माहिती अधिकारात माहिती मागा वीज कंपनीला दाखवा जागा : What are the Rights of Electricity Consumers? Read the complete Information In Marathi :
विजेचे बील भरमसाठ आले, वीज मिटर वेगाने पळतयं, मिटरचे रिडिंग न घेताचा अंदाजे बील दिले आहे. विज कर्मचारी वीज कनेक्शन जोडत नाहीत, अधिकचे विज बील भरले नाही तर वीज कंपनी कनेक्शन तोडण्याची धमकी देतेय, विज ग्राहकाची समस्या कंपनी ऐकूण घेत नाही. मिटरधारकांचे नाव बदलून देण्यास त्रास देत आहेत. वीज ग्राहकांच्या अशा अनेक समस्या असतात, सहज व सुलभ रितीने सोडवून देण्यात यावे म्हणून ग्राहक स्थानिक पातळीवरील महावितरण वा अन्य संबधीत कंपनीचे कर्मचारी बहुतेकवेळा उदासिन असतात.वीज कंपनी ही एक व्यावसायिक कंपनी आहे. व्यवसायात इतरापेक्षा स्वतःचे हितसंबंध जपण्याकडे कंपनीचा कल असतो. त्यात ग्राहक भरडला जातो. जर प्रत्येक "ग्राहकांनी वीज कायदा २००३" मधील ग्राहक हक्कांच्या काही कलमांची माहिती करून घेतली तर वीज कंपनी ग्राहकांचे होणाऱ्या शोषण विरुद्ध लढा देऊ शकतो. आजच्या जमान्यात रडणाऱ्यांची उपेक्षा होते आणि लढणाऱ्यांला त्यांचे हक्क मिळतात. म्हणून जे लढण्यासाठी सज्ज असणारे दक्ष नागरिक हे काळाची गरज आहे.
आपण माहिती अधिकार अधिनियम २००५ कायद्याच्या चा वापर करूनही वीज मंडळाकडून आपल्या न्याय हक्कासाठी हितसंबंधाची जपवणूक करणारी माहिती मागवू शकतो. वीज मंडळाने बीज बील भरणा केंद्रावर ग्राहकांच्या हक्काविषयीची सनद व इतर कायदेशीर बाबीची माहिती ठेवणे अपेक्षित आहे. परंतु बऱ्याच वेळा सनद व इतर कायदेशीर बाबीची माहिती ग्राहक साधन केंद्रावर असत नाही. अशी माहिती माहितीचा अधिनियम २००५ च्या अन्वये ग्राहक मागवू शकतो.
वीज कंपनीच्या कार्यालयात कोण अधिकारी आहेत ? त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत ? वीज प्रवाह खंडीत झाल्यास टेलिफोन / मोबाईल वरून तक्रार घेतली जाते काय ? वीज केव्हा येणार याची व्यवस्थीत माहिती दिली जाते काय? सदर जबाबदारी कोणत्या अधिकारी व कर्मचारी यांची आहे ? वीजेचे रिडींग घेणे, देयेके तयार करणे, देयकांचे वितरण करणे अशी कामे खासगी ठेकेदारा मार्फत होतात काय ? ते ठेकेदार कोण आहेत. वीजवितरण कंपनी व संबंधीत ठेकेदार यांच्यात काय करार झालेत. सदर करारांचे काटेकोर पालन होत आहे काय ? अशा अनेक प्रश्नांची माहिती जाणून घ्यायची असेल तर "माहिती अधिकार अधिनियम २००५" अन्वयेही माहिती जाणून घेता येईल.
