![]() |
Gram panchayat Office Work |
ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते ? How does Gram Panchayat Office work? Read complete Information In Marathi
महाराष्ट्रात मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९८५ व त्या अंतर्गत केलेले नियम वानुसार ग्रामपंचायतीनी काम करणे बंधनकारक आहे.ग्रामपंचायतींची कामे :-
ग्रामपंचयातींनी त्यांच्या कार्यक्षेत्रात जनतेसाठी पाणी पुरवठा व स्वच्छता, रस्ते, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, गावातील पथदिवे इत्यादी सुविधा पुरविणे, सामाजिक आर्थिक सांस्कृतिक मागासवर्गीयाचे कल्याण, महिला व बाल कल्याणाचे विविध उपक्रम हाती घेणे बंधनकारक आहे. ग्रांमपचायत हद्दीतील जन्म, मृत्यू, उपजत मृत्यू, विवाह इत्यांदीच्या नोंदी घेणे, शासनाने विहित केलेल्या वेळापत्रकानुसार व गावातील ग्रामस्थांच्या निकडीनुसार ग्रामसभा घेणे क्रमप्राप्त आहे.
ग्रामस्थांनी मागणी केल्यानुसार ग्रामसभेची व ग्रामपंचायतीच्या ठरावांच्या इतिवृत्तांची प्रत सात दिवसात देणे बंधनकारक आहे. या व्यतिरिक्त केंद्रशासन, राज्यशासन जिल्हा परिषद व पंचायत समित्यांनी ग्रामपंचायतीकडे सोपविलेल्या योजनांची अंमलबजावणी करणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. आता ग्रामपंचायतीत संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) केंद्रावरुन ग्रामस्थांना नाममात्र रूपये २०/- एवख्धा फी मध्ये विहीत अर्जाचे नमूने व त्या मागणीनुसार दाखले देण्याचे प्रायोगिक काम सुरू झाले आहे. ग्रामपंचायतीकडून देण्यात येणाऱ्या दाखल्यासाठी शासनाकडून आकारण्यात येणारी फी जमा करणे आवश्यक आहे. तसेच जमा रक्कमेची पावती घेणे योग्य राहिल. ग्रामपंचायतशी संबंधीत काही कामांची माहिती व त्यांच्या कार्यपूर्तीचा कालावधी यांची
माहिती खाली नमूद केलेली आहे.
ग्रामस्थांनी मागणी केल्यानुसार ग्रामसभेची व ग्रामपंचायतीच्या ठरावांच्या इतिवृत्तांची प्रत सात दिवसात देणे बंधनकारक आहे. या व्यतिरिक्त केंद्रशासन, राज्यशासन जिल्हा परिषद व पंचायत समित्यांनी ग्रामपंचायतीकडे सोपविलेल्या योजनांची अंमलबजावणी करणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. आता ग्रामपंचायतीत संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) केंद्रावरुन ग्रामस्थांना नाममात्र रूपये २०/- एवख्धा फी मध्ये विहीत अर्जाचे नमूने व त्या मागणीनुसार दाखले देण्याचे प्रायोगिक काम सुरू झाले आहे. ग्रामपंचायतीकडून देण्यात येणाऱ्या दाखल्यासाठी शासनाकडून आकारण्यात येणारी फी जमा करणे आवश्यक आहे. तसेच जमा रक्कमेची पावती घेणे योग्य राहिल. ग्रामपंचायतशी संबंधीत काही कामांची माहिती व त्यांच्या कार्यपूर्तीचा कालावधी यांची
माहिती खाली नमूद केलेली आहे.
सरपंचाची कर्तव्ये :
अधिनियमानुसार सरपंच यांना कार्यकारी शक्ती प्रदान केली असून ते ग्रामपंचायतीचे प्रशासकीय प्रमुख म्हणून कामकाज पाहतो. सरपंच पंचायतीच्या सभेचे विनियमन करेल व पंचायतीच्या सर्व अधिकान्यांनी/कर्मचाऱ्यांनी केलेल्या कृती व कार्यवाहीवर देखरेख व नियंत्रण ठेवेल. अधिनियमानुसार आवश्यक असलेली सर्व विवरणे व अहवाल तयार ठेवण्ययाची व्यवस्था करेल. अधिनियमानुसार तसेच शासनाच्या निदेशाखाली देणे आवश्यक असतील अशी प्राप्ती प्रमाणपत्रे आपल्या सहीने व पंचायतीच्या मुद्रेनिशी देतील, प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून अन्य कार्ये पार पाडेल. गाव पातळीवर विविध विकास कार्यक्रम, अभियान व योजनेत लोकांचा सहभाग घेऊन गाव समृद्ध करण्याचा प्रयत्न करेल.
ग्रामसेवकाची कामे: How does Gram Panchayat Office work? Read complete Information In Marathi
ग्रामसेवक हा ग्राम पंचायतीचा सचिव म्हणून कामकाज पाहतो.
- १) ग्रामसभेच्या व मासिक सभेच्या अनुषंगाने तदनुषंगीक कामे. ग्रामसभा व मासिक सभेसमोर जमा व खर्च मंजूरीसाठी ठेवणे.
