Caste census Adivasi
नंदूरबार प्रतिनिधी: जातीनिहाय जनगणनेत आदिवासींची नोंद फक्त "आदिवासी" म्हणून करण्यात यावी,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार व भारत आदिवासी संविधान सेना नंदूरबार संघटनेकडून भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.जातीनिहाय जनगणनेत आदिवासींची नोंद फक्त "आदिवासी" म्हणून करावी- असे निवेदन
मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, सुरेश पवार, रामदास मुसळदे, भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे,दगडू निकुंभ आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
आदिवासी हा निसर्ग पूजक आहे.
आदिवासींची संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे.आदिवासींची संस्कृती ही कोणत्याही धर्माशी मिळतीजुळती नाही,आदिवासींची संस्कृती भिन्न आहे.मुळात: आदिवासी हा कोणत्याही धर्माचा नाही. आदिवासी हा निसर्ग पूजक आहे.आदिवासींची स्वतंत्र ओळख आहे.
आदिवासींची रूढी, परंपरा,चालीरिती, जन्म -मृत्यू ,लग्नविधी,आचार विचार, पेहराव इत्यादी आदिवासींचे जीवन संस्कृती वेगळी आहे. आदिवासींची स्वतंत्र ओळख आहे.
सन १९४७ भारत स्वतंत्र झाल्यापासून तसेच १०० ते १२० वर्षा पूर्वीपासून आदिवासींच्या पूर्वजांच्या भोळ्या पणाचा, अशिक्षित, अज्ञानाचा गैरफायदा घेऊन धर्मवादी लोकांनी हिंदू,मुस्लीम, ख्रिश्चन इत्यादी धर्म आदिवासींवर लादण्याचा प्रयत्न केला.

मागील जनगणनेत आदिवासींची जनगणना ही हिंदू म्हणून करण्यात आली,हे अत्यंत चुकीचे आहे.आदिवासींच्या अस्तित्वाला धोकादायक आहे.कारण मा.सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आदिवासी हे हिंदू नाहीत, असा निर्णय दिला आहे. आदिवासींची स्वतंत्र ओळख व क्रांतीकारकांचा इतिहास लपविण्याचे षडयंत्र काही धर्मवादी लोकांनी यापूर्वीच केला आहे.
भारत सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे भविष्यात होणा-या जातीनिहाय जनगणनेत आदिवासींची नोंद ही हिंदू म्हणून किंवा अन्य मुस्लीम, ख्रिश्चन धर्माचे म्हणून नोंद करण्यात येवू नये.
भारत सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे भविष्यात होणा-या जातीनिहाय जनगणनेत आदिवासींची नोंद ही हिंदू म्हणून किंवा अन्य मुस्लीम, ख्रिश्चन धर्माचे म्हणून नोंद करण्यात येवू नये.
आदिवासींचा विकास करण्यासाठी आदिवासींची स्वतंत्र नोंद होणे आवश्यक आहे.जातीनिहाय जनगणनेत आदिवासींसाठी स्वतंत्र काॅलम असावे. तरी आगामी जातीनिहाय जनगणनेत आदिवासींची नोंद ही फक्त "आदिवासी" म्हणून करण्यात यावी.अन्यथा जातीनिहाय जनगणनेचा जाहीर बहिष्कार टाकण्याचा इशारा आदिवासी संघटनांनी दिला आहे.