Mahavitran Priped Card Arj in Marathi : नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला महावितरण प्रीपेड मीटर चे 3 अर्ज नमुना देत आहे. जे कि लिहितांना आणि अर्ज करतांना सोप्यात सोपी पद्धत मिळेल. तसेच हे प्रीपेड मीटर कायद्याने उलंघन देखील आहे. चला तर जाणून घेऊया. 3 महावितरण प्रीपेड मीटर चे अर्ज नमुने.
महावितरण प्रीपेड मीटर अर्ज नंबर १ : Mahavitran Priped Card Arj in Marathi
प्रति,
मा. तालुका अधीक्षक अभियंता महावितरण कार्यालय ( तालुका चे नाव लिहा )
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ता. ( तालुक्याचे नाव )
यांच्या सेवशी
दिनांक
अर्जदार चे नाव-
- ग्राहक क्रमांक-
- पत्ता-
- मो.क्र-
विषय :- प्रीपेड विज मीटर नाकारण्या बाबत.
मा. महोदय,
विषयानुसार सविनय सादर कि, महावितरणकडून विज ग्राहकांना प्रीपेड विज मिटर बसाविण्या बाबत प्रक्रिया सुरु आहे. वास्तविक विज मिटर निवडी बाबत विज कायदा 2003 कलम 55 नुसार ग्राहकांना स्वातंत्र्य आहे. मात्र विज वितरण कंपनी कडून एक प्रकारे अघोषित सक्तीचं करून प्रिपेड मिटर्स लावणे बंधनकारक असल्याचे चित्र उभारण्यात येत आहे जे विज कायद्यातील तरतुदीचे सरळ सरळ उल्लंघनच आहे. त्यामुळे मी प्रिपेड मिटर बसाविण्यासाठी अजिबात इच्छुक नाही. करिता मला माझ्या विज जोडणीसाठी प्रिपेड मिटर लावण्यात येऊ नये.
तक्रारकर्ता ची सही
हेही वाचा :
- महावितरण विरुद्ध तक्रारी अर्ज कसे लिहावे?
- महावितरण विरुद्ध Offline तक्रारी अर्ज कसे लिहावे?
- महावितरण विरुद्ध ऑनलाईन तक्रारी अर्ज कसे लिहावे?
महावितरण प्रीपेड मीटर अर्ज नंबर २ : Mahavitran Priped Card Arj in Marathi
प्रति,
मा. जिल्हा अधीक्षक अभियंता महावितरण कार्यालय ( जिल्हा चे नाव लिहा )
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी जिल्हा ( जिल्हा चे नाव )
यांच्या सेवशी
दिनांक :
अर्जदार चे नाव- ( पूर्ण नाव सह पूर्ण पत्ता लिहा )
- पत्ता-
- मो.क्र-
- ग्राहक क्रमांक- ( Lite Bile Number )
विषय :- प्रीपेड विज मीटर नाकारण्या बाबत..
मा. महोदय,
मी मौजे ( गावाचे नाव, ग्रामपंचायत चे नाव लिहा ) किंवा ( शहराचे नाव नगरपालिका चे नाव लिहा ) येथील रहिवासी असून मी एक उच्च शिक्षित तरुण सामाजिक कार्यकर्ता असून आपणास उपरोक्त विषयानुसार सविनय सादर करितो कि, मा. तालुका अधीक्षक अभियंता महावितरण कार्यालय ( तालुका चे नाव लिहा ) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ता. ( तालुका चे नाव लिहा ) यांना दिनांक ( तारीख टाका ) प्रीपेड विज मीटर नाकारण्या बाबत. लिखित अर्ज लिहले आहे.
