भारत सरकारने देशातील पहिली पीकविमा योजना इ.स. १९८५ साली राजीव गांधी पंतप्रधान असताना सुरू केली. तर 'राष्ट्रीय कृषी विमा योजना' (National Agricultural Insurance Scheme) इ.स. १९९९ साली एन.डी.ए. सरकारने लागू केली. भारतात एक देश एक योजना म्हणून नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षणासाठी विमा काढण्यात यावा म्हणून हि योजना सुरु करत शेतकरी शेतात लावलेल्या सर्व पिकांचा समावेश करण्यात आला नव्हता. नंतर काँग्रेस शासनाने काही बदलांसह इ.स. २००४ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना चालू ठेवली होती. आणि सध्या च्या बीजेपी सरकारने देखील सुरूच ठेवलेली आहे.
![]() |
Pradhan Mantri Fasal Bima Yojana 2024
सन २०२४ मध्ये खरीप हंगाम करिता महाराष्ट्र राज्याच्या 36 जिल्ह्यांत पंतप्रधान पीकविमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२४ ही अंतिम मुदत होती. भारत देशातील सर्व शेतकरी यांचे मनोबल उंचावेल म्हणून प्रधानमंत्री यांनी “प्रधानमंत्री पीक विमा योजना" चा लाभ घ्यावा म्हणून सूचना दिल्या आहे. सन २०१६ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली “प्रधानमंत्री फसल बिमा योजना” म्हणून या नवीन योजनेला मंजूरी देण्यात आली होती.भारत सरकारने ' प्रधानमंत्री पीक विमा योजनेस केंद्रीय मंत्रिमंडळाने १३ जानेवारी २०१६ रोजी मंजूरी दिली.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी संपूर्ण देशामध्ये मध्ये एकच विमा कंपनी असणार आहे. असे घोषित केले. प्रधानमंत्री पीक विमा चे इतर खाजगी कंपन्या ह्या 'ऍग्रिकल्चर इंशुरन्स कंपनी ऑफ इंडिया' (Agricultural Insurance Company of India) शी संलग्न करण्यात आले आहे. प्रधानमंत्री पीक विमा केवळ 'उत्पन्नातील घट' साठीच नसून मर्यादित शेतकरी बांधव यांच्या शेतातील पीक काढणी नंतर पिकाचे झालेले नुकसान, नंतर देखील पिक विमा दिला जातो. जसे : बिगरमोसमी पाऊस चक्रीवादळे, भूस्खलन, झाल्यास दिला जाईल.शेतकरी बांधव यांच्या शेतातील पीक आपत्तीं पासूनच्या संरक्षणासाठीही हा पंतप्रधान यांनी विमा उपलब्ध करण्यात येणार आहे असे स्पष्ट पाने म्हटले आहे. तसेच पिक विमा हवा असल्यास एक फॉर्म भरावा. लागेल. नंतर तो कृषी कार्यालय मध्ये जमा करावा. लागेल. नंतर स्थानिक कृषी सहाय्यक शेतात पिकांच्या नुकसानीची स्थिती जाणून घेऊन विम्याच्या रकमेवर हक्क सांगण्याची प्रक्रिया करेल नंतरच पिक विमा दिला जाईल.
प्रधानमंत्री फसल बिमा योजना कधी सुरु झाली.
प्रधानमंत्री पीक विमा योजना देशातील सर्व राज्यांनी निकष पूर्ण करून राबवयाची म्हणून आदेश दिलेले आहे. तरी इ.स. १९८५ साली पंतप्रधानांच्या 'एक राष्ट्र -एक योजना ' या उद्देशाने सद्याचे पंतप्रधान यांनी २०१६ मध्ये “प्रधानमंत्री फसल बिमा योजना” सुरु केली आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनाचे उद्दिष्टे
- पिक नैसर्गिक आपत्ती झाल्यास तेव्हा, विमा संरक्षण होईल
- पिकांना कीटक आणि रोगराई झाल्यास तेव्हा, विमा संरक्षण होईल
- पिक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण व आर्थिक आधार होईल.
- नवीन शेतीपद्धतीचा कृषी क्षेत्राला पतपुरवठा करत राहणे
- आधुनिक शेतीपद्धतीचा स्वीकार करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित होईल.
- अन्नसुरक्षा लाभेल उत्पन्न स्थिर होईल.
- पीक पद्धतीत बदल होईल
- कृषी क्षेत्रात स्पर्धात्मकता येऊन कृषी तंत्राची वाढ होईल
- शेतीमध्ये टिकून राहण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर होईल.
प्रधानमंत्री पीक विमा योजनाचे ठळक वैशिष्ट्ये
- शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अत्यंत कमी ठेवण्यात आलेला प्रिमियम दर
- ९० टक्क्यांपेक्षा जास्त भार शासनाकडून उचलला जाईल.
