![]() |
आरोग्य खात्यात नोकरीचे आमिष दाखवित दीड कोटींची फसवणूक दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
धुळे : जिल्ह्यातील आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याचे देण्याचे आमिष दाखवून साक्री तालुक्यातील ९० उमेदवारांची सुमारे दीड कोटी पेक्षा अधिक रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कविता प्रशांत भदाणे (रा. ध्रुवनगर, सातपूर, नाशिक) आणि वैभव विजय पोळ (रा. ब्राह्मणआळी, ता.अलिबाग, जि. रायगड) यांची अशोकस्तंभाजवळील भवानी माता मंदिराजवळ शिवांजली सोल्यूशन नावाचे कार्यालय आहे.
या दोघांनी संगनमत करून कुणाल गुलाबराव भदाणे (रा. शेवाळी, ता. साक्री, जि. धुळे) यांच्या ओळखीच्या साक्री तालुक्यातील ९० उमेदवारांना धुळे जिल्ह्यातील आरोग्य खात्यात सफाई कामगार, शिपाई, ड्रायव्हर, सुपरवायझर, लॅब टेक्निशियन आणि नर्सिंग या पदांवर कंत्राटी पद्धतीने नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. यासाठी आरोपींनी उमेद-वारांकडून एकूण १ कोटी ४० लाख रुपये घेतले.
यापैकी कविता भदाणे यांनी त्यांच्या बँक खात्यात काही रक्कम घेतली, तर काही रक्कम रोख स्वरूपात स्वीकारली. यातील २९ लाख रुपये त्यांनी कमिशन म्हणून स्वतःकडे ठेवून घेतले, तर उर्वरित १ कोटी ११ लाख रुपये वैभव पोळ यांना दिले.
मात्र, अनेक दिवस उलटूनही या ९० उमेदवारांना याप्रकरणात धुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी देखील गुंतल्याचा संशय....
या रॅकेटमध्ये शिरपूर तालुक्यातील अनेकांची देखील फसवणूक करण्यात आल्याचे चित्र होत आहे स्पष्ट..
आरोग्य विभाग धुळे
कोणतीही कंत्राटी नोकरी मिळाली नाही. त्यामुळे उमेदवारांनी कुणाल भदाणे यांच्याकडे नोकरभरतीसाठी दिलेले पैसे परत करण्याची मागणी केली. कुणाल भदाणे यांनी कविता भदाणे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, भदाणे यांनी कुणाल भदाणे यांना उमेदवारांना ५७ लाख १५ हजार रुपये देण्यास भाग पाडले. विश्वास संपादन करण्यासाठी कविता भदाणे
यांनी कुणाल भदाणे यांना ५० हजार रुपये आणि काही उमेदवारांना दोन लाख रुपये दिले. मात्र, उर्वरित १ कोटी ३७ लाख ५० हजार रुपये त्यांनी परत केले नाहीत. तसेच, पैसे दिलेल्या उमेदवारांना कोणतीही नोकरी मिळाली नाही.
या प्रकरणी, फिर्यादी कुणाल भदाणे आणि इतर उमेदवारांची आर्थिक फसवणूक केल्याबद्दल सरकारवाडा पोलीस ठाण्यात कविता भदाणे आणि वैभव पोळ यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बैसाणे करत आहेत.
याच प्रकरणी सरकारवाडा नाशिक येथे देखील दोन महिण्यापुर्वी कविता प्रशांत भदाणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तरी नाशिक पोलीस ठाणे यांनी आता पर्यंत कुठलीही एक चौकशी केलेली नाही. सदर व्यक्ती ही खालील फोटो मध्ये दिसत आहे. ती स्त्री आहे. तिचा मोबाईल नं. पोलीस ठाणे येथे दिलेला आहे.
![]() |
हेही वाचू शकता. पोलीस ठाणे येथे माहिती अधिकारातून माहिती कशी मांगावी?