![]() |
Shop Act Licence Maharashtra
व्यावसायिकाला विविध शासकीय व खाजगी टेंडर / निविदा भरते वेळी व्यवसायच अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र जरुरी असते.त्याच प्रमाणे विविध कंपनीच्या तालुका स्तरावरील एजन्सीज मिळविण्यासाठी व्यवसाय दाखला व कमर्शिअल गाळे, दुकानाचा विमा इ. सेवांचा लाभ घेण्यासाठी शॉप अधिनियम महत्वाचे ठरते. शॉप अधिनियम धारकांनाच GST कर नंबर काढता येतो.what is Shop Act Licence
नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रात व्यवसाय करते वेळी व्यवसाय अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे ( Shop Act Licence) शॉप अधिनियम लायसेन्स होय.कोणत्याही व्यवसायाची कायदेशीर सुरुवात शॉप अधिनियम लायसेन्सने होते. दुकानाच्या नावाने बँकेत खाते उघडण्यासाठी व व्यायसायिक कर्ज प्रकरणे करण्यासाठी शॉप अधिनियम महत्वाचे दाखला ठरतो.Grampanchayat Shop Act Licence
ग्रामपंचायत क्षेत्रात शॉप ॲक्ट अधिनियमाची आवश्यकता नसते परंतु गावाची म्हणजे ग्रामपंचायत ची लोकसंख्या १० हजारपेक्षा जास्त असल्यास शॉप ॲक्ट अधिनियम अंतर्गत Shop Act Licence लागते.Shop Act Licence Benefits : शॉप अॅक्ट लायसन्सचे फायदे
- व्यवसायाला कायदेशीर मान्यता
- वेतन, कामाच्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांचे संरक्षण
- विश्वास आणि विश्वासार्हता निर्माण करण्यास ग्राहकांचा विश्वास
- व्यवसाय बँक खाते उघडणे बँक व्यवहार सोपे करते
- व्यवसाय कर्ज मिळवणे आणि वित्त सोपे करते
- शासकीय कार्यालय यांच्या तपासणी दरम्यान दंडांपासून संरक्षण करते
- व्यवसाय वाढीसाठी विस्तार आणि अतिरिक्त नोंदणीसाठी आवश्यक
- कायदेशीर करारांसाठी आवश्यक
- पुढील नवीन व्यवसाय करण्याकरिता पुरावा
- सुरक्षा नियमांचे पालन, कामगार कायदे सुनिश्चित करते
Shop Act Licence documents list : शॉप अॅक्ट लायसन्ससाठी कागदपत्रे
शाप अधिनियम व्यवसाय दाखला प्राप्त करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहे
- जेथे व्यवसाय सुरू आहे किंवा करावयाच्या आहे त्या जागेच्या ठिकाणी चे लाईट बिल किंवा टेलिफोन बिल
- जागा स्व मालकीची असले तर जागेचा उतारा.
- जागा भाडेतत्त्वावर असल्यास शंभर रुपये स्टॅम्पवर मालकाची संमती पत्र,
- लाईट बिल टेलीफोन बिल नसल्यास संमती पत्रात जागेच्या ठिकाण पूर्वी नोंद असणे आवश्यक.
- आधार कार्ड झेरॉक्स प्रत
- मतदान कार्ड झेरॉक्स प्रत
- पॅन कार्ड झेरॉक्स प्रत
- नूतनीकरण असल्यास ओरिजनल शॉप ॲक्ट लायसन्स
Shop Act Licence online Maharashtra
वरील कागदपत्रांची पूर्तता करून नवजीतच्या महा-ई-सेवा केंद्रात गेल्यास तेथे ऑनलाइन शॉप अधिनियम लायसन्स प्राप्तीसाठी अर्ज करता येतो, त्याच लागणारी व्यवसाय स्वरूपानुसार योग्य ती फी जमा करून व्यवसायचे लायसन्स अथवा नूतनीकरण करून मिळते.Shop Act license Registration Process online in Maharashtra
तुम्हाला aaplesarkar mahaonline gov in असे गुगल मध्ये सर्च करायचे आहे.
aaplesarkar mahaonline gov in म्हणजे आपले सरकारची वेबसाइट ओपन होईल
या वेबसाइटवर आल्यानंतर,
- तुम्हाला वरील फोटो दिसत त्याच प्रमाणे New User अशा नावावर क्लिक करावयाचा आहे,
- सर्वप्रथम स्वतःची नोंदणी करावी लागेल.