- २) विविध स्वरूपाचे ग्रामस्थांना दाखले देणे
- ३) ग्रामपंचायत हद्दीतील वेगवेगळे कर वसुल करणे, त्याची नोंद घेऊन कराची रक्कम बँकेत भरणे, आगामी वर्षासाठी कराची मागणी तयार करून मागणी देयके पाठविणे
- ४) ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक विहीत मुदतीत अधिनियमानुसार तयार करून पंचायत समितीकडे सादर करणे.
- ५) पिकावरील विविध रोगाबाबत ग्रामस्थांना जाहिर दवंडीद्वारे माहिती देणे.
- ६) साथरोग प्रतिबंधक उपाययोजना करणे, पुरेसा टी.सी.एल. साठा ठेवणे व त्याचा पाणीशुद्धीकरणासाठी नियमित वापर करणे,
- ७) गावातील साथीच्या आजाराबाबत प्राथमिक माहिती आरोग्य अधिकारी व गट विकास अधिकारी यांना देणे.
- ८) गावातील पाणी पुरवठा योजनेची देखभाल दुरूस्ती व सनियंत्रण करणे
- ९) जन्म, मृत्यू, उपजात मृत्यु व विवाह यांची नोंदणी करणे व त्या अनुषंगाने निबंधक म्हणून काम पाहणे.
ग्रामविकास व पंचायतराज विभाग ग्रामस्थाची सनदनुसार ग्रामपंचायतीने खालील दाखले व प्रमाणपत्रे ठराविक कालमर्यादेत देणे बंधनकारक आहे. ग्रामस्थांनी हे ग्रामसेवकांच्या लक्षात आणून द्यावे.
कार्यसूची
- १. जन्म नोंदीचा दाखला देणे. (५ वर्षाच्या अतिल नोंद) करणे : व याचा जबाबदारी कर्मचारी अधिकारी ग्रामसेवक/ग्रामविकास असतो तर याचा कार्यकाल / कालावधी २ दिवस असतो, विहित मुदतीत काम न झाल्यास यांची तक्रार गट विकास अधिकारी पंचायत समिती कडे करावी?
- २. मृत्यू नोंदीचा दाखला देणे. (५ वर्षाच्या अतिल नोंद) करणे : व याचा जबाबदारी कर्मचारी अधिकारी ग्रामसेवक/ग्रामविकास असतो तर याचा कार्यकाल / कालावधी २ दिवस असतो, विहित मुदतीत काम न झाल्यास यांची तक्रार गट विकास अधिकारी पंचायत समिती कडे करावी?
- ३) विवाह नोंदणीचा दाखला देणे : याचा जबाबदारी कर्मचारी अधिकारी ग्रामसेवक/ग्रामविकास असतो तर याचा कार्यकाल / कालावधी २ दिवस असतो, विहित मुदतीत काम न झाल्यास यांची तक्रार गट विकास अधिकारी पंचायत समिती कडे करावी?
- ४. फेरफार अर्जावर कार्यवाही करणे : याचा जबाबदारी कर्मचारी अधिकारी ग्रामसेवक/ग्रामविकास असतो तर याचा कार्यकाल / कालावधी ३० दिवस असतो, विहित मुदतीत काम न झाल्यास यांची तक्रार गट विकास अधिकारी पंचायत समिती कडे करावी?
- ५ ) ग्रामपंचायत येणे बाकी दाखला देणे : याचा जबाबदारी कर्मचारी अधिकारी ग्रामसेवक/ग्रामविकास असतो तर याचा कार्यकाल / कालावधी २ दिवस असतो, विहित मुदतीत काम न झाल्यास यांची तक्रार गट विकास अधिकारी पंचायत समिती कडे करावी?
- ६ ) खासगी नळ जोडणी परवाना देणे नाकारणे : याचा जबाबदारी कर्मचारी अधिकारी ग्रामसेवक/ग्रामविकास असतो तर याचा कार्यकाल / कालावधी ३० दिवस असतो, विहित मुदतीत काम न झाल्यास यांची तक्रार गट विकास अधिकारी पंचायत समिती कडे करावी?
- ७ ) व्यवसाय/उद्योग परवाना देणे : याचा जबाबदारी कर्मचारी अधिकारी ग्रामसेवक/ग्रामविकास असतो तर याचा कार्यकाल / कालावधी ३० दिवस असतो, विहित मुदतीत काम न झाल्यास यांची तक्रार गट विकास अधिकारी पंचायत समिती कडे करावी?
- ८) हयातीचा दाखला : याचा जबाबदारी कर्मचारी अधिकारी ग्रामसेवक/ग्रामविकास असतो तर याचा कार्यकाल / कालावधी २ दिवस असतो, विहित मुदतीत काम न झाल्यास यांची तक्रार गट विकास अधिकारी पंचायत समिती कडे करावी?
- ९) . बेघर दाखला : याचा जबाबदारी कर्मचारी अधिकारी ग्रामसेवक/ग्रामविकास असतो तर याचा कार्यकाल / कालावधी २ दिवस असतो, विहित मुदतीत काम न झाल्यास यांची तक्रार गट विकास अधिकारी पंचायत समिती कडे करावी?
- १० ) डिजिटल रहिवाशी दाखला : याचा जबाबदारी कर्मचारी अधिकारी ग्रामसेवक/ग्रामविकास असतो तर याचा कार्यकाल / कालावधी २ दिवस असतो, विहित मुदतीत काम न झाल्यास यांची तक्रार गट विकास अधिकारी पंचायत समिती कडे करावी?