परंतु आज अद्यापही मा. तालुका अधीक्षक अभियंता महावितरण कार्यालय कडून कोणतेही अहवाल चौकशी केलेली नाही तरी. मा. महोदय आपणास विनंती करितो कि, महावितरणकडून विज ग्राहकांना प्रीपेड विज मिटर बसाविण्या बाबत प्रक्रिया सद्या सुरु झालेले आहे. वास्तविक विज मिटर निवडी बाबत विज बिल कायदा 2003 कलम 55 नुसार ग्राहकांना स्वातंत्र्य आहे. मात्र विज वितरण कंपनी कडून एक प्रकारे अघोषित सक्तीचं करून प्रिपेड मिटर्स लावणे बंधनकारक असल्याचे चित्र उभारण्यात येत आहे जे विज कायद्यातील तरतुदीचे सरळ सरळ उल्लंघनच आहे. त्यामुळे मी प्रिपेड मिटर बसाविण्यासाठी अजिबात इच्छुक नाही. ह्या करिता मला माझ्या विज जोडणीसाठी प्रिपेड मिटर लावण्यात येऊ नये. हि नम्र विनंती
तक्रार कर्ता ची सही
महावितरण प्रीपेड मीटर अर्ज नंबर ३ : Priped Card Arj in Marathi
प्रति,
मा. व्यवस्थापकीय संचालक महावितरण मुंबई
यांच्या सेवेशी
दिनांक :
अर्जदार चे नाव- ( संपूर्ण नाव लिहा )
- ग्राहक क्रमांक-
- संपूर्ण पत्ता-
- मो.क्र-
विषय :- प्रीपेड विज मीटर नाकारण्या बाबत. आणि तालुका अभियंता, जिल्हा अभियंता यांचा वर कार्यवाही करणे बाबत.
मा. महोदय,
मी मौजे ( गावाचे नाव लिहा ) किंवा ( शहराचे, नगरपालिका चे नाव लिहा ) येथील रहिवासी असून मी एक उच्च शिक्षित तरुण मुलगा असून आपणास उपरोक्त विषयानुसार सविनय लिखित अर्ज सादर करितो कि, मा. तालुका अधीक्षक अभियंता महावितरण कार्यालय आणि ( मा. जिल्हा अधीक्षक अभियंता महावितरण कार्यालय ( जिल्हा चे नाव लिहा ) येथे माझा घरातील प्रीपेड विज मीटर नाकारण्या बाबत. लिखित अर्ज लिहले आहे. परंतु आज अद्यापही मा. जिल्हा अधीक्षक अभियंता आणि मा. तालुका अधीक्षक अभियंता यांनी कोणतेही कार्यवाही पाऊले उचलेली नाही.
मा. महोदय, आपणास विनंती पूर्वक अर्ज सादर करितो कि, महावितरणकडून विज ग्राहकांना प्रीपेड विज मिटर बसाविण्या बाबत जी प्रक्रिया सुरु आहे. वास्तविक विज मिटर निवडी बाबत विज कायदा 2003 कलम 55 नुसार मला मान्य आहे, तरी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कडून प्रिपेड मिटर्स लावणे बंधनकारक असल्याचे चित्र उभारण्यात आले आहे ते मला मान्य नाही.
तरी आपणास पुनःछ विनती करितो कि, विज वितरण कंपनी कडून एक प्रकारे अघोषित सक्तीचं करून प्रिपेड मिटर्स लावणे बंधनकारक असल्याचे चित्र उभारण्यात येत आहे जे विज कायद्यातील तरतुदीचे सरळ सरळ उल्लंघनच आहे. ते रद्द करावे तसेच मी स्वत प्रिपेड मिटर बसाविण्यासाठी अजिबात इच्छुक नाही. या करिता मला माझ्या विज जोडणीसाठी प्रिपेड मिटर लावण्यात येऊ नये. असे विनंती करितो, आणि मा. जिल्हा अधीक्षक अभियंता आणि मा. तालुका अधीक्षक अभियंता यांना दप्तर दिरंगाई कायदानुसार कार्यवाही करावी हि नम्र विनंती. त्यामुळे
तक्रार कर्ता ची सही.