- New Registration तुम्ही त्यावर क्लिक करू शकता.
- येथे तुम्हाला नवीन वापरकर्ता हा पर्याय दिसेल.
- तुम्हाला वरील फोटो दिसत त्याच प्रमाणे
- येथे नवीन वापरकर्ता नोंदणी वर क्लिक केल्यानंतर,
- तुम्हाला येथे दोन पर्याय मिळतील,
- मी तुम्हाला पर्याय एक वापरण्यास प्राधान्य देईन
- तुम्हाला वरील फोटो दिसत त्याच प्रमाणे
- ते वापरल्यानंतर,
- येथे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल.
- नंतर मोबाईल नंबर टाकावा लागेल.
- OTP टाकावा लागेल.
- user name बनवा.
- password बनवा
- conform password बनवा
- इंग्रजीत तुमचे पूर्ण नाव लिहा
- मराठीत तुमचे पूर्ण नाव लिहा
- जन्म तारीख टाका
- शेवट वय टाका.
- मी घोषित करतो वर क्लिक करा
- Register वर क्लिक करा करून तुम्हची स्वतःची नोंदणी पूर्ण होईल.
How to get Shop Act License | Shop Act License Maharashtra Online | How to apply for Shop Act License
- स्वत च्या नावाने नोंदणी केल्यानंतर
- user id आणि password टाकावा लागेल
- नंतर कॅप्चा भरावा लागेल आणि तुम्हाला तुमचा जिल्हा इथे निवडावा लागेल.
- निवडल्यानंतर तुम्हाला येथे लॉगिन वर क्लिक करून लॉग इन करावे लागेल.
- लॉग इन केल्यानंतर,
- तुम्हाला उद्योग ऊर्जा आणि कामगार विभाग दिसेल, यावर क्लिक करावे लागेल.
- तुम्हाला विभाग निवडावा लागेल.
- येथे एक पर्याय दिसेल, दुकान आणि स्थापना नोंदणी, त्यावर क्लिक करावे लागेल.
- नंतर विभाग निवडावा लागेल.
- जिल्हा निवडावा लागेल.
- आस्तापानाचे पूर्ण नाव लिहावे लागेल.
- आस्तापानाचे New Register नाव क्लिक करा
- संपूर्ण पत्ता टाका
- मोबाईल नंबर टाका
- आस्तापानाचे तारीख टाका.
- व्यवसायाचे स्वरूप टाका
- किती कामगार कामे करतात ते टाका
- खाली स्क्रोल करून
- फोटो आणि सही अपलोड करा.
- विचारलेले कागदपत्रे टाका.
- शेवटी QR Code ने Payment करा.
- Payment केल्यानंतर पोच मिळेल ती झेरॉक्स करून घ्या.
आम्ही दिलेल्या वरील माहिती नुसार आपण घरी बसून ऑनलाईन aaplesarkar mahaonline gov in सेवा केंद्र मधून Shop Act Licence काढू शकता.
Shop Act Licence fees
- 0 ते 9 पेक्षा कमी कर्मचारी: शुल्क ७९९ आहे
- 9 ते 10 पेक्षा जास्त कर्मचारी: शुल्क २,३९९ आहेShop Act Licence download
Shop Act Licence PDF download
Shop Act Licence Renewal
शॉप ॲक्ट लायसन प्रस्ताव बिनचूक असल्यास किमान नऊ दिवसात शॉप ॲक्ट अधिनियम परवाना प्राप्त होतो सदर दाखला हा दुकानाच्या दर्शनी भागात दिसेल अशा ठिकाणी लावावा शॉप ॲक्ट अधिनियम नुसार परवाना हा दरवर्षी Renewal करावा लागतो, दरवर्षी 15 डिसेंबर पूर्वी नूतनीकरण करणे आवश्यक असते.नुतनीकरण ( Shop Act Licence Renewal )करतेवेळी ओरिजनल परवाना जवळ असावा शॉप अधिनियम परवान्यावर सुट्टीचा दिवसाच्या उल्लेख केलेला असतो हा सुट्टीचा दिवस देणे व्यावसायिकावर बंधनकारक असते आठवड्यातील सुट्टीचा दिवस ठरवण्याचा अधिकार व्यवसायिकाला असतो.