- ११. बेरोजगार दाखला देणे : याचा जबाबदारी कर्मचारी अधिकारी ग्रामसेवक/ग्रामविकास असतो तर याचा कार्यकाल / कालावधी २ दिवस असतो, विहित मुदतीत काम न झाल्यास यांची तक्रार गट विकास अधिकारी पंचायत समिती कडे करावी?
- १२. विद्युत जोडणी नाहरकत प्रमाणपत्र : याचा जबाबदारी कर्मचारी अधिकारी ग्रामसेवक/ग्रामविकास असतो तर याचा कार्यकाल / कालावधी ३० दिवस असतो, विहित मुदतीत काम न झाल्यास यांची तक्रार गट विकास अधिकारी पंचायत समिती कडे करावी?
- १३. दारिद्रय रेषेखालील असले बाबत दाखला : याचा जबाबदारी कर्मचारी अधिकारी ग्रामसेवक/ग्रामविकास असतो तर याचा कार्यकाल / कालावधी २ दिवस असतो, विहित मुदतीत काम न झाल्यास यांची तक्रार गट विकास अधिकारी पंचायत समिती कडे करावी?
- १४. वृद्धासाठी निराधार असलेबाबत दाखला : याचा जबाबदारी कर्मचारी अधिकारी ग्रामसेवक/ग्रामविकास असतो तर याचा कार्यकाल / कालावधी २ दिवस असतो, विहित मुदतीत काम न झाल्यास यांची तक्रार गट विकास अधिकारी पंचायत समिती कडे करावी?
- १५. बांधकाम परवाना देणे (ग्रामपंचायत हद्दीत) : याचा जबाबदारी कर्मचारी अधिकारी ग्रामसेवक/ग्रामविकास असतो तर याचा कार्यकाल / कालावधी ६० दिवस असतो, विहित मुदतीत काम न झाल्यास यांची तक्रार गट विकास अधिकारी पंचायत समिती कडे करावी?
- १६. नमूना ८ अचा उतारा देणे : याचा जबाबदारी कर्मचारी अधिकारी ग्रामसेवक/ग्रामविकास असतो तर याचा कार्यकाल / कालावधी २ दिवस असतो, विहित मुदतीत काम न झाल्यास यांची तक्रार गट विकास अधिकारी पंचायत समिती कडे करावी?
- १७. जनतेकडून आलेल्या तक्रारींना अंतिरिम उत्तर : याचा जबाबदारी कर्मचारी अधिकारी ग्रामसेवक/ग्रामविकास असतो तर याचा कार्यकाल / कालावधी २ दिवस असतो, विहित मुदतीत काम न झाल्यास यांची तक्रार गट विकास अधिकारी पंचायत समिती कडे करावी?
ग्रामपंचायत दप्तर नमुने :
ग्रामपंचायत चा कारभार सुरळीत व सुगम चालावा म्हणून ग्रामपंचायतीच्या दप्तरांची नमूना नंबर १ ते २७ अशी विभागणी केलेली असते. हे साधारणतः पुढील प्रमाणे असतात. जागरुक नागरिकांनी व माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकारात निरिक्षणासाठी अर्ज करुन विविध नमुन्यातील दप्तराचे निरिक्षण करून सरपंच / ग्रामसेवक व्यवस्थीत कारभार करतात की नाही याची पडताळणी करु शकतात. हे नमूने केवळ पथदर्शक आहेत. यात ग्रामपंचायतीनुसार थोडाफार बदल असू शकतो.- नमुना १ अंदाजपत्रक
- नमुना २ पुरवणी अंदाजपत्रक
- नमुना ३ जमा.
- नमुना - ४ः खर्च
- नमुना ५: रोकडवही (कॅश बुक हह्याला ग्रा.पं.चा आत्मा ही म्हणता येईल)
- नमुना ६ः वर्गीकरण रजिस्टर
- नमुना ७: सामान्य पावती
- नमुना ८: कर आकारणी रजिस्टर
- नमुना १०: कर पावती (असेसमेंट रजिस्टर)
- नमुना ११ः किरकोळ जमा रकमांचे रजिस्टर.
- नमूना १२ १३ १४ हे रद्द झालेत
- नमुना १५: प्रमाणक (व्हाउचर किंवा बिल बुक)
- नमुना १६ : कर्मचारी वेतनमानाचे रजिस्टर (सर्विस बुक)
- नमुना १७ : पोस्टाचे तिकिट रजिस्टर,
- नमुना १८: साठा पंची रिजस्टर (स्टाक बुक)
- नमुना १९: मृतसाठा पंची रजिस्टर (डेड स्टाक बुक)
- नमुना २०: अनामत रकता परत रजिस्टर
- नमुना २१: किरकोळ जमा रकमांचे रजिस्टर
- नमुना २२: मजुरांचे हजेरीपट
- नमुना २३: मुल्यांकन पुस्तिका (मेजरमेंट बुक)
- नमुना २४: कर्मचारी वेतन रजिस्टर
- नमुना २५ स्थावर मालमत्ता
- नमुना २६: रस्तांची माहिती
- नमुना २७: जमिनीची माहिती
जन्मनोंदणी रजिस्टर :
या नोंदवहीत गावततील जन्मलेल्या प्रत्येक बाळांची नोंद घेतली जाते विवाह नोंदीचे रजिस्टर विवाह नोंदणी चे अधिकार आता प्रत्येक स्थानिक स्वराज संस्थाना दिलेले आहेत. त्यामुळे गावपातळीवर ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे विवाह निंबंधक म्हणून काम पाहतात. ग्रामस्थांच्या आवेदनानुसार विवाह नोंदणी करून दिली जाते.
