![]() |
Apaar Id ची महत्वाची माहिती
Apaar Id : केंद्रीय शिक्षणमंत्रालयाच्या निर्देशानुसार 'वन नेशन, वन स्टुडंट आयडी' अंतर्गत प्राथमिक, महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे 'अॅटोमेटेड पर्मनंट अॅकेडमिक अकाउंट रजिस्ट्री आयडी' म्हणजे 'Apaar Id' काढण्यात येणार आहेत.नोकरीतही 'Apaar Id' मदत करणार
यासाठी देशभरातील शाळांमध्ये अपार आयडी काढण्याची मोहीम सुरू झाली आहे. याद्वारे विद्यार्थ्यांची नर्सरी ते संपूर्ण शिक्षणाची जन्मकुंडलीच तयार होणार आहे. हा आधार सारखाच कायमस्वरूपी शैक्षणिक आयडी असणार आहे. पालकांमध्ये संभ्रम असला तरी फार्म भरणे बंधनकारक आहे.'Apaar Id' म्हणजे काय?
Apaar Id म्हणजे 'अॅटोमेटेड पर्मनंट अॅकेडमिक अकाउंट रजिस्ट्री आयडी' होय. हे विद्यार्थ्यांचे बाराअंकी डिजिटचे ओळखपत्रच असेल, संबंधित विद्यार्थी नर्सरीपासून ते पीजीपर्यंत किंवा त्यासमोर काय शिकला, काही अतिरक्त डिप्लोमा, डिग्री, कौशल्य प्रशिक्षण, इतर परीक्षा दिली आहे का, याची संपूर्ण माहिती वा डिजिटल आयडीमध्ये समाविष्ट असेल.Apaar Id क्रेडिएन्स
'Apaar Id' हे विद्याथ्यांचे शैक्षणिक बैंक असेल, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या बालवाडी किवा नर्सरीपासून ते पूर्ण शिक्षणापर्यंतचे 'क्रेडिएन्स' म्हणजे क्रेडिट जमा होईल. त्यांच्या प्रत्येक वर्गाचे क्रेडिट असेल. याशिवाय विद्यार्थ्याने वेगळी पदवी किंवा पदविका घेतली असेल, कौशल्य प्रशिक्षण घेतले असेल, कोणतीही परीक्षा देताना अपार आयडी भरावा लागेल व त्याचेही क्रेडिट अकॅडमिक बैंकमध्ये जमा होईल. या केडिटनुसार विद्यार्थ्यांला नोकरी मिळणे सोपे होईल, असे सांगितले जात आहे.वन नेशन, वन स्टुडंट आयडी अभियान 'Apaar Id'
भारतीयांच्या आधार कार्डमध्ये ज्याप्रमाणे नागरिकांची इत्थंभूत माहिती असते, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती डिजिटल प्लॅटफार्मवर संग्रहित व संरक्षित करण्यासाठी 'वन नेशन, वन स्टूडेंट आयडी 'Apaar Id' अभियान केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सुरू केले आहे. हे अभियान नवीन शिक्षण धोरणाचाच एक भाग आहे.Apaar Id कार्ड मिळणार, लॉगइन करता येणार
आधार कार्डप्रमाणेच विद्यार्थ्यांना अपार आयडीचा कार्ड मिळेल. त्यासोबत एक पासवर्डही दिले जाईल. १२ अंकी आकड्याद्वारे विद्यार्थ्यांला लॉगइन करता येईल व पासवर्ड टाकून त्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीची इत्थंभूत माहिती एक क्लिकवर मिळेल.Apaar Id Log In
शिक्षण, घर, शाळा, निकाल क्लिकवर कळणार अपार आयडी काढताना विद्यार्थी व त्याचे पालक यांचे आधार कार्ड तसेच, घराचा पत्ता सादर करायचा आहे. त्याद्वारे अपार आयडी तयार होईल. पुढे कधीही विद्याथ्यांने आपल्या अपार आयडीद्वारे लॉगइन केले तर एका क्लिकवर विद्यार्थ्यांचा घराचा पत्ता, त्याची शाळा, त्याचा निकाल, त्याच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती मिळेल.Apaar Id Adhar Link
आधार-अपार लिंक करणार हे अपार आयडी पुढे विद्यार्थ्यांच्या आधारशी Link होणार आहे. त्यासाठी Apaar Id Digilocker मध्ये रजिस्ट्रेशन करून घ्यावे.- सर्वप्रथम मोबाईल च्या Play store मधून Digilocker install करून घ्यायचे,
- नंतर आधार वरून नोंदणी करून घ्यायचे.
- Otp टाकून जनरेट करून लॉगिन होईल
- नंतर फाइल मध्ये जाऊन Apaar Id रजिस्ट्रेशन करून घ्यावे.
Apaar Id रजिस्ट्रेशन Success होईल.
आतापर्यंत पुढच्या वर्गात किंवा शाळेत प्रवेश करताना किंवा नोकरीच्या मुलाखतीला जाताना तुमच्या कागदपत्रांची फाइल घेऊन फिरावे लागते. Apaar Id नंतर अशी फाइल घेऊन फिरण्याची गरज पडणार नाही. तुमच्या मोबाइल किवा लॅपटॉपमध्ये एका क्लिकवर 'डिजिलॉकर' उघडून तुमची सर्व शैक्षणिक माहिती सादर करता येईल.