नंदुरबार(प्रतिनीधी):- नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील नंदुरबार, नवापूर व शहादा तालुक्यातील अनुसुचित जमातीच्या बचत गटांना बँन्डसंच पुरवठा करणे तसेच लाभार्थ्यांना वर्ष 2024-25 या आर्थिक वर्षात केंद्रवर्ती अर्थसंकल्पित न्यूक्लिअस बजेट योजनेत उत्पन्न वाढीच्या योजनांसाठी 10 सप्टेंबर, 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन नंदुरबार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
ग्रामीण भागातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना उत्पन्न निर्मितीच्या किंवा वाढीच्या योजनेसाठी म्हणजे आदिवासी समुह बचत गटांना बँन्डसंच पुरवठा, खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
तसेच बचत गटांना बॅन्ड संच पुरवठा करण्यात येणार आहे. वर्ष 2024-25 या वर्षाच्या मंजूर आराखड्यातील योजनांसाठी इच्छुक अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून, बचत गटांकडून व अनुसूचित क्षेत्रात येते अलेल्या ग्रामपंचायती यांच्याकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.
नमुना अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार यांच्या कार्यालयात बचत गटांनी बँन्डसंच चा अर्ज 29 ऑगस्ट 2024 ते 10 सप्टेंबर2024 या कालावधीत शनिवार, रविवार व इतर दिवशी शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन वेळेत विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या कालावधीत अनुसुचित जमातीच्या बचत गटांनी बँन्डसंच पुरवठा योजनेसाठी अर्ज भरुन स्विकारले जातील. मुदतीनंतर अर्ज वाटप अथवा स्विकारले जाणार नाही.
अनुसुचित जमातीच्या बचत गटांनी बँन्डसंच पुरवठा योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- जातीचा दाखला,
- शाळा सोडल्याचा दाखला,
- उत्पन्नाचा दाखला,
- आधारकार्ड,
- रेशनकार्ड,
- रहिवासी दाखला,
- लाभार्थ्याचे/गटाचे राष्ट्रीयकृत बँकत असलेल्या पासबुक,
- एक वर्षाच्या आतील उत्पन्नाचा दाखला,
- दारिद्र्य रेषेखालील दाखला,
- मतदानकार्ड/पॅन कार्ड,
- अलीकडील 2 पासपोर्ट आकाराचे फोटो,
- बचत गट/सामुहिक गट यांचे नोंदणी प्रमाणपत्र,
- ग्रामसभा ठराव,
- तसेच यापूर्वी सदर योजनेतून लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र
बचत गटांनी बँन्डसंच पुरवठा या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्जासह कागदपत्रे अर्जासोबत जोडून सादर करावीत, असेही शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये पवार यांनी कळविले आहे.
अर्ज कसा करावा ?
अनुसुचित जमातीच्या बचतगटांना बँन्डसंच पुरवठा साठी खालीलप्रमाणे ऑफलाईन फॉर्म वर माहिती भरा.
- स्वयंसहाय्यता बचत गटांचे नाव लिहा :-
- (इंग्रजीत) नाव लिहा Group Name :-
- अंतर्गत नोंदणीकृत विभागाचे नाव लिहा :-
- बचत गट नोंदणीकृत क्रमांक व दिनांक लिहा :-
- बचत गटचा संपूर्ण पत्ता लिहा :-
- बचत गट किती वर्षापासुन कार्यरत आहे दिवस महिने वर्ष ते नाव लिहा :-
- सर्व बचत गटातील अर्जदारांचे नजीकच्या काळातील पासपोर्ट किंवा गृप फोटो जोडा
- बचत गट :- पुरुष / महिला आहे ते लिहा :-
- बचत गटातील सदस्य संख्या किती आहे लिहा :-
- अध्यक्ष चे नाव आणि मोबाईल नं लिहा :-
- बचत गटातील सदस्य यांचे नाव लिहा :-
- उपाध्यक्षचे नाव आणि मोबाईल नं लिहा :-
- बचत गटातील सदस्याचा वैवाहिक दर्जा लिहा :- विवाहित संख्या :- अ-विवाहित संख्या: एकुण = मो.नं.
- बचत गटातील दारिद्रय रेषेखालील सदस्यांची संख्या :- व त्यांचे दारिद्रय रेषेखालील दाखले. (सोबत जोडावेत)
- बचत गटातील सदस्य यापैकी आहेत काय? संख्या असल्यास तेथे चौकटीत संख्या नमुद करावी व अर्जासोबत प्रमाणपत्र जोडावे.
- बचत गटाने यापूर्वी प्रकल्प कार्यालयामार्फत किंवा इतर विभागामार्फत एखाद्या योजनांचा लाभ घेला आहे काय? असल्यास कोणत्या योजनेचा लाभ घेण्यात आलेला आहे ते लिहा :-
वरीलप्रमाणे अनुसुचित जमातीच्या बचत गटांनी बँन्डसंच पुरवठा योजनेसाठी माहिती लिहा. आणि आपल्या जिल्ह्यातील अर्ज प्रस्ताव स्विकारणे किंवा नाकारणे याचा पुर्ण अधिकार मा. प्रकल्प अधिकारी यांना राहिल व प्रकल्प कार्यालयाने नमुद केलेल्या अथवा भविष्यात काही वाढ झाल्यास सर्व अटी व शर्ती मला मान्य नुसार अर्ज स्विकारले जातील.
Follow Us