Land NA Process In Marathi : जमीन एनए कशी करायची ? संपूर्ण माहिती वाचा
सध्याच्या या digital जगात, रोबोट च्या जमान्यात प्रत्येक व्यक्ती विकासाच्या गरजा पूर्ण करण्यसाठी, स्वत; आणि त्याच्या परिवाराला राहण्याच्या सोयी आणि उद्योग व्यवसायांमुळे जागेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या साठी कोणता हि व्यक्ती पडीक, निरुपयोगी जमिनी ज्या ठिकाणी वस्ती किंवा गाव वाढलेलं आहे, अशा ठिकाणी ची जमीन NA कशी करायची हेच माहिती नसते.
म्हणून आम्ही ( Land NA Process In Marathi ) हि माहिती घेऊन आलो आहे. शेतजमिनीत राहणाऱ्या रहिवासी किंवा व्यावसायिक विकास करणारे रहिवासी त्यांना जर का जमीन एनए करायचा असेल तर त्या जमिनीला अकृषी Non Agriculture जमिनीत रूपांतरित करणे आवश्यक असते.
जमीन एनए (बिगर शेती) कशी करायची?
बऱ्याच लोकांना जमीन एनए करण्याची प्रक्रिया माहित नसते. काहींना माहित असली तरी तिचे परी पूर्ण ज्ञान नसल्याकारणाने जमीन एनए प्रक्रियेत कोणत्या संमस्या ला समोर जावे लागते हेच कळत नाही. आणि जमीन एनए (बिगर शेती) कशी करायची? कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते, हेच माहिती नसते, चला तर मग याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.महाराष्ट्र जमीन महसूल कायदा
महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६९ नुसार, ( NA ) जमीन एनए शेतजमिनीचा वापर इतर कोणत्याही विकास कामासाठी करता येत नाही. त्यासाठी राज्य शासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे.ग्रुपने NA जागा खरेदी करणे
काही लोकांना गोडाऊन बांधण्यासाठी किंवा पोली हाऊस, पर्यटन किंवा विश्रांतीसाठी जागा NA करायची असते. त्यावेळेस अशा ठिकाणी एकट्याने खरेदी करण्यापेक्षा ग्रुपने खरेदी करणे उत्तम असते त्यामुळे ग्रुपने खरेदी केल्यास तुकडेबंदि होत नसुन या उलट त्या शासन कायदे, नियमानुसार खरेदिसाठी अडचण येत नाही.जमीन NA (बिगर शेती) करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- १. जिल्हाधिकारी कार्यालयातील येथील ऑफलाईन फॉर्म भरून कोर्टाचा स्टॅम्प आवश्यक
- २. ७/१२ उताऱ्याचा ५ झेरॉक्स प्रती
- ३. फेरफार नोंदींच्या ५ झेरॉक्स प्रती
- ४. महसूल विभागाकडून कोणतेही ऑनलाईन किंवा ऑफलाईन रेकॉर्ड आढळले नसल्याचे प्रमाणपत्र.
- ५. ८ अ चा उतारा चे ५ झेरॉक्स प्रती
- ६. भूमी अभिलेख रेकॉर्ड कार्यालयातून जमिनीचा नकाशा.
- ७. इमारतीसाठी बिल्डिंग प्लॅनच्या ८ झेरॉक्स प्रती
- ८. चालू ७/१२ उतारा ५ झेरॉक्स प्रती
- ९. महामार्ग प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र.
- १०.ग्राम पंचायती किंवा महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र.
- ११.बॉम्बे वहिवाट कायद्यांतर्गत परवानगी ४३/६३ नुसार.
- १२. सहकारी सोसायटीचे शेतकरी यांनी कर्ज नसल्याचा दाखला.
- १३. जमीन NA करताना तलाठ्याचं पत्र.
जमीन एनए करताना भरावा लागणारा नजराणा किती?
- आपण राहत असलेली जमीन NA च्या जमीनमध्ये रूपांतर केल्यास ५०% रक्कम भरावी लागते.
- शेतजमिनीचे व्यावसायिक जमीनमध्ये रूपांतर केल्यास जमिनीच्या NA ) एनए बाजारभावाच्या ७५% रक्कम भरावी लागते.
- शेतजमिनीचे निम-सरकारी जमीनमध्ये रूपांतर केल्यास जमिनीच्या NA बाजारभावाच्या २०% रक्कम भरावी लागते.
- रहिवासी जमीन औद्योगिक मध्ये रूपांतर केल्यास जमिनीच्या NA किमतीच्या २०% रक्कम भरावी लागते.
जमीन एनए करण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करावा?
- १. जमीन एनए करण्यासाठी प्रथम जमीन ज्या जिल्ह्यात असेल त्या जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा.
- २. २१ दिवसांतअर्ज आल्यावर जिल्हाधिकारी तहसीलदारांना अर्ज पाठवतात.
- ३. ८ दिवसांत तहसीलदार अर्जाची छाननी करतात.
- ४. ८ दिवसांत तहसीलदार तलाठ्यांकडून जमिनीची चौकशी करतात.
- ५. तहसीलदार जमिनीची एनए केल्यास पर्यावरणीय अडचणी किंवा प्रकल्पास धोका होणार नाही ना याची पडताळणी करतात.
- ६. तपासणी पूर्ण झाल्यावर जिल्हाधिकारी जमीन रूपांतराचा आदेश काढतात.
- ७. जमिनीची NA नोंदीचा आदेश झाल्यानंतर पुढील कार्यवाही तलाठी कार्यालयात केली जाते.
निष्कर्ष
आम्ही जमीन एनए कशी करायची ? संपूर्ण माहिती दिलेली आहे. तसेच जमीन एनए करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात. ते देखील आम्ही माहिती दिलेली आहे. आपण वरील सर्व बाबी समजून घेतल्यास, जमीन एन ए करण्यसाठी आपण या प्रक्रियेत यशस्वी होऊ शकता. हि माहिती आम्ही Video च्या माध्यातून देखील दिलेला आहे. त्या साठी आमच्या सोसिअल मिडिया ला जॉईन व्हावे लागेल. आणि तेथेच सर्व माहिती मिळेल.
- Facebook Channel : Link
- Instagram Channel : Link
- Telegram Channel : Link
- Whats App Channel : Link
- Official Website Link :
FAQs
- 1. NA जमीन म्हणजे काय?
- 2. NA प्रक्रिया कशी केली जाते?
- 3. जमीन NA करण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत?
- 4. जमीन एनए प्रक्रियेस किती वेळ लागतो?
- 5. NA प्रक्रिया कोण करू शकतो?