधळ
शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे आणि राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून द्या. आमदार निधीतून पन्नास लाखांचा निधी देणार असल्याची घोषणा यावेळी आ. ओगले यांनी केली.
सुशोभीकरण यापेक्षाही चांगल्या जागी केल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडेल आणि नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, माजी उपनगराध्यक्ष मुजफ्फर शेख, दिलीप नागरे, राजेंद्र सोनवणे,
रमण मुथा, नागेश सावंत, सुनिल बोलके, अशोक थोरे, लकी सेठी, रितेश रोटे, भरत कुंकूलोळ, प्रसाद चौधरी, सुधिर बायखिंडे, निखिल
पवार, राजेंद्र भोसले, निलेश नागले, जावेद शेख, रियाज पठाण, रज्जाक पठाण, प्रवीण नवले, रावसाहेब आल्हाट, संतोष परदेशी, रितेश एडके, मास्टर सरवरआली, सुनील साबळे, गणेश काते, बाबा वायदंडे, सतीश पाटणी, रितेश चव्हाणके, विशाल साळवे, रफिक शेख, जियान पठाण, परेश गाडेकर,
सनी मंडलिक, राजेश जोंधळे, कल्पेश पाटणी, सागर दुपाटी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुमारे साडेतीन तास चाललेल्या बैठकीमध्ये उपस्थित नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित उपस्थित केले आणि त्या प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांकडून उत्तरे देखील घेण्यात आली.