स्वाधार योजनासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे 2024 | Swadhar Yojana Documents List In Marathi
Admin
11:18 PM
0
Swadhar Yojana Documents List In Marathi: नमस्कार स्वाधार योजनांचे लाभार्थी विद्यार्थ्यांनो आज डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोण कोणती आहेत. ते जाणून घेणार आहोत. तसेच अर्ज करतांना अर्जासोबत कोण कोणते कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. हि माहिती बरेच विद्यार्थ्यांना नसते म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत, स्वाधार योजना कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे.
स्वाधार योजनासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत : Swadhar Yojana Documents List In Marathi
लाभार्थी अर्जदाराचा फोटो
लाभार्थी अर्जदाराची सही
लाभार्थी याचा जातीचा दाखला
लाभार्थी याचा आधार कार्डाची प्रत
बँके पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किंवा बँक स्टेटमेंटची प्रत.
तहसीलदार यांनी 21 हजार चा दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र किंवा महसूल अधिकारी यांनी 21 हजार चा दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र
विद्यार्थी राहत असलेल्या पत्ता चा पुरावा म्हणून लाईट बिल.
शिकत असलेल्या महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट
बँक खाते आधार क्रमांकाशी kyc केल्याचा पुरावा
मागील वर्षात शिकलेल्या वर्गाची TC किंवा शाळा सोडल्याचा दाखला.
भाडे तत्वावर राहत असल्याचा पुरावा.
मेस यांची बिलाची पावती
भोजनालय यांची बिलाची पावती
खानावळ यांची बिलाची पावती
रहिवासी दाखला स्वयंघोषणा
मागील वर्षात पास झालेल्याची निकालाची प्रत
स्वयंघोषणा शपथपत्र
स्वयंघोषणा हमीपत्र
स्वाधार योजना च्या रिनिवल अर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे : Swadhar Yojana Documents List In Marathi
शिकत असलेल्या चालू वर्षाच्या बोनाफाईड
मागील वर्षात शिकत असलेचा गुणपत्रक
स्वतःचा जातीचा दाखला
चालु वर्षाचे 21हजार चे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
बँक पासबुक चे झेरॉक्स प्रत
भाडे करारनामा नकल पत्र
रूमचा जिओग्राफिकल लोकेशन असलेला फोटो
मेस / भोजनालय बिलाची पावती
रीनिवल अर्ज सादर करीत असताना, रहिवासी दाखला स्वयंघोषणा, स्वयंघोषणा शपथपत्र
स्वयंघोषणा हमीपत्र अपलोड करण्याची गरज नाही
स्वाधार योजनासाठी अर्ज कुठे करावा? : How To Apply Swadhar Yojana 2024
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला प्रथम ऑनलाईन सेतू केंद्र, किंवा CSC सेवा केंद्र अथवा, ऑनलाईन सायबर क्याफे, किंवा काही मुलं घरीच बसून स्वाधार योजनासाठी अर्ज करू शकता. तरी अर्ज करण्यासाठी आपल्या कडे आम्ही दिलेले सर्व लागणारे आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सेतू केंद्र, किंवा CSC सेवा केंद्र वर जाऊन भरून घ्या.