![]() |
१) घरातली दैनंदिन कामांची यादी :
01) फोन चार्ज करणे,02) पांघरुणाच्या घड्या करणे,
03) उठल्यावर पाणी- औषध घेणे,
04) व्यायाम करणे,
05) पाणी भरणे
06) झाडांना पाणी घालणे,
07) डस्टिंग, इतर साफसफाई,
08) कपड्यांच्या घड्या करणे,
09) चहा-नाश्ता बनवणे,
10) स्वयंपाक करणे,
11) संपलेल्या वस्तूंची यादी अपडेट करणे,
12) भांडी पुसून लावणे,
13) डायनिंग टेबल आवरणे,
14) किचन टॉवेल धुवायला टाकणे,
15) बाथरूम सफाई,
16) बेसिन, सिंक सफाई,
17) टॉयलेट सफाई,
18) हॉल, बेडरूम सफाई,
19) गॅलरी सफाई,
20) स्वतःचे आवरणे,
21) व्हॉट्स अॅप वाचन,
22) पुस्तक, पेपर वाचन, छंद जोपासणे,
23) जेवणे, जेऊ घालणे,
24) उरलं सुरलं अन्न डब्यात, वाटीत काढणे,
25) फेसबुक वाचन, लिखाण, फोन,
26) चहा पिणे, पाजणे,
27) चालायला जाणे,
28) बाजारात जाऊन भाजी घेऊन येणे,
29) रोजच्या गरजेच्या वस्तू, सामान आणणे,
30) संध्याकाळी रात्रीच्या जेवणाची तयारी,
31) रात्रीचे जेवणे, जेवू घालणे,
32) इतर आवराआवर,
33) दुसऱ्या दिवशीचा नाश्ता, जेवणाची तयारी,
34) फेसबुक वाचन,
35) मुलांची खेळणी, इतर पसारे आवरणे,
२) आठवड्याचे काम : Sriya Divasbhar Kay Kartat
36) आरसे पुसणे,37) कपडे प्रेसला देणे,
38) प्रेसचे कपडे कपाटात नीट ठेवणे,
39) टॉवेल धुणे,
40) पुस्तकं आवरणे,
41) तिखटामिठाचा डबा, तेल- तुपाचे डबे घासणे,
42) डबे पुसून घेणे,
43) खाऊचे डबे आवरणे,
44) किचन पुसून घेणे,
45) मायक्रोवेव्ह आतून डीप क्लीन करणे,
46) बेडरूम आवरणे,
47) स्टडी रूम आवरणे,
48) बाथरूम डीप क्लिनिंग करणे,
49) गार्डनची व्यवस्था,
50) घरातील झाडांना पाणी घालणे,
51) आठवड्याच्या भाज्या आणणे,
52) फ्रीज साफ करणे,
53) फ्रीजमध्ये भाज्या भरून ठेवणे,
54) कांदे, बटाटे ट्रॉली साफ करणे,
55) पाणी, दूध मागवणे,
56) जास्तीचे डस्टिंग टीव्ही, बुकशेल्फ, फ्रीझ,
57) औषधे संपली असतील तर मागवणे,
58) आठवड्याचे मेनू प्लॅनिंग करणे,
59) आठड्याचे कामाचे प्लॅनिंग करणे,
60) आठवड्याचे भेटी गाठी, शॉपिंग प्लॅनिंग,
61) सुट्टीचे प्लॅनिंग करणे,
62) पाहुणे येणार असतील तर विशेष मेनू प्लॅनिंग करणे,
63) दरवाजे पुसून काढणे,
64) मॉलला भेट देणे,
65) जवळपास बागेत, प्रदर्शन बघायला जाणे.
![]() |
३) महिन्याची काम : Sriya Divasbhar Kay Kartat
66) सगळ्या बेडशीटस बदलणे, धुणे,67) डबे पाहून जे संपले असेल ते आणि गरजेचे सगळ्या वाणसामानाची यादी करणे,
68) सफाईचे सामान मागवणे
69) रिकामे डबे भरून घेणे,
70) साबण, शॅम्पू, हँड वॉश रिकामे झालेले बदलणे,
71) पगार देणे,
72) बिल भरणे : प्रेस, पेपर, लाईट, गॅस, लँडलाईन, मोबाईल इ.
