![]() |
रब्बी पिक विमा 2024 अर्ज सुरु झालेला असून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ घाईमध्ये आपल्या शेतातील पिकांचा रब्बी पिक विमा काढायला विसरू नका.
Rabbi Pik Vima : एक रुपयात रब्बी पिक विमा योजनेत सहभागी व्हा तालुका कृषी विभागाचे आवाहन; १५ डिसेंबर २०२४ पर्यंत अंतिम मुदत. असून अधिकृत वेबसाईट https://pmfby.gov.in/ हि आहे.
रब्बी हंगामातील पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण देण्यासाठी राज्यात प्रधानमंत्री पीकविमा योजना ( Pradhan Mantri Fasal Bima Yojana - Crop Insurance ) राबविण्यात येत आहे. रब्बी पिकासाठी एक रुपयात रब्बी पिक विमा योजनेत सहभागी होता येणार आहे.
रब्बी पिक विमा अर्ज भरण्याची अंतिम मुदत काय आहे. Rabbi Pik Vima 2024 Last Date
अर्ज भरण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२४ पर्यंत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी अधिकारी यांनी केले आहे.रब्बी पिक विमा घेण्यास कोण पात्र आहे.
रब्बी पिक विमा योजनेत अनुसूचित क्षेत्रात पीक घेणारे कूळ अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतीसह सर्व शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत. पीकविमा कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारशेतकऱ्यांना योजनेत सहभाग ऐच्छिक असेल. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील रब्बी पिक विमा चा लाभ मिळणार आहे त्या साठी त्यांना पोर्टलवर नोंदणीकृत भाडेकरार अपलोड करावे लागणार आहे. या योजनेंतर्गत विमा कंपनीवर नुकसान भरपाईचे रब्बी पिक विमा हप्त्याच्या १०० टक्क्यांपर्यंत दायित्व राहणार आहे.
यापेक्षा नुकसानभरपाई रब्बी पिक विमा हप्त्याच्या ८० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास विमा कंपनी एकूण २० टक्के रक्कम स्वतःकडे नफा म्हणून ठेवेल व उर्वरित रक्कम राज्य शासनाला परत करेल. या योजनेत रब्बी हंगामातील गहू, हरभरा किंवा ज्वारी या पिकांचा समावेश आहे. प्रधानमंत्री रब्बी पिक विमा योजना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमार्फत राबवली जाणार आहे.
रब्बी पिक विमा हमीपत्र साठी येथे क्लिक करा. Rabbi Pik Vima 2024 Form Pdf
यासाठी सात-बारा, सन २०२४ मध्ये खरीप हंगामात प्रधानमंत्री रब्बी पिक विमा योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२४ आहे. पिक नुकसानाची भरपाई मिळण्यासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे.तालुका कृषी विभागाचे आवाहन आहे.पीक पेरा स्वयंघोषणा साठी येथे क्लिक करा.
तालुक्यात आदिवासी बांधव कोरडवाहू शेती करत असून, केवळ पावसाच्या भरोशावर खरीप हंगामात शेती केली जाते. यावेळी पाऊस, पावसाचा खंड पडल्याने रब्बी हंगामात अजूनही अपेक्षित पाऊस पडलेला नाही. यासाठी एक रुपया रब्बी पिक विमा भरणे आवश्यक आहे. तालुका कृषी अधिकारी यांनी कळवले आहे.हेही वाचा :
How do I check my PMFBY Beneficiary List
Pradhan Mantri Fasal Bima Yojana List
कोणते कागदपत्रे लागणार : कोठे संपर्क करावा?
७/१२ व ८अ उतारा, आदिवासी बांधव यांचा कडील वन पट्टा वन हक्क प्रमाणपत्र, आधारकार्ड व बँक पासबुक झेरॉक्स, रब्बी पिक विमा स्वयंघोषणा पत्र यांचा समावेश आहे. रब्बी पिक विमा भरण्यासाठी व अधिक माहितीकरिता जवळील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तसेच नजीकच्या CSC सेवा केंद्राशी संपर्क साधावा. तालुक्यातील जास्तीत जास्त आदिवासी बांधव शेतकऱ्यांनी रब्बी पिक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.निष्कर्ष
7/12 आणि आदिवासी बांधव यांचा कडील वन पट्टा वन हक्क प्रमाणपत्र, धारकांना सरकार कडून 1 रुपयात रब्बी पिक विमा देत आहे. रब्बी पिक विमा ( Pradhan Mantri Fasal Bima Yojana In Marathi ) माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती कडे हि माहिती शेअर करा. जेणेकरून रब्बी पिक विमा योजनाचा लाभ त्यांना मिळेल.Answer : Link