जास्त वीज बील कसे आले म्हणून तक्रार केली तर वीज कंपनीचे अधिकारी ऐकून घेत नाहीत. अगोदर पैसे भरा मग पुढचे पाहू असे सांगतात. वीज मंडळाकडून आपले आर्थिक शोषण किंवा लुबाडणूक होत आहे किंवा सेवा देण्यात अन्याय होत आहे असे लक्षात येताच आपण वीजमंडळाकडे स्थानिक वगर्यालयातील अधिकाऱ्याकडे आपले गाऱ्हाणे मांडावे. सविस्तर लेखी तक्रार करावी. जर स्थानिक पातळीवर न्याय देण्यास उदासिनता दाखवली जात असेल तर वीज ग्राहक तक्रार मंचामध्ये तक्रार दाखल करावी. आपल्या भागातील वीज ग्राहक तक्रार मंचाचा पत्ता व संपर्क क्रमांक आपल्या वीज बीलावर छापलेला असतो. जर वीज ग्राहक मंचाने न्याय दिला नाही तर आपण त्या नंतर आपल्या राज्यातील विद्युत लोकपाल यांच्याकडे तक्रार करून न्यायाची मागणी करू शकतो.
लक्षात ठेवा योग्य माहिती नसल्यामुळेच फसवणूक होते. ज्याचेकडे योग्य व आवश्यक अशी माहिती आहे त्याला कोणी फसवू शकत नाही. म्हणूल किमान माहितीगार ग्राहक ही आज काळाची गरज आहे. वीज ग्राहक कायदा २००३ हा ग्राहकांना अनेक अधिकार देतो. ते अधिकार बजावा. वीज कंपनीला अधिकाधिक जबाबदार बनविण्यासाठी दक्ष व जागरूक नागरिक बनने अतिशय आवश्यक आहे.
विज ग्राहकांचे अधिकार : What are the Rights of Electricity Consumers? Read the complete Information In Marathi :
- १. ग्राहकांना अर्ज केल्यापासून ७ दिवसाच्या आत व ग्रामीण भागात १० दिवसाच्या आत विद्युत वितरण कंपनीने ग्राहकांच्या जागेचे निरिक्षण केले पाहिजे. तसेच वीज जोडणीसाठी भराव्या लागणाऱ्या विद्युत जोडणी शुल्काचा तपशील शहरी भागात १५ व्या दिवसापर्यंत तर ग्रामीण भागात २० व्या दिवसापर्यंत कळविला पाहिजे.
- २. विद्युत्त जोडणीचा अर्ज व योग्य ते शुल्क भरल्यानंतर ग्राहकांला कमाल १ महिन्याच्या आत विद्युत जोडणी सुरू करून देणे ही विद्युत वितरण कपंनीची जबाबदारी आहे.
- ३. विद्युत वितरण कंपनीकडून प्रत्येक दोन महिन्यातून एकदा मिटरची नोंद घेतली गेली पाहिजे. कृषी मिटरसाठी तीन महिन्यातून एकदा.
- ४. घरगुती व शेतकरी ग्राहकांना बील सोपविल्याची तारीख व दंडाशिवाय बील भरण्याची तारीख यामध्ये किमान २१ दिवसांचा अवकाश असला पाहिजे. इतर ग्राहकांना हा आवकाश १५ दिवसाचा असला पाहिजे.
- ५. विद्युत मीटर वेगाने फिरत असल्यास किंवा त्यात काही बिघाड आहे असे वाटल्यास सदर मिटर विद्युत वितरण कंपनीकडून योग्य ते चाचणी शुल्क भरून तपासून घेण्याचा ग्राहकांना अधिकार आहे. जर मिटर सदोष व खराब असल्याचे आढळले तर चाचणी शुल्क परत देणे तसेच मोफत नवीन मिटर बसवून देणे ही विद्युत कंपनीची जबाबदारी आहे.
- ६. ग्राहकांच्या मागणीनुसार विद्युत मिटरची चाचणी तपासणी ही विद्युत नियामक आयोगाने ठरविलेल्या अन्य तज्ज्ञ यंत्रणाकडून ही करता येईल. याची माहिती विद्युत कंपनीकडून ग्राहकांना मिळाली पाहिजे. हा ग्राहकांचा हृक्क आहे.
