Swadhar Yojana : विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा स्वाधार योजनेच्या अर्जासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
![]() |
www.pmgov.com : शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, आदी आवश्यक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत 2024-25 वर्षासाठी अर्ज करण्यास 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Apply Online Swadhar Yojana
ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन पोर्टलद्वारे दिलेल्या मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर केलेले आहे आणि या प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन प्रणालीद्वारे आपोआप स्वाधार योजनेसाठी वर्ग होणार आहेत, अशा विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही.
सद्यःस्थितीत स्वाधार योजनेचा लाभ घेत असलेले विद्यार्थी तसेच नव्याने स्वाधार योजनेसाठी अर्ज करणारे विद्यार्थी यांना ऑनलाइन अर्ज करताना तांत्रिक अडचणी येत आहेत.. या बाबी विचारात घेता शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक 16 डिसेंबर 2024 पर्यंत वाढविण्यात आलेली होती.
Swadhar Yojana Documents List In Marathi
परंतु, अद्यापही बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केलेले दिसून येत नाही. त्यामुळे पुन्हा काही विद्यार्थी संघटना आणि क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी यांनी मुदतवाढ देणेबाबत मागणी केली आहे. या बाबी विचारात घेता अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत ३१ डिसेंबर पर्यंत वाढविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.