मृत्यू नोंदणी रजिस्टर :
या नोंदवहीत गावात मृत्यू पावलेल्या व्यक्तीची नोंद ठेवली जाते. उपजत मृत्यू नोंद रजिस्टर या नोद वहीत गावात जन्मताच मृत्यू पावलेल्या बालकांच्या नोंदी घेतल्या जातात.
पशुनोंदी वही :
या मध्ये गावतील पशुसंख्येची गणना करू-नोंदी घेतल्या जातात. व गाय बैल म्हैस आदी पशुपालकांना मागणीनुसार पशु नोंदीचे दाखले करुन दिले जातात.
ग्रामपंचायतीची मासिक मिटींग
ग्रामपंचायतीची प्रत्येक महिन्यास मासिक मिटींग होणे आवश्यक आहे. सरपंच व निवडून गेलेल्या प्रत्येक पंचानी या मिटींगसाठी हजर राहाणे आवश्यक आहे. मासिक मिटिंगचे ठराव व कामकाज लेखे माहिती अधिकारात प्रत्येक नागरिकांना मागता व पाहता येतात.
ग्रामसभा : गावातील सर्वोच्च संसद !
- १) ग्रामसेवकांने दरवर्षीं हा १५ ऑगष्ट, २६ जानेवारी, २ ऑक्टोबर व १ मे या राष्ट्रीय सणाच्या दिवशी तसेच अन्य महत्वाच्या निर्णय प्रसंगी ग्रामसभा बोलवावी असा लेखी पत्राद्वारे आग्रह धरणे. जर प्रामविकास अधिकारी व सरंपच ग्रामसभा भरवित नसतील किंवा गुपचून कागदावर ग्रामसभा घेतल्याचे दाखवित असतील तर. गावात ग्रामसभा घेणे हे कायद्याने बंधनकारक आहे. आणि ग्रामसभेत प्रत्येक स्त्री पुरषांना हजर राहण्याचा आपली मते व सूचना मांडण्याचा अधिकार आहे. तसेच ग्रामसभेत बहुमताने घेतलेले निर्णय ग्रामपंचायतीने अंमलात आणणे बंधनकारक आहे. याबाबत कार्यकत्यांनी गावातील नागरिकांशी माहिती देवून जनजागरण करून गावात ग्रामसभा भरविण्यासाठी वातावरण निर्माण केले पाहिजे.
- २) गावाच्या विकासाचे, उन्नतीचे, शेतीविकासाचे शिक्षणाचे, आरोग्याचे ग्रामप्रशासनाचे, गावाला पुरविण्यात येणान्या रस्ता, वीज, पाणी, वनउपजावरील अधिकार, भूसंपादन, तसेच गावाच्या सामुहिक कल्याणाच्या उपक्रमाचे माहिती तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अंमलबाजवणी व हिशोब विषयीची कागदपत्रे ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदे मधील संबंधीत विभागात माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करून मागवून घेवून गामस्थाना सदर माहिती मिटींग घेवून उघड सांगितली पाहिजे.
- ३) गावाला मिळणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना उदा. कृषी सबसीडी, घरकूल वाटप, शेती अवजारे वाटप, बि-बियाणे, किसान निवृत्तीवेतन निराधार योजना आदी सर्व योजना गावात प्राधान्याने कोणाला मिळाल्या आहेत. याची माहिती अधिकार कायद्याने माहिती घेवून गावासमोर मिटींग घेवून उघड करावी. कोणी नियमबाहय पणे योजनेचा गैर फायदा घेतला असेल तर त्यामुळे गावातील एक गरजु नागरिकांचा हक्क डावलला गेला हे सर्व ग्रामस्थाना समजावून सांगावे,
- ४). गावाला राज्य व केंद्र शासनाकडून आलेले योजनारूपी व बेट बजेट ग्रामपंचायतीचे उत्पन्न व वार्षीक खर्च याचा हिशोब सर्वांसाठी पारदर्शक पणे ग्रामसभेत मांडला जात नसेल तर ग्रामपंचायत व बीडीओ कडून असा हिशोब माहिती अधिकारात माहिती चे नकल प्रत मागवून गावासमोर मिटिंग घेवून जाहिर करावा.
- ५) गावातील लोकसेवक उदा. ग्रामसेवक, तलाठी, सरकारी व शासनमान्य अनुदान प्राप्त शाळेतील शिक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्स व डॉक्टर वनाधिकारी, अंगणवाडी संचालिका हे सर्व ग्राम पातळीवरील लोकसेवक नियमीत हजर राहतात काय? त्यांची कामाची जबाबदारी, कामाचे स्वरूप गावात काम करण्याची व हजर राहण्याची वेळ, त्याच्याकडे गावासाठी आलेली सरकारी मदत, त्यांच्या ताब्यात असणारी शासकीय साधनसामुग्री याची माहिती अधिकाराच्या माध्यमातून माहिती मागवून सदर माहिती सर्व ग्रामस्थासमोर उघड करावी.