- ६. विद्युत मिटर जळाल्याची ग्राहकांने तक्रार विद्युत वितरण कंपनीकडे केल्यानंतर शहरी भागात २४ तासाच्या आत व ग्रामीण भागात ४८ तासाच्या आत नवीन मिटर बसवून विद्युत पुरवठा पूर्वरत करणे ही कंपनीची जबाबदारी आहे.
- ७. नियमित व ठराविक बील येणाऱ्या ग्राहकास एकाद्या महिन्यात अचानक मोठ्या रक्कमेचे बील येते. ग्राहक विद्युत कंपनीकडे तक्रार करायला गेल्यास अगोदर बील भरा नंतर तक्रार करा. नसता विद्युत पुरवठा खंडीत होईल असे सांगितले जाते. विद्युत कंपनीकडून असा दिला जाणारा सल्ला हा दिशाभूल करणारा असतो.
- ८. नियमित व ठराविक बील येणाऱ्या ग्राहकास जर अचानक मोठे व वाढीव बीन असल्यास असे मोठे व वाढीव बील भरण्याची सक्ती करता येत नाही. अशा परिस्थितीत विद्युत अधिनियम २००३ च्या कलम ५६ उपकलम (१) नुसार ग्राहकाला परंतुकानुसार निषेध नोंदवून निषेध बील भरण्याची कायदेशीर तरतूद आहे.
- ९. अचानक आलेले वाढीव व मोठे बील भरण्यापेक्षा मागील सहा महिन्यातील बीलांची सरासरी काढून त्या सरासरी इतके बील भरता येते. याला निषेध बील किंवा पेमेंट विथ क्लेम असे म्हणतात. असे बील भरून घेतल्यानंतर विद्युत कंपनीस ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत करता येणार नाही.
- १०. निषेध बील भरल्यानंतर विद्युत कंपनीकडून वाढीव व मोठे बील का आकारले गेले यांचे सकारण प्रमाण ग्राहकांस देणे ही कंपनीची जबाबदारी आहे.
- ११. उचीत मुदतीत ग्राहकांनी बील भरले नसले तरी अचानक विद्युत पूरवठा खंडीत करणे ही कंपनीची बेकायदेशीर कृती ठरते. बील न भरल्याने ग्राहकाचा विद्युत पूरवठा खंडीत करण्यापूर्वी ग्राहकाला पूर्ण १५ दिवस अगोदर लेखी नोटीस दिली गेली पाहिजे. बील भरले नाही म्हणून किंवा ग्राहक थकबाकीदार झाला म्हणून अचानक (नोटीस न देता) विद्युत पूरवठा खंडीत करता येणार नाही.
- १२. विद्युत कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता शहरी भागात ४ तासापेक्षा अधिक काळ व ग्रामीण भागात २४ तासापेक्षा अधिक काळ विद्युत पुरवठा खंडीत ठेवला तर प्रभावीत ग्राहक विद्युत कंपनीकडे नुकसान भरपाई मागू शकतो.
- १३. विद्युत ग्राहकांचे गान्हाणे व तक्रार निवारण मंच कायद्यातील तरतूदीप्रमाणे प्रत्येक मंडल क्षेत्रात स्थापना केलेली असते. स्थानिक पातळीवर समाधान न झाल्यास विद्युत ग्राहक तक्रार निवारण मंचा मध्ये तक्रार दाखल करू शकतात. प्रत्येक विद्युत बीलावर तक्रार निवारण मंचाचा पत्ता व संपर्क क्रमाक दिलेलाच असतो.
- सूचना : वीज चोरीची प्रकरणे सदर ग्राहक तक्रार निवारण मंचासमोर चालविता येणार नाहीत.
- १४. मंचाचे कार्य अर्धन्यायीक पद्धतीने चालते या मंचासमोर विद्युतकंपनी व ग्राहक या दोघांच्याही बाजू एकून घेतल्या जातात. तक्रार निवारण मंचा मध्ये कोणतीही फि लागत नाही. ग्राहक स्वतः तक्रार चालवू शकतो. वकीलाची गरज नसते. तक्रारीचा निकाल दोन महिन्यात देणे हे मंचावर बंधनकारक आहे.