- अन्नधान्य, तेलबिया, डाळी, इतर पिकांसाठी प्रत्येक हंगामावरील एकच दर दिला जाईल.
- एकाच हंगामासाठी जिल्हावार आता दूर केली जाईल.
- पीकवार दरातील भिन्नता तफावत आता दूर केली आहे.
- अत्यंत कमी प्रिमियम विम्याची संरक्षित रक्कम मिळेल पूर्ण विमा संरक्षण मिळेल
- दावा केलेली रक्कम पूर्ण मिळेल. (कमी होणार नाही.)
- विमा लाभ मिळण्यास पात्र परिस्थिती
- शेतात पाणी साठणे, पूर येणे अशा आपत्तींना स्थानिक संकटात भरपाई किंवा दावा रक्कम दिली जाईल.
- पीक काढण्याच्या दिवसापर्यंत जर आपत्ती, वादळ, अवकाळी पाऊस आल्यास त्या दरम्यान शेतकऱ्यांना दावा रक्कम मिळेल.
किती टक्के विम्याचा हप्ता मिळेल.
सन २०१६ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत आतापर्यंतचा विम्याचा सर्वात कमी हप्ता दिला गेला होता. आता नव्या धोरणात शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन २ ते २.५ टक्के नुसार विम्याचा हप्ता १५ टक्क्यापर्यंत वाढ झालेली आहे. नुकसानीचे मोजमाप मोबाइल फोन तंत्रज्ञानाचा वापर करून केले जाणार आहे. तसेच विमा धारक यांचे ऑनलाईन फॉर्म निर्धारित वेळेत दावे निकाली काढले जातील. ५०% पीकविमा पुरवण्याचे उद्दिष्ट साध्य झाल्यास भारत सरकारच्या एकूण ८००० कोटी रुपये वार्षिक खर्च येण्याची शक्यता आहे. पिकांची नुकसान किती टक्के झालेले आहे. ते पाहणी पाहण्यसाठी ड्रोन, मोबाईल मॅपिंग सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केले जाणार आहे.ऑनलाईन पिक विमा योजना फॉर्म कसा भरावा.
आपल्या जवळील एरियात CSC सेतू केंद्र असेल. त्या ठिकाणी भेट द्या. त्यानंतर त्यांना जाब विचारून प्रधानमंत्री पीक विमा योजनाचा ऑनलाईन फॉर्म भरून देणार. ते सेतू केंद्र चालक https://pmfby.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळ ला ऑनलाईन फॉर्म भरून देणार. सध्या एक रुपयात पिक विमा भरला जातो.पिक विमा योजनासाठी लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- ७/१२ उतारा आणि ८ अ
- वन धारक प्रमाण पत्र असल्यास
- सामाईक क्षेत्र असल्यास स्वयं प्रमाणपत्र
- ऑफलाईन पिक विमा योजना फॉर्म कसा भरावा.
- प्रथम रकान्यात बँक चे नाव, शाखेचा पत्ता, मोबाईल नंबर. लिहा
- अर्जदाराचे भरवायचे संपूर्ण नाव. लिहा
- हंगाम वर्ष : नाव लिहा
- शेतकऱ्याचे नाव लिहा
- लिंग / स्री आहे का पुरुष ते लिहा
- वारसाचे नाव लिहा
- आधार कार्ड नंबर लिहा
- मोबाईल नंबर लिहा
- शेकाऱ्यांचे नाव लिहा
- विमाची प्रभावित माहिती लिहा.
प्रधानमंत्री फसल बीमा योजना स्टेट्स कसे चेक करावे. : PMFBY status by Aadhar Card
प्रधानमंत्री पीक विमा योजना स्टेट्स चेक करण्यसाठी ज्या ७/१२ असलेल्या शेतकरी बांधवांनी ज्या ऑनलाईन सेतू केंद्र वर जाऊन फॉर्म भरला आहे, त्याच ठिकाणी प्रधानमंत्री फसल बीमा योजना स्टेट्स चेक करू शकता. आणि ज्या वन धारक वन हक्क प्रमाणपत्र असलेल्या शेतकरी बांधव यांनी फॉर्म ऑफलाईन भरला असेल. त्यांनी कृषी कार्यालय मध्ये जाऊन प्रधानमंत्री फसल बीमा योजना स्टेट्स चेक करू शकता.You Tube चा माध्यमातून प्रधानमंत्री पीक विमा योजना संपूर्ण माहिती पहा.
निष्कर्ष
प्रधानमंत्री पीक विमा योजना संपूर्ण माहिती Video मी मोफत उपलब्ध करून देत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना Video पाहण्यासाठी आमच्या खालील सोअसिअल मिडीयाला मिळेल. तसेच हि प्रधानमंत्री पीक विमा योजना माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती कडे, हि माहिती शेअर करा. अशाच प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रकारच्या नवनवीन माहिती आम्ही शेअर करत असतो.