![]() |
PM Vishwakarma Yojana : गावगाड्यातील कारभार आजही पारंपरिक व्यवसायावरच अवलंबून आहे. आधुनिकीकरणात या व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या पारंपरिक व्यवसायाला उभारी देण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत व्यवसाय उभारण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. त्यासोबतच व्यवसाय सुरू करण्यासाठी तीन लाखांपर्यंत कर्जही उपलब्ध करून दिले जाणार आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या गरजा पूर्ण करणारे आणि गावगाड्याची अर्थव्यवस्था चालविणारे १८ बलुतेदार गावात होते. यांना गावातच रोजगार मिळत असल्याने त्यांना शहरात येण्याची गरज नव्हती. मात्र, काळाच्या
हे कारागीर योजनेचे लाभार्थी PM Vishwakarma Yojana Pm Gov Com
सुतार, होडी बनविणारे, लोहार, घिसाडी, टोपली, चटई, झाडू बनविणारे, काथ्या विणकर, बाहुल्या व खेळणी बनविणारे पारंपरिक कारागीर, सोनार, कुंभार, चांभार, हातोडा व टूलकिट बनविणारे, कुलूप- किल्ली बनविणारे, मूर्तिकार, पाथरवट, दगडफोडे, गवंडी, न्हावी, फुलांचे हार बनविणारे, धोबी, शिंपी व मासे पकडण्याचे जाळे विणणारे कारागिरांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.ओघात अनेकांचे व्यवसाय बंद पडले. आधुनिकीकरणात या व्यवसायाचा टिकाव लागला नसल्याने त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. परिणामी ग्रामीण अर्थव्यवस्थाही मोडकळीस आली. त्यामुळे पुन्हा या व्यवसायांना नव्याने चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देत अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान विश्वकर्मा योजना देशभरात राबवायला सुरुवात केली आहे.
आधी या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर १५ हजार रुपये देतात. इतकेच नाही तर रोजगार उभारण्याकरिता तीन लाखांपर्यंत कर्जही उपलब्ध होत असल्याने त्याचा लाभ दिला जातो. आतापर्यंत जिल्ह्यात शेकडो कारागिरांनी याचा लाभ घेतला आहे.
योजनेबद्दल ठळक बाबी. : PM Vishwakarma Yojana
- 'स्किल इंडिया' पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर ओळखपत्र मिळणार त्यानंतर प्रशिक्षण
- कारागिरांना पाच दिवसांचे प्रशिक्षण बंधनकारक
- प्रशिक्षण कालावधीत दररोज ५०० रुपयांप्रमाणे स्टायफंड तथा शिष्यवृत्ती कर्ज
- प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर १५ हजार रुपये किंवा साहित्य किट मिळेल आणि त्यानंतर प्रमाणपत्र मिळणार
- प्रमाणपत्र जोडून बँकेकडे योजनेअंतर्गत करावी कर्जाची मागणी, सुरुवातीला मिळणार बिनव्याजी एक लाख रुपये
- बिनव्याजी कर्जाची वेळेत परतफेड केल्यास मिळणार पुढील दोन लाखांचे कर्ज
अर्जाकरिता या कागदपत्रांची आवश्यकता
• या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे आधारकार्ड, पॅनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट छायाचित्र, बँक पासबुक आणि मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे.अर्ज ऑनलाईन करता येणार ?
PM Vishwakarma Yojana ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. परन्तु ज्याच्या कडे CSC सेंटर आहे, किंवा CSC ID असेलेले लोकच अर्ज करू शकता. त्यसाठी जवळच्या सेंटर ला भेट द्या, आणि सांगा कोणत्या योजनेसाठी फोर्म भार्याचा आहे ते भरून देणार. You Tube Link