- १५. ग्राहक तक्रार निवारण मंचाकडून न्याय मिळण्याबाबत समाधान झाले नसेल तर ग्राहक किंवा ग्राहकांचा प्रतिनिधी विद्युत लोकपाल यांचेकडे विनाशुल्क तक्रार करू शकतात.
- १६. विद्युत कंपनीचा प्रतिनिधी ग्राहकांच्या घरी किंवा जोडणीच्या ठिकाणी मिटर रिडींग किंवा इतर कामासाठी आला असल्यास त्यास सदर प्रतिनिधीच्या गणवेषावर नाव व पद असलेली पट्टी तसेच ओळखपत्र असलेच पाहिजे. ग्राहकांनी मागणी करूनही सदर प्रतिनिधी नामपट्टी किंवा ओळखपत्र दाखविण्यास असमर्थ ठरल्यास ग्राहक अशा प्रत्येक कसूर झाल्याच्या वेळी ग्राहक विद्युत कंपनीकडे
जर काय आमच्याशी केला नाद विद्युत लोकपालकडे मागू दाद !
तक्रारीची त्रिस्तरीय पद्धत
सर्वप्रथम वीज ग्राहकांनी आपली लेखी तक्रार स्थानिक तालुका वा जिल्हा स्तरावरील विद्युत कार्यालयाकडे करावी. सदर कार्यालयाने १० ते १५ दिवसात तक्रारीचे निवारण वा समाधान केले नाही तर सदर तक्रार विद्युत गान्हाणे तक्रार मंचामध्ये तक्रार दाखल करावी. आपल्या भागातील वीज ग्राहक तक्रार मंचाचा पत्ता व संपर्क क्रमांक आपल्या वीज बीलावर छापलेला असतो. जर वीज ग्राहक मंचाने दोन महिन्यात योग्य तो न्यायनिवाडा करणे बंधनकारक आहे. जर सदर तक्रार मंचाने ग्राहकांस न्याय दिला नाही तर ग्राहक विद्युत लोकपाल यांच्याकडे तक्रार करून न्यायाची मागणी करू शकतो.
सद्या महाराष्ट्रात महावितरणचे खालील ११ ठिकाणी अन्य ३ मंडळ विद्युत कार्यालय स्तरावर एकूण १४ ग्राहक तक्रार निवारण मंच आहेत.
१) अमरावती २) औरंगाबाद ३) भांडूप ४) कल्याण ५) कोल्हापर ६) कोकण७) लातूर ८) नागपूर (ग्रामीण)९) नागपूर (शहर) १०) नाशिक ११) पुणे १२) मुंबई रिलायन्सएनर्जी १३) मुंबई टाटा पॉवर १४) बेस्ट मुंबईविज ग्राहकांचे अधिकार काय आहे? व्हिडीओ मध्ये बघा.
विद्युत लोकपाल (इलेक्ट्रिीसिटी ओम्बइसमन)
- विद्युत अधिनियम २००३ कलम ४२ (६) द्वारे आणि माविनिआ (ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंचा अरण विद्युत लोकपाल) विनियम २००६ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून विद्युत लोकपाल बांचे कार्यालय मुंबई व नागपूर येथे सुरू करण्यात आले आहे.
- ग्राहक तक्रार निवारण मंचाकडून वीज ग्राहकांच्या गान्डाण्याचे निवारण न झाल्यामुळे बाधित ग्राहक विद्युत लोकपाल यांच्याकडे न्यायासाठी अभिवेदन सादर करू शकतात.