माहितीचा अधिकार वापरा गावाचा हिशोब सर्वांसमारे ठेवा
ग्रामपंचायतीकडे वर्षभरात कोठून किती व केव्हा निधी आला. आलेला पैसा कसा कोठे व केव्हा खर्च झाला. हे ग्रामसभेत सर्वांसमोर हिशोब सादर करणे आवश्यक आहे. अर्थिक वर्षे संपताच अशी ग्रामसभा घेवून हिशोब सादर करण्यास ग्रामसेवक व सरपंचास गावकऱ्यांनी भाग पाडले पाहिजे. गावात कोणाला किती सरकारी मदत किंवा अनुदान भेटले. याचा सगळा लेखाजोगा ग्रामसभेत मांडला गेला पाहिजे असे होत नसल्यास माहितीच्या अधिकारात सर्व माहिती मागवून ती गावकऱ्यासमोर ठेवली पाहिजे. हे काम सर्व गावकऱ्यांना विस्वासात घेवून गावातील तरूण व धडपडया युवकांनी जरूर केलेच पाहिजे.
लोकशाही नको आता लोकसहभागशाही हवी
सच्ची लोकशाही केंद्र में बैठे दस-बीस आदमी नही चला सकते, वो तो निचेसे हर गांव के लोगो द्वारा चलाई जानी जाहिए। ताकी सत्ता के केंद्र बिंदू जो इस समय दिल्ली, बंबई जैसे बड़े शहरों में है, मैं उसे भारत के सात लाख गांव में बाँटना चाहूंगा। मं. गांधीग्रामसभा : गावातील सर्वोच्च संसद !
- एकाच व्यक्तीकडे सत्ता = हुकूमशाही
- दोन व्यक्तीकडे सत्ता = संगनमतशाही
- तीन व्यक्तीकडे सत्ता = त्रिकूट
- चार व्यक्तीकडे =चांडाळ चौकडी
- पाच व्यक्तीकडे = पंचायत
- काही व्यक्तीकडे सर्व सत्ता = प्रतिनिधीशाही
- सर्व जनतेकडे थेट सत्ता = स्वराज !
ग्रामसभा आमचा हक्क आमचा आवाज ! लोकशाही नको आता लोकसहभाग शाही हवी
ग्रामपंचायतीची खरी ताकद शासनाच्या विविध पातळ्यांवरून प्रदान केलेले अधिकार किंवा आर्थिक सहाय्य नसून गावातील लोकांचा सहभाग व लोकांचे नेत्तृत्व आहे. गावपातळीवरच खरी लोकशाही व्यवस्था अमलात येऊ शकते. बाकी स्तरावर प्रातिनिधिक लोकशाही व्यवस्था आहे. लोकशाही व्यवस्थेत म्हणूनच सहभागी लोकशाही ला महत्व आहे. ग्रामसभा म्हणजे गावाची सर्वसाधारण सभा व ग्रामपंचायत म्हणजे ग्रामसभेची कार्यकारी समिती असे एकंदरीत स्वरूप असते.ग्रामसभा सर्व जाती वर्गांना सामावून घेणारी, व्यक्तीची प्रतिष्ठा व समतेचा पुरस्कार करणारी असते. गावातील सर्व मतदारांची मिळून ग्रामसभा बनते. ग्रामसभेद्वारे सरकारी कामांवर देखरेख अन्याय अत्याचार भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्याचे काम करता येते. त्याशिवाय समस्यांचा विचार करून त्या सोडविण्यासाठी योजना आखणे व त्या अमलात आणणे शक्य होते.
![]() |
ग्रामसभेची वैशिष्ट्ये:
प्रातिनिधिक अधिकारांपेक्षा वेगळा. ग्रामपंचायत आधील लोकांची प्रश्नांची उत्तरे, क्षमता मान्य करणारा व त्यास वाव देणारा प्रातिनिधि असावा. ग्रामस्थांच्या कुवतीवर विश्वास ठेवणारा. खन्या अर्थाने विकेंद्रित लोकशाही बळकट करणारा आहे म्हणूनच ग्रामसभेचा आग्रह धरा.ग्रामसभा-कायदेशीर तरतुदी :
- एका वर्षात किमान चार ग्रामसभा घेतल्याच पाहिजे. जास्तीत जास्त कितीही घेता येतील.
- ग्रामसभेच्या 2 सभा दरम्यान 4 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी असता कामा नये.
- सरपंचाने जर योग्य कालावधीत ( ग्रामपंचायत) ग्रामसभा न बोलविल्यास सचिव ( ग्रामपंचायत) ग्रामसभा बोलावेल.
- ही ग्रामसभा सरपंचाच्या किंवा उपसरपंचाच्या सहमतीने बोलवली असे मानले जाईल.
- पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच किंवा त्याच्या गैरहजेरीत उपसरपंच असेल.
- नंतरच्या ग्रामसभेचा अध्यक्ष ग्रामसभा सदस्यांतून निवडता येईल.
ग्रामसभा ही गावतील विकासाचे निर्णय घेणारी सर्वोच्च वैद्यानिक संस्था आहे. तर ग्रामपंचायत ही साधारणतः ग्राम सभेतील निर्णय व ठरावाची अंमलबजावणी करणारी संस्था आहे.
