Pradhan Mantri Gram Sadak Yojana GR : शासन परिपत्रक -: प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही केंद्र शासनाची योजना असून ती केंद्र शासनाने विहित केलेल्या मार्गदर्शक सूचना व निकषांनुसार राज्याच्या ग्रामीण भागात राबविण्यात येते.
काय आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना? : Pradhan Mantri Gram Sadak Yojana GR
या योजनेंतर्गत रस्ते/मोऱ्या/पुलांची कामे केंद्र शासनाने विहित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार निविदा प्रक्रिया अवलंबून कंत्राटदारांमार्फत करण्यात येतात. या योजनेंतर्गत काम पुर्ण झाल्यानंतर पहिल्या ५ वर्षापर्यंत देखभाल-दुरुस्ती ही संबंधित कंत्राटदारांमार्फत करण्यात येत असते. त्यापुढील ५ वर्षांची देखभाल-दुरुस्ती महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत कंत्राटदारांकडून करण्यात येत असते.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना भेसळयुक्त डांबर कामासंदर्भात सूचना : Pradhan Mantri Gram Sadak Yojana
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्त्यांची नविन कामे, दर्जान्नतीची कामे, देखभाल-दुरुस्तीची कामे यासाठी कंत्राटदारांकडून भेसळयुक्त डांबर वापरले जाऊ नये यासाठी योग्य प्रतीचे डांबर वापरण्याच्या सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने प्रधानमंत्री ग्राम सडक व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत करण्यात येत असलेल्या रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामासंदर्भात पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेतः-
रस्त्यांच्या कामाचा दर्जा चांगला रहावा व त्यायोगे वाहतूक सुरळीतरीत्या सुरु रहावी या दृष्टीने रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामासाठी शासनाच्या अंगीकृत असलेल्या तेल कंपन्यांच्या रिफायनरीमधूनच डांबर प्राप्त करुन घेण्याबाबत व त्या डांबराचा वापर करण्यापूर्वी त्याची गुणवत्ता/प्रत
Pradhan Mantri Gram Sadak Yojana GR : शासन परिपत्रक क्रमांका ग्रासयो २०१७/प्र.क्र. ७९/ योजना-९
(Grade) तपासण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संदर्भाधीन दि.८/१०/२००७ च्या शासन परिपत्रकान्वये कार्यपध्दती विहित केलेली आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्यांची नवीन कामे, दर्जोन्नतीची कामे व देखभाल-दुरुस्तीची कामे करतांना रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामात वापरावयाच्या डांबराबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने दि.८/१०/२००७ च्या शासन परिपत्रकान्वये विहित केलेली कार्यपध्दती अवलंबविण्यात यावी, तसेच या शासन परिपत्रकातील सूचनांचा अंतर्भाव निविदा प्रारुप प्रपत्रात करण्यात यावा,
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संदर्भ : Pradhan Mantri Gram Sadak Yojana
प्रधानमंत्री ग्राम सडक व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामांमध्ये कंत्राटदारांकडून शासन अंगीकृत तेल कंपन्यांच्या रिफायनरीतून डांबर उपलब्ध करुन दिल्याबाबत सादर करण्यात येणाऱ्या इनव्हाईस/मुळ गेटपास/चलनाची सत्यता पडताळणीबाबतची कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संदर्भाधीन दि.१/७/२०१६ व ३१/३/२०१७ च्या परिपत्रकान्वये विहित केलेल्या कार्यपध्दतीप्रमाणे करण्यात यावी. अशाप्रकारे इनव्हाईस/मुळ गेटपास/चलनाची सत्यता पडताळणी करण्याची जबाबदारी संबंधित कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था यांची राहील.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना मधील रस्ता निकृष्ट दर्जाच्या निदर्शनास आल्यास ? Pradhan Mantri Gram Sadak Yojana
कंत्राटदारांकडून प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाच्या डांबराचा वापर करुन शासन अंगीकृत तेल कंपन्यांच्या रिफायनरीकडील डांबराची बनावट चलने सादर करणे अशा घटना घडत असल्याची बाब निदर्शनास आल्यामुळे या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी व अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शासन अंगीकृत तेल कंपन्यांच्या रिफायनरींकडून प्राप्त होणा-या डांबरांच्या चलनांची खातरजमा करण्यासाठी रिफायनरीच्या साहाय्याने कार्यपध्दती निश्चित करण्याच्या मार्गदर्शक सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने संदर्भाधीन दि.१२ एप्रिल, २०१७ च्या शासन परिपत्रकान्वये दिल्या आहेत.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना प्राप्त होणा-या डांबरांच्या चलनांची खातरजमा : Pradhan Mantri Gram Sadak Yojana
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपरोक्त दि. १२ एप्रिल, २०१७ च्या शासन परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या या मार्गदर्शक सूचनांचे प्रधानमंत्री ग्राम सडक व मुख्यमंत्री ग्राम सडक योजने मधील कामे करताना काटेकोर पालन कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था यांनी करावे, प्रधानमंत्री ग्राम सडक व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्यांच्या विविध प्रकारच्या डांबरीकरणाच्या कामात शासन अंगीकृत तेल कंपन्यांच्या रिफायनरींकडून प्राप्त होणा-या डांबरांच्या चलनांची खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधित कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था यांची राहील.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना : Pradhan Mantri Gram Sadak Yojana GR साठी येथे क्लिक करा.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनाचा तिमाही आढावा ? Pradhan Mantri Gram Sadak Yojana
अधिक्षक अभियंता, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था यांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या जिल्ह्यातील कामांसाठी वापरलेल्या डांबराच्या चलनांच्या सत्यतेबाबत तिमाही आढावा घ्यावा.
डांबराची खोटी चलने वापरुन कामाचे देयक अदा केल्याचे आढळल्यास संबंधित अधिका-यांविरूध्द शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचा प्रस्ताव अधिक्षक अभियंता, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था यांनी मुख्य अभियंता, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था यांच्यामार्फत शासनास सादर करण्याची कार्यवाही करावी.
शासन परिपत्रक क्रमांकः ग्रासयो-२०१७/प्र.क्र.७९/ योजना-९ : Pradhan Mantri Gram Sadak Yojana GR
या परिपत्रकातील सूचनांचे काटेकोर पालन करण्याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता, प्रमंग्रासयो, मग्रारविसं यांची राहील.
Follow Us