Nucleus Budget Yojana साठी इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडून सादर करावीत, असेही शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये श्री. पवार यांनी कळविले आहे.
Nucleus Budget Yojana नाशिक जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लोकांसाठी देखील ही योजना सुरु झालेली आहे. त्या साठी आम्ही आमच्या सोशल मीडियाला टेलिग्राम ग्रुपला pdf उपलब्ध करून दिलेले आहे.
Nucleus Budget योजनेसाठी 10 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत चंद्रकांत पवार
नंदुरबार, दिनांक 28 ऑगस्ट, 2024 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या नंदुरबार कार्यक्षेत्रातील नंदुरबार, नवापूर व शहादा तालुक्यातील आदिवासी बांधवांनी ( ST ) लाभार्थ्यांना वर्ष 2024 या आर्थिक वर्षात केंद्रवर्ती अर्थसंकल्पित Nucleus Budget योजनेत ‘अ’ गटात-उत्पन्न निर्मितीच्या, वाढीच्या योजनांसाठी 10 सप्टेंबर, 2024 पर्यंत Nucleus Budget Yojana साठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
Nucleus Budget Yojana ‘अ’ गटात उत्पन्न निर्मितीच्या किंवा वाढीच्या योजनेसाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना ग्रामीण भागातील एमएसआरएलएम व माविम मान्यता प्राप्त आदिवासी समुह बचत गटास, Nucleus Budget Yojana लाभार्थ्यांस विविध व्यवसाय करण्यासाठी, केस कर्तन व्यवसायासाठी, रसवंती दुकान सुरु करण्यास अथवा पुरवठा करण्यास, शेततळी धारकांना मत्स्यबोटुककली व निविष्ठांसाठी,
शेतकऱ्यांना व एमएसआरएलएम मान्यता प्राप्त आदिवासी समुह बचत गटास शेतात किटक नियंत्रणसाठी पीक संरक्षण यंत्र सौर स्वयंचलित प्रकाश सापळे खरेदी करण्यासाठी 85 टक्के अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तसेच अनुसूचित जमाती बचत गटांना बॅन्ड संच पुरवठा व अनुसूचित जमाती आदिवासी ग्रामपंचायतींना सार्वजनिक कार्यक्रमासाठी भांडी संच पुरवठा करण्यात येणार आहे.
Nucleus Budget Yojana 2024-25 या वर्षाच्या मंजूर आराखड्यातील योजनांसाठी इच्छुक अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून, बचत गटांकडून व अनुसूचित क्षेत्रात येते अलेल्या ग्रामपंचायती यांच्याकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.
नमुना अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार यांच्या कार्यालयात 29 ऑगस्ट 2024 ते 10 सप्टेंबर2024 या ( Nucleus Budget Yojana) कालावधीत शनिवार, रविवार व इतर दिवशी शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन वेळेत विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या कालावधीत अर्ज भरुन स्विकारले जातील. मुदतीनंतर अर्ज वाटप अथवा स्विकारले जाणार नाही.
अर्ज साठी लागणारे कागदपत्रे? Nucleus Budget Yojana
- या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्जासह जातीचा दाखला,
- शाळा सोडल्याचा दाखला,
- उत्पन्नाचा दाखला,
- आधारकार्ड,
- रेशनकार्ड,
- रहिवासी दाखला,
- लाभार्थ्याचे/गटाचे राष्ट्रीयकृत बँकत असलेल्या पासबुक,
- एक वर्षाच्या आतील उत्पन्नाचा दाखला,
- दारिद्र्य रेषेखालील दाखला,
- मतदानकार्ड/पॅन कार्ड,
- अलीकडील 2 पासपोर्ट आकाराचे फोटो,
- बचत गट/सामुहिक गट यांचे नोंदणी प्रमाणपत्र,
- ग्रामसभा ठराव,
- तसेच यापूर्वी सदर योजनेतून लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र.
Follow Us