Govt 16 File Closed, Gram Panchayat All Application Sample Self Declaration Read Current Govt Decision. : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ अंतर्गत शासकीय 16 दाखले बंद, आता स्वयंघोषणापत्र चालू शासन निर्णय वाचा, लोकसेवा, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपिलीय प्राधिकारी अधिसूचित करण्यात आल्याबाबत निर्गमीत केलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करणेबाबत सूचना दिलेले आहे.
Govt 16 File Closed, Gram Panchayat All Application Sample Self Declaration Gov. Decision : महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग. ग्रामपंचायतचे सर्व अर्ज नमुने
शासन निर्णय क्रमांकः RTS 2018 /प्र.क्र.१४५/आस्था.५ बांधकाम भवन, २५ Marzbaan Rood Fort Mumbai , ४०० ००१ दिनांक : १३ फेब्रुवारी, २०१९.
वाचा: १) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५, दिनांक २८ एप्रिल, २०१५ २) शासन निर्णय क्रमांकः आरटीएस-२०१५/प्र.क्र.३२/पं.रा-५ दिनांक १४ जुलै, २०१५
प्रस्तावना: शासन निर्णय : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश-२०१५ च्या कलम-३ अनुसार अधिसूचित करावयाच्या सेवा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपिलीय प्राधिकारी आणि नियत कालमर्यादा याबाबतची अधिसूचना दिनांक १० जुलै, २०१५ रोजी निर्गमित करण्यात आली आहे.
सदर अधिसूचनेन्वये ग्रामपंचायत पातळीवरील १३ लोकसेवांच्या संदर्भातील पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपिलीय अधिकारी आणि नियत कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अधिसूचित करण्यात आलेल्या १३ सेवा या पात्र व्यक्तींना उपलब्ध करुन देण्याकरीता ऑनलाईन कार्यप्रणाली कार्यान्वित असेल, त्या ठिकाणी सदर सेवा संगणकीकृत प्रतींद्वारेही देण्यात येते व ज्या ठिकाणी ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित नाही,
त्या ठिकाणी सदर सेवा संदर्भिय शासन निर्णयासोबत जोडलेल्या विहित नमुन्यांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येते. सद्यस्थितीत या विभागाने दिनांक १० जुलै, २०१५ च्या अधिसूचनेन्चये अधिसूचित केलेल्या १३ सेवांपैकी १० सेवा महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. यासंदर्भात आढावा घेऊन दिनांक १२.२.२०१९ च्या अधिसूचनेन्वये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत १३ ऐवजी ७ लोकसेवा विहित कालमर्यादेत देण्याचे निश्चित केले आहे.
ग्रामपंचायत चे सर्व अर्ज नमुने शासकीय 16 दाखले बंद चा शासन निर्णय : Govt 16 File Closed, Gram Panchayat All Application Sample Self Declaration Gov. Decision :
या विभागाच्या प्रशासकीय अधिपत्याखाली राज्यातील सर्व ग्रामस्थांसाठीच्या ज्या सेवा महत्वाच्या आहेत अशा लोकसेवांची निश्चिती करण्यात आली आहे. त्यास अनुसरुन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या कलम ३(१) अनुसार अधिसूचित करावयाच्या सेवा.
पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपिलीय प्राधिकारी आणि नियत कालमर्यादा याबाबतची अधिसूचना दिनांक १२.२.२०१९ रोजी निर्गमित करण्यात आली आहे. लोकसेवा हक्क अध्यादेश- २०१५च्या अनुषंगाने अधिसूचित करण्यात आलेल्या सेवांबाबतची अंमलबजावणी करण्याच्यासंदर्भात उक्त दिनांक १४ जुलै, २०१५ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना दिनांक १२.२.२०१९ रोजी निर्गमित केलेल्या अधिसूचने-तील लोकसेवांकरिता ही लागू राहतील.
कोणकोणते ग्रामपंचायत चे सर्व अर्ज नमुने शासकीय 16 दाखले बंद करण्यात आले आहे.
महसूल व वन विभागाकडून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत ग्रामपंचायत चे अर्ज नमुने शासकीय 16 दाखले बंद करण्यात आले ते खालीलप्रमाणे आहे.
(१) विधवा असल्याचा दाखला -
(२) परितक्त्या असल्याच्या दाखला.
(३) विभक्त कुटुंबाचा दाखला,
(४) नोकरी व्यवसायासाठी ना हरकत प्रमाणपत्र,
(५) बेरोजगार प्रमाणपत्र,
(६) हयातीचा दाखला,
(७) शौचालय दाखला,
(८) नळजोडणीसाठी अनुमती प्रमाणपत्र,
(९) चारित्र्याचा दाखला,
(१०) वीजेच्या जोडणीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र,
(११) जिल्हापरिषद फंडातून कृषी साहित्य खरेदी,
(१२) राष्ट्रिय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम,
(१३) बचतगटांना खेळते भागभांडवल बँकेमार्फत कर्ज पुरवठा,
(१४) कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र
(१५) निराधार योजनेसाठी वयाचा दाखला
(१६) रहिवास प्रमाणपत्र
अशा वरील प्रमाणपत्र देण्याच्या सेवा यापुढे बंद करण्यात येत असून यासंदर्भाने ग्रामस्थांकडून सोबत जोडलेल्या नमुन्यातील स्वयंघोषणापत्र स्वीकारण्यात यावे. असे स्पष्ट आदेश दिलेले आहे.
वरील सर्व शासकीय 16 दाखले बंद झालेले आहेत. आता स्वयंघोषणापत्र चालू झालेले आहे. ते हवे असल्यास, आम्ही ( Download ) देत आहोत. त्या साठी तुम्हाला काही चार्जेस लागेल. जर का मोफत हवे असल्यास, आमच्या वॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप ला जॉईन व्हावे लागेल. तेथे तुम्हाला मोफत मिळतील.
ग्रामपंचायत संबंधित सर्व स्वयंघोषणापत्र अर्ज नमुने PDF
ग्रामपंचायतचे अर्ज नमुने शासकीय 16 दाखले बंद चे शासन निर्णय कसा पाहावा.
- सर्वप्रथम गूगल वर जाऊन www.maharashtra.gov.in असे लिहावे.
- त्यानंतर menu मध्ये जाऊन शासकीय निर्णय नावावर क्लिक करावे.
- त्यानंतर बाह्य संकेत स्थळ नावावर क्लिक करावे.
- त्यानंतर खालील सांकेताक क्रमांक लिहा, तारीख लिहा आणि कॅपच्या कोड टाका.
- सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेताक क्रमांक २०१९०२१३१४५०२८७०२० असा आहे.
निष्कर्ष
ग्रामपंचायत चे सर्व अर्ज नमुने शासकीय 16 दाखले बंद, स्वयंघोषणापत्र मोफत उपलब्ध करून देत आहे. हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती कडे, हि माहिती शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आम्ही शेअर करत असतो. म्हणून आम्ही सांगतो कि आमच्या सोअसिअल मिडीयाला जॉईन व्हा.