73) फिरायचे प्लॅनिंग करणे,
74) सणावाराची तयारी करणे,
75) सेल असेल तर त्यानुसार यादी करणे,
76) घरी पाहुणे येणार असतील तर त्यांच्या साठी भेटवस्तू आणणे,
77) मोठ्या वस्तूंच्या खरेदीचा विचार करणे,
78) बिघडलेल्या वस्तूंची दुरुस्ती करून घेणे,
79) रद्दी बाजूला काढणे,
80) औषध मागवणे,
81) मैत्रिणीच्या भेटी-गाठी, भिशी,
82) वॉर्डरोब आवरणे,
83) जुने कपडे काढून टाकणे,
84) डब्यातील जुने खाऊ, डेट संपून गेलेले मसाले- स्नॅक्स फेकून देणे,
85) फॅन पुसून घेणे,
86) किचन ट्रॉली, इतर डीप क्लिनिंग करणे,
87) फॉइल, टिश्यू पेपर, डस्टबिन बॅग मागवणे,
88) जुन्या चादरी धुवून घेणे,
89) घरात, बाथरूम मध्ये एअरफ्रेशनर बदलणे,
90) पार्लरला भेट देणे,
91) पर्सची साफसफाई,
92) बाहेरगावी जाण्यासाठी तिकिटे बुक करणे,
93) गावाला जाऊन आले असले तर बॅग आवरून ठेवणे,
94) गावाला जायचे असेल तर बॅगा स्वच्छ पुसून मग भरणे,
95) प्रवासासाठी आयकार्ड, तिकिटे, पासपोर्ट, कॅश, कार्ड, गॉगल, चष्मा पर्समध्ये ठेवणे,
96) वाढदिवस असेल इतर काही कार्यक्रम असेल तर भेटवस्तू आणून ठेवणे त्यानुसार फोन करणे,
97) स्वतःच्या, घरातल्या व्यक्तींच्या रेग्युलर टेस्ट्स, चेकअप करून घेणे.
४) अति गृहकृत्यदक्ष विभाग : Sriya Divasbhar Kay Kartat
98) दूध फ्रीजमध्ये ठेवणे,99) दही लावणे,
100) साय जमवणे,
101) लोणी काढणे,
102) तूप घरी कढवणे,
103) राहिलेल्या बेरीचे नानाविध प्रकार करणे,
104) वाळवणाचे पदार्थ करणे,
105) फळांचे ज्यूस, शेक, इतर सुप्स नियमित घरी करणे,
106) नवीन पदार्थ, केक, बिस्किटे, पाव घरी करणे,
107) घरात कायम चिवडा, लाडू करणे,
108) सिझनल फुलं, झाडे नर्सरीतून मागवणे.
५) अधिक विचार करुन सुचलेली कामे :
109) देवपूजा करणे,
110) एखादे व्रत, त्याची तयारी, सणवार साजरे करण्याची तयारी,
111) कपड्यांची डागडुजी, बटण लावणे, उसवलेले शिवणे,
112) मुलांचा अभ्यास घेणे,
113) प्रोजेक्ट बनवणे, मुलांचा गृहपाठ घेणे व करणे,
110) एखादे व्रत, त्याची तयारी, सणवार साजरे करण्याची तयारी,
111) कपड्यांची डागडुजी, बटण लावणे, उसवलेले शिवणे,
112) मुलांचा अभ्यास घेणे,
113) प्रोजेक्ट बनवणे, मुलांचा गृहपाठ घेणे व करणे,
114) नवरा बिघडू नये म्हणून त्याला धाकात ठेवणे.
115) ऐनवेळी सुचलेली कामे करणे..
लिहिल्यापासून अनेकदा ही लिस्ट अपडेट केली आहे. तरीही लिस्ट अपूर्णच आहे. अजून नोकरी करणाऱ्या, लहान मुले असणाऱ्या, अशा विविध वयोगटानुसार वाढणारी कामे यात अंतर्भूत नाहीतच.....!
115) ऐनवेळी सुचलेली कामे करणे..
लिहिल्यापासून अनेकदा ही लिस्ट अपडेट केली आहे. तरीही लिस्ट अपूर्णच आहे. अजून नोकरी करणाऱ्या, लहान मुले असणाऱ्या, अशा विविध वयोगटानुसार वाढणारी कामे यात अंतर्भूत नाहीतच.....!
लिहीता लिहीता खालील श्लोक मनात आला. Sriya Divasbhar Kay Kartat
- असित गिरी समं स्यात,
- कज्जलं सिन्धु पात्रे,
- सुरतरुवर शाखा,
- लेखनी पत्र मूर्वी,
- लिखति यदि गृहीत्वा,
- शारदा सर्व कालं,
- तदपि तव गुणानामीश,
- पारं ना याति !
![]() |
ताजा कलम
समुद्राची शाई करून जरी लिहायचे ठरवले तर तीही कमी पडावी असं जर गृहकृत्यदक्ष गृहिणी बद्दल म्हटले तर त्यात काही वावगे वाटून घेऊ नये.....! स्त्री, गृहिणी, गृहकृत्यदक्ष, शेयरिंग आणि केअरिंग एवढ म्हटल म्हणजे नाही संपल. पुरुषमंडळींनी अंतर्मुख होऊन विचार करावा की यातली किती कामे ते पूर्णपणे व किती कामे संयुक्तपणे करतात.....?महिलांचा मान ठेवा,
अविनाश देशमुख शेवगांव
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*