- पहिली ग्रामसभा १ मे ला होईल. दुसरी १५ ऑगस्ट, तिसरी नोव्हेंबर व चौधी २६ जानेवारी या दिवशी घेण्यात यावी. नियमित ग्रामसभेपूर्वी महिला ग्रामसभा घेण्यात यावी. अन्य ग्रामसभा किमान सात दिवसांचा वेळ देऊन सर्वांना निरोप पोहचवून सर्वसमावेशक व सर्वांच्या सोयीच्या वेळी घेता येईल.
- महिला ग्रामसभेचे इतिवृत्त नियमित ग्रामसभेपुढे सरपंच ठेवतील, ग्रामसभा त्यातील शिफारशींचा विचार करील. शिफारशीशी सहमत नसल्यास कारणांची नोंद करील.
- नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या ग्रामसभेला अंदाजपत्रकाची ग्रामसभा असे म्हणतात. इतरवेळी आवश्यक वाटल्यास जादा ग्रामसभा सरपंच बोलावू शकतात. पंचायत समिती चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जादा ग्रामसभा बोलावतील किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचने वरूनही जादा ग्रामसभा बोलावली जाते. गावात काम करणाऱ्या सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांवर प्रामसभेचे शिस्तविषयक नियंत्रण असेल. अशा कर्मचाऱ्यांचे वार्षिक मूल्यमापन ग्रामसभेकडून त्यांच्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले जाईल. अगर ग्रामसभा सदरचे अधिकार ग्रामपंचायतीला सोपवू शकते.
- ग्रामसभेची नोटीस सात पूर्ण दिवस आधी दिली पाहिजे. जादा ग्रामसभेची नोटीस चार दिवस आधी दिली पाहिले ग्रामसभेच्या नोटिशीत सभेचा दिवस, वेळ, जागा व सभेपुढील विषय इ. माहिती लिहिली पाहिजे
- ग्रामसभा, ग्रामसभेचा वेळ, दिनांक आणि ठिकाण तिच्या अगोदरच्या सभेत निश्चित करेल. ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या प्रभागात नियमित सभेपूर्वी सभा घेऊन प्रभागातील विकास प्रकल्प व कार्यक्रम याबाबत विचार विनिमय करून त्याचे इतिवृत्त सदस्यांनी सहीनिशी ठेऊन त्याची एक प्रत ग्रापंचायतीला पाठवली पाहिजे. सदर दलित, आदिवासी, महिला, व तरूणांच्या आशा, आकांक्षा, व्यथा वेदनांना वाव देणारे गावाचे शहाणपणा, सदिच्छा व कर्तुत्व व्यवक्त करणारे - लोकांचे व्यासपीठ म्हणजे ग्रामसभा आहे.
- गावात काम करणाऱ्या जसे की आंगणवाडी ताई परिचारिका, शिक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स व अन्य कमर्चारी, शासकीय, निमशासकीय व पंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर, तलाठी वन अधिकारी व अन्य शासकीय कर्मचारी ग्रामसभेचे शिस्तविषयक नियंत्रण राहील. अशा कर्मचाऱ्यांचे वार्षिक कामांचे मूल्यमापन त्यांच्या वरिष्ठ प्राधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले जाईल.
- राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या व्यक्तिगत लाभधारक योजनांकरिता लाभधारकांची निवड ग्रामसभा करील. जसे की अनुदानावरील शेती व अन्य अवजारे व उपकरणे, शालेय मुलीना सायकल वाटप, विधवा वेतन योजना, शेतमूजर वृधापकाळ योजना, तसेच इतर सर्व अन्य योजना ग्रामसभा पुढील सभेचा दिनांक, वेळ, आणि ठिकाण अगोदरच्या सभेत निश्चित करेल.
- ग्रामपंचायतीला सामाजिक व आर्थिक विकासाच्या योजना, कार्यक्रम किंवा प्रकल्प यांची अंमजबजावणी करण्यापूर्वी ग्रामसभेकडून मान्यता घ्यावी लागेल. विकास योजनांवर कोणताही खर्च करण्यास पंचायतीला ग्रामसभेची परवानगी घ्यावी लागेल. रस्ते बांधणे बाजर तळ बांधणे नाली बांधणे अन्य विकासकामे करणे
- शासकीय कामाकरिता जमीन अधिग्रहित करण्यासाठी ग्रामसभेचे मत घेणे आवश्यक राहील. प्रामसभेने बहुमताने ठराव दिला तरच पुढे राज्यशासनास जमीन अधिग्रहित करता येईल अन्यथा नाही. कर्तव्य: ग्रामसभा वर्षातून किमान ४ वेळा घेण्यात येईल.
- ग्रामसभेच्या दोन सभांमध्ये तीन महिन्यापेक्षा जास्त अंतर नसेल. ग्रामसभेच्या प्रत्येक नियमित सभेपूर्वी ग्रामसभेच्या महिला सदस्यांची सभा घेण्यात येईल.
- सरपंच किंवा उपसरपंचाने दिलेल्या योग्य वेळी योग्य कालावधीत कोणतीही एक सभा बोलवली नाही तर अशावेळी सचिव सभा बोलवतील. हि सभा सरपंच व उपसरपंच चांनी बोलावली असल्याचे गृहीत धरण्यात येईल.
- पंचायतीच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकी नंतरच्या ग्रामसभेच्या प्रथम सभेत सरपंच राहणार जर का सरपंच उपस्थित्त न राहिल्यास त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच अध्यक्षस्थानी राहील.
