![]() |
AADHAAR CARD |
कोर्ट मॅटर अॅड. गायत्री कांबळे
AADHAAR CARD सक्तीचे केले असले, तरी तो फक्त ओळखीचा पुरावा होऊ शकतो. मात्र, तो जन्मतारखेचा पुरावा होऊ शकत नाही, असा निर्णय एका प्रकरणात न्यायालयाने दिला आहे. सर्वोच न्यायालयाने आधार कार्ड हे जन्माचा पुरावा म्हणून मान्य नाही असं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की, मृत व्यक्तीचं वय ठरवण्यासाठी आधार कार्डवर उल्लेख करण्यात आलेल्या जन्म तारखेऐवजी शाळा सोडल्याचा दाखला हा ग्राह्य धरावा, असेही न्यायालयाने सुचवले आहे.काय आहे AADHAAR CARD प्रकरण?
मोटार अपघात संबंधीचा दावा होता. ज्यामध्ये नुकसान भरपाई म्हणून १९ लाख ३५ हजार ४०० रुपये भरपाई देण्याचा निर्णय दिला गेला. उच्च न्यायालयाने ही रक्कम कमी करून ९ लाख २२ हजार ३३६ रुपये केली.अपघातात ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्या व्यक्तीचं मृत्यूच्या वेळी असलेलं वय ठरवण्यासाठी आधार कार्डवर असलेल्या जन्म तारखेचा उल्लेख ग्राह्य धरला होता. त्यानुसार मृत व्यक्तीचं वय ४७ धरलं होतं आणि उच्च न्यायालयाने भरपाईची रक्कम निम्मी केली होती.
उच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाला आव्हान देत याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. त्यावेळी आधार कार्डवरची जन्मतारीख आणि त्यानुसार ठरवण्यात आलेलं वय चुकीचं असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच आधार कार्डवरची जन्मतारीख वय ठरवण्यासाठी ग्राहा धरली जाणार नाही असेही म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्याचं मृत्यूसमयी वय ४५ होतं.
मध्य प्रदेश न्यायालयानेही हे मान्य केलं आहे की, जेव्हा बय निश्चित करायचं असेल तेव्हा AADHAAR CARDहा जन्माचा पुरावा मानता येणार नाही. मनोज कुमार यादव विरुद्ध मध्य प्रदेश राज्य या खटल्यात न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. नवदीप सिंह विरुद्ध पंजाब राज्य आणि इतर यांनीही आधार कार्ड हे वय निश्चितीसाठी पुरावा ग्राह्य धरता येणार नाही.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील एका प्रकरणात बॉम्बे हायकोर्टाने AADHAAR CARD हे जन्मतारीख ठरवण्यासाठी ग्राह्य धरू नये. तसेच गुजरात न्यायालयाने एका प्रकरणात शाळा सोडल्याचा दाखला हाच जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरावा असे म्हणत AADHAAR CARD हा पुरावा नाही, असा निर्णय दिला आहे. आधार कार्ड हे एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. त्यावर आपल्या जन्मतारखेपासून ते घराच्या पत्त्यापर्यंतचे सगळे तपशील असतात, मात्र, ते कार्ड जन्माचा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
शासकीय कर्मचारी / अधिकारी / शिक्षक वर्ग यांना न्यायलायचे सूचना
AADHAAR CARD : हे जन्मतारखेचा पुरावा नसून वारंवार लोकांना त्रास देणे बंद करावे, जर का आधार कार्ड संबंधित एखादे प्रकरण न्यायालयात आले. तुमच्या नोकरीला धोका निर्माण होईल, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायलायने दिलेले आहे. कारण आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा नाही, फक्त ओढखीचा पुरावा आहे.
लोकांना, शासकीय कर्मचारी / अधिकारी / शिक्षक वर्ग जाणून बुजून त्रास देत आधार कार्ड वरील जन्म तारीख बदलण्याची ताकीद देतात. लोकांचा वेळ, टाइम, पैसा बरबादी याचे कारण बनलेले आहे, मुळात आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा नव्हे असे वारंवार सूचना देखिल उच्च न्यायलायने म्हटले आहे.
Aadhar Card वरून लोन.
सद्याचा या डिजिटल युगात मानवाने सावधान राहणे गरजेचे आहे, Aadhar Card वरून लोन विविध अशा फ्रॉड कंपन्या विकसित झालेले आहे. या कडे लोकं जास्त आकर्षित होतात. आणि Aadhar Card वरून लोन घेऊन मग फसतात आणि कोर्टात, न्यायालय, उच्च न्यायालय येथे धाव घेतात..