- पत्ता: विद्युत लोकपाल, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, केशव बिल्डींग, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स बांद्रा (पूर्व) मुंबई ४०००५५ (कार्यक्षेत्र मुंबई, कोकण, कोल्हापूर सातारा सांगली, पुणे नाशिक धुळे जळगांव आणि नंदुरबार)
- पत्ताः विद्युत लोकपाल कार्यालय, प्लॉट नं.१२ श्रीकृपा विजयनगर, छावणी नागपूर-१२ फोन ०७१२-२५९६६७० (कार्यक्षेत्र सोलापूर मराठावाडा विदर्भ)
महावितरण / टाटा / रिलायन्स / बेस्ट विज पूरवठा
विद्युत नियामक आयोगाच्या मानकांप्रमाणे महावितरण वा अन्य विज पूरवठा कंपनीने ग्राहकांना योग्य त्या मानंकाप्रमाणे सेवा न पूरविल्यास ग्राहकांना द्यावयाची नुकसान भरपाई देण्याची तरतूद बिज कायदा २००३ मध्ये आहे. त्याप्रमाणे ग्राहकांनी नुकसान भरपाई मागावी![]() |
What are the Rights of Electricity Consumers? Read the complete Information In Marathi |
![]() |
What are the Rights of Electricity Consumers? Read the complete Information In Marathi |
केंद्रीय माहितीचा अधिकार कायदा २००५ कलम ३ अन्वये अर्ज (जोडपत्र " अ "नियम ३ नुसार)
- प्रति,
- जनमाहिती अधिकारी
- महावितरण/....
- विद्युत कंपनी --------
२) पत्रव्यवहाराचा पत्ता :
३) आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील (विषय व कालावधी खालीलप्रमाणे)
आपल्या विभागातील विद्युतसेवा पुरवठा विभागाची माहिती मिळणेबाबत.
दिनांक
अर्जदाराची सही
मो.
आपल्या विभागातील विद्युतसेवा पुरवठा विभागाची माहिती मिळणेबाबत.
- १) आपल्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात शहरी भागात गेल्या सहा महिन्यात ग्राहकांना कोणतीही पूर्व सूचना न देता किती वेळा चार तासापेक्षा अधिक काळासाठी विद्युत पुरवठा खंडीत झाला. विज पुरवठा खंडीत झाल्याचा दिनांक व खंडीत कालावधी याचा तपशील द्यावा.
- २) आपल्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ग्रामीण भागात गेल्या सहा महिन्यात ग्राहकांना कोणतीही पूर्व सूचना न देता किती वेळा २४ तासापेक्षा अधिक काळासाठी विद्युत पुरवठा खंडीत झाला. विज पुरवठा खंडीत झाल्याचा दिनांक व खंडीत कालावधी याचा तपशील द्यावा.
- ३) आपल्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मिटर रिडींग घेण्यासाठी व विद्युत बिले वितरण करण्यासाठी ठेका दिला आहे. काय ? आपल्या महावितरण कंपनी व ठेकेदार यांच्या झालेल्या नियम व कराराची एक प्रत मिळावी ४) आपल्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सन सप्टेंबर ते नाव्हेंबर २०१३ या तीन महिन्यात मध्ये विज बील न भरल्यामुळे वा
- अन्य कोणत्याही कारणामुळे किती विद्युत ग्राहकांचा विज पुरवठा तोडण्यात आला. अशा सर्व ग्राहकांची यादी व मिटर क्रमांक द्यावा. तसचे विज पुरवठा तोडण्यापूर्वी त्यांना महावितरण कडून कायद्याने १५ दिवसा अगोदर पाठविणे बंधनकारक असलेल्या पूर्वसूचना नोटीसीचा दिनांक सहित जावक क्रमांक द्यावा.
- ४) माहिती टपालाने हवी की व्यक्तिश: माहिती मी व्यक्तीशः घेऊन जाईन.
- ५) अर्जदार दारिद्रय रेषेखालील नाही (सोबत १० रूपयांचा डी. डी. जोडला आहे)
दिनांक
अर्जदाराची सही
मो.