- ग्रामसभेच्या प्रत्येक सभेचे कार्यवृत ग्रामपंचायतीचा संबंधित सचिव तयार करील व ठेवील आणि त्याच्या अनुपस्थितीत सरपंच निर्देश देईल त्याप्रमाणे गावात काम करणारा शिक्षक, तलाठी किंवा अंगणवाडी सेविका यासारखा कोणताही शासकीय, निमशासकीय/पंचायतीचा कर्मचारी कार्यवृत्त तयार
ग्रामसभेत काय मागाल ?
१) मागील वर्षाचा ग्रामपंचायतीचा छापील जमाखर्च (एप्रील)
२) महिला ग्रामसभेचा अहवाल
३) परिपत्रकांचे वाचन ग्रामसेवकांने केले पाहिजे
४) हिशोब तपासणी (ऑडीट रिपोर्ट) शंका व उत्तरे
५) अंदाजपत्रक मान्यता (नोव्हेंबर)
६) मंजूर अंदाजपत्रक वाचन
२) महिला ग्रामसभेचा अहवाल
३) परिपत्रकांचे वाचन ग्रामसेवकांने केले पाहिजे
४) हिशोब तपासणी (ऑडीट रिपोर्ट) शंका व उत्तरे
५) अंदाजपत्रक मान्यता (नोव्हेंबर)
६) मंजूर अंदाजपत्रक वाचन
७) चालू वर्षात झालेल्या व करावयाच्या विकास कामाची माहिती
८) ग्राम शिक्षण समिती, रेशन दक्षता समिती व ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती निवड व अहवाल वाचन
९) महिलांसाठी 10 % राखीव निधीचा योग्य वापर
१०) अनुसूचीत जाती-जमातीसाठी १५ टक्के
करील आणि ते अभिलेखासाठी पंचायतीकडे सुपूर्द करील. ग्रामसभा यशस्वी करण्यासाठी घ्यावयाची काळजी: सर्वसाधारण ग्रामस्थ, विशेषतः शेतमजूर व स्त्रिया यांना सोयीचा दिवस व वेळ ग्रामसभेसाठी निवडावी.
ग्रामसभेची तारीख, वेळ, आणि ग्रामसभेपुढील विषय व्यापक पूर्वप्रसिध्दी द्यावी. दवंडीद्वारे लाऊडस्पिकर वरून ग्रामपंचायत कार्यालय व गावातील मोक्याच्या जागी मोठे ठळक फलक लावून अशी प्रसिद्धी करता येईल.
९) महिलांसाठी 10 % राखीव निधीचा योग्य वापर
१०) अनुसूचीत जाती-जमातीसाठी १५ टक्के
करील आणि ते अभिलेखासाठी पंचायतीकडे सुपूर्द करील. ग्रामसभा यशस्वी करण्यासाठी घ्यावयाची काळजी: सर्वसाधारण ग्रामस्थ, विशेषतः शेतमजूर व स्त्रिया यांना सोयीचा दिवस व वेळ ग्रामसभेसाठी निवडावी.
ग्रामसभेची तारीख, वेळ, आणि ग्रामसभेपुढील विषय व्यापक पूर्वप्रसिध्दी द्यावी. दवंडीद्वारे लाऊडस्पिकर वरून ग्रामपंचायत कार्यालय व गावातील मोक्याच्या जागी मोठे ठळक फलक लावून अशी प्रसिद्धी करता येईल.
तसेच गावातील शाळेच्या प्रत्येक वर्गात ग्रामसभेची माहिती सांगून मुलांना आपल्या पालकांना सभेत पाठविण्यास प्रवृत्त करावे. त्यामुळे भावी पिढीवरही ग्रामसभेचे संस्कार होतील. ग्रामसभेपूर्वी गावातील स्वयंसेवी संस्था, अंगणवाडी सेविकेमार्फत महिला मंडळाला ग्रामसभेची माहिती देण्यात आली तर महिलांचा सहभाग ग्रामसभेत वाडेल. ग्रुप ग्रामपंचायत असल्यास ( खेडे, पाडे, वस्ती) प्रत्येक गावात आळीपाळीने ग्रामसभा घेतली जावी. एरव्ही गावातील वेगवेगळया वाडी/पाड्यांवर आळीपाळीने ग्रामसभा घेण्यात यावी.
ग्रामसभेच्या कामकाजाचा लेखा जोखा मागण्यासाठी आरटीआय अर्ज नमुना
काही गावात ग्रामसभेचे काम उत्तम व पारदर्शक चालते परंतु काही गावात अजूनही सरंपच पंच व ग्रामसेवक कागदवरच ग्रामसभा भरवितात. गावाची मान्यता नसणारे ठराव करतात ग्रामसभेचे नियम पाळत नाहीत. अशा ग्रामपंचायत, नियमबाहय व बोगस ग्रामसभांची माहिती अधिकारा माहिती उघड करून मिळालेली माहिती नकल प्रते rti कार्यकर्त्यांनी सर्व गावांसमोर मांडावी
२) अर्जदाराचा पूर्ण पत्ता:
३) माहितीचा विषय आपल्या ग्रामपंचायत या गावातील आयोजिलेल्या ग्रामसभांची माहिती मिळणेबाबत.
४) आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील व कालावधी (पुढीलप्रमाणे)
६) अर्जदार दारिद्रय रेषेखालील नाही (१० रूपयाचा कोर्ट फी स्टॅम्प जोडला आहे)
२) पत्ता
३) माहितीचा विषय :- ग्रामपंचायतीच्या मार्फत राबविण्यात आलेल्या राज्य व केंद्र शासनांच्या विविध योजनांचा लेखाजोगा मिळणेबाबत. लाभार्थीची माहिती मिळणेबाबत,
४) आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील व कालावधी (सन २०१० व सन २०११)
केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अनुसार अर्ज (जोडपत्र " अ "नियम ३ नुसार)
- प्रति,
- जनमाहिती अधिकारी
- ग्रामपंचायत कार्यालय किंवा
- पंचायत समिती कार्यालय
- ता. जि.
२) अर्जदाराचा पूर्ण पत्ता:
३) माहितीचा विषय आपल्या ग्रामपंचायत या गावातील आयोजिलेल्या ग्रामसभांची माहिती मिळणेबाबत.
४) आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील व कालावधी (पुढीलप्रमाणे)
- A) गेल्या वर्षभरात सर्व किंवा दिनांक रोजी पार पडलेल्या ग्रामसभेच्या इतीवृत्ताची मिनिटस ची प्रत मिळावी. ग्रामसभेला उपस्थित असणाऱ्या सर्व मतदारांचे उपस्थिती रजिस्टरची झेरॉक्स द्यावी.
- B). ग्रामसभेत झालेल्या ठरावाची प्रत मिळावी. ग्रामसभेत ठरविलेल्या लाभार्थीची नावे व लाभाचा प्रकार या विषयी सहमतीने ठरविलेली लाभार्थीच्या नांवाची यादी ची प्रत वा याची नोंदविलेली माहिती द्यावी.
- C). ग्रामसभेत सादर केलेल्या ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकाची झेरॉक्स प्रत मिळावी तसचे ग्रामसभेत सादर केलेल्या ग्रामपंचायतीच्या वार्षीक हिशोबाची जमा खर्च ताळेबंद पत्रकाची झेरॉक्स पत मिळावी. किंवा लेखा परिक्षण झाल्याची ग्रामसभेत सादर केलेली ऑडीट कॉपी ची प्रत द्यावी.
- D) गावाच्या कारभार व्यवस्थीत चालावा म्हणून ग्रामसभेत निवडल्या गेलेल्या पाणी पुरवठा समिती, शिक्षण समिती, शांतता समिती, व रेशन दुकान दक्षता समिती आदि सर्व समित्याची सदस्य व हुद्दा अशी यादी मिळावी
६) अर्जदार दारिद्रय रेषेखालील नाही (१० रूपयाचा कोर्ट फी स्टॅम्प जोडला आहे)
- ठिकाण
- अर्जदाराची सही
- दिनांक:
- (नाव )
![]() |
ग्रामसभेच्या कामकाजाचा लेखा जोखा मागण्यासाठी आरटीआय अर्ज नमुना |
ग्रामपंचायतीच्या वतीने राबविलेल्या योजनांचा लेखाजोगा मिळणेबाबत. लाभार्थीची माहिती मिळणेबाबत नमूना अर्ज
माहितीचा अधिकार कायदा २००५-कलम ३ अन्वये अर्ज (जोडपत्र " अ "नियम ३ नुसार)
- प्रति,
- जनमाहिती अधिकारी
- ग्रामपंचायत कार्यालय,
२) पत्ता
३) माहितीचा विषय :- ग्रामपंचायतीच्या मार्फत राबविण्यात आलेल्या राज्य व केंद्र शासनांच्या विविध योजनांचा लेखाजोगा मिळणेबाबत. लाभार्थीची माहिती मिळणेबाबत,
४) आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील व कालावधी (सन २०१० व सन २०११)
- अ) वरील काळात आपल्या ग्रामपंचायतीस कोणकोणत्या योजना मंजूर झाल्या. त्या योजनांची यादी द्यावी. )
- ब)सदर योजना कधी, केव्हा मंजूर झाल्या याचा तपशील द्यावा
- क) वैयक्तीक लाभांच्या योजनासाठी गावातून किती अर्ज आले. किती मंजूर झाले किती नामंजूर झाले सर्व अर्जदारांची नावे द्यावीत.
- ड) वैयक्तीक लाभांच्या योजनेतील नावाची मंजूरी ग्रामसभेत घेतली होती काय ? असल्यास ग्रामसभेचा तसा ठराव घेतल्याची प्रत मिळावी.
- फ) वैयक्तीक लाभासाठी आलेल्या योजना ज्यां लाभार्थीना दिल्या त्यांच्या योजनेचे नाव, लाभाचे स्वरूप, पात्रतेचे निकष, मंजूर झालेला निधी / किंवा वस्तू या संबधीचे कागदपत्रांच्या छायांकित प्रती द्याव्यात
५) माहिती टपालाने हवी की व्यक्तिशः माहिती स्पीड पोस्टाने पाठवावी. व्यक्तीश:
६) अर्जदार दारिद्रय रेषेखालील आहे/नाही (नसल्यास १० रूपयाचा कोर्ट फी स्टॅम्प जोडला आहे)
- ठिकाण
- दिनांक :
- अर्जदाराची सही
- नाव :
- मो.:
![]() |
ग्रामसभेच्या कामकाजाचा लेखा जोखा मागण्यासाठी आरटीआय अर्ज नमुना : How does Gram Panchayat Office work? Read complete Information In Marathi |