नवीन जे फॉर्म मिळणेसाठी अर्ज नमुना : New J Form Application Format In Marathi
- प्रती,
- मा. वनपरिक्षेत्र अधिकारी सो
- वनक्षेत्र ( गावाचे नाव लिहा ),
- तालुका ( तालुक्याचे नाव लिहा) जिल्हा ( जिल्हा चे नाव लिहा )
- दिनांक :
- अर्जदार :
- पत्ता :
- मोबाईल नंबर :
- विषय : सन 20____ - ____20 चे वनपट्टा प्रमाणपत्र, नवीन जे फॉर्म मिळणे बाबत
मा. वनपरिक्षेत्र अधिकारी साहेब यांना सादर प्रणाम, उपरोक्त विषयांवरून आपणास विनंती लेखी अर्ज सादर करतो/ करते की, मी श्री / श्रीमती : ----------------------------------------------------------------- माझ्या स्वतःचा नावे / वडिलांच्या नावे / पतीच्या नावे, वन हक्क, वन प्रमाणपत्र मंजूर आहे. वनपट्टा प्रमाणपत्र, धारकांना जे फॉर्म दिलेले आहे. ते मला चालू वर्षाचे पाहिजे आहे. तरी मला नवीन जे फॉर्म मिळावे.
मला जे फॉर्म वर, चालू वर्षी हंगाम सह, घेतलेले पिक स्वतः लागवड केलेले आहे. आमचे क्षेत्र ------------- इतके हेक्टर असून भूमापन क्रमांक ------------- असा आहे, माझा शेतात आता १ ) कापूस २) सोयाबीन ३) मका ४) भुईमुग ५) मुंग ६) उडीद ७) हरभरा ------------- अशे विविध पिक आहे. त्याची नोंद करून अनुसूची जे ( नियम ३० जी ) वनहक्काचे दस्तावेज वर देण्यात यावे. तसेच मला जे फॉर्म हा ७ दिवसात देण्यात यावे. माझा शेतात चालू वर्षी हंगाम सह, घेतलेले पिक आणि स्वतः लागवड केलेले पिक पाहणी साठी माझा शेतात भेट देऊ शकता. सोबत मी वन हक्काचे दस्तावेज, आणि आधार कार्ड सोबत जोडत आहे. हि नम्र विनंती
- आपला विश्वासू
- नाव :
- पत्ता :
- मो. :
जे फॉर्म वर काय काय नमूद असावे.
- जे फॉर्म वर प्रथम जिल्हा चे नाव असावे.
- तालुका नमूद असावे.
- वन परीक्षेत्र नमूद असावे.
- गावाचे नाव नमूद असावे.
- नियत क्षेत्र नमूद असावे.
- जे फॉर्म दिल्याचा दिनांक नमूद असावे.
- वनांचा स्थल ( भूमापन क्रमांक असावा.)
- स्वतः लागवड केल्याचे क्षेत्र नमूद असावे.
- वन हक्क, वन प्रमाणपत्र धारकाचे नाव.
- सोबत तेरा अंकी नंबर नमूद असावे.
- अनुसूची एफ क्रमांक नमूद असावे.
- अनुसूची जे नोंद वहीचा क्रमांक नमूद असावे.
- इतर भार हक्क नमूद असावे.
- पिकांची नोंद नमूद असावे. उदा : १ ) कापूस २) सोयाबीन ३) मका ४) भुईमुग ५) मुंग ६) उडीद ७) हरभरा अशे विविध पिक असे असावे.
नवीन जे फॉर्म मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते : New J Form Application Apply Documents
- अर्ज करणाऱ्याचे आधार कार्ड
- जुना जे फॉर्म झेरॉक्स
- वन दावा, वन हक्क, वन प्रमाणपत्र झेरॉक्स
निष्कर्ष
वन हक्क, वन प्रमाणपत्र आदिवासी बांधवांनो आम्ही वरती नवीन जे फॉर्म मिळणे साठी अर्ज नमुना दिलेला आहे. तो कोऱ्या कागदावर आपल्या हाताने लिहून किंवा आम्ही दिलेला pdf डाऊनलोड करून प्रिंट करू शकता. आणि नवीन जे फॉर्म काढून घेऊ शकता. किंवा आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा तेथे देखील तुम्हाला मिळेल.FAQ
काय आहे जे फॉर्म ?
हा जे फॉर्म फक्त पिक पेरा नोंद साठी आहे. याचा कोणताही दुरुपयोग होत नाही. जसे ७ /१२ असलेले शेतकरी बांधव ऑनलाईन मोबाईल मधून पिक पेरा नोंदणी करतात, त्याच प्रमाणे अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी बांधव यांना ऑफलाईन जे फॉर्म वरून पिक पेरा नोंद वन खात्य मधून दिले जाते.नवीन जे फॉर्म काढण्याचे कारण काय?
शेतकऱ्यांनी नवीन जे फॉर्म दर वर्षी काढावा कारण कि, केंद्र सरकार च्या आणि राज्य सरकारच्या शासकीय योजनेचा लाभासाठी हा जे फॉर्म महत्वाचा झाला आहे.नवीन जे फॉर्म काढण्यासाठी फी किती आहे.?
नवीन जे फॉर्म काढण्यासाठी कोणतीही फी नाही, नवीन जे फॉर्म Range Forest Officer यांच्या कढून मोफत दिला जातो.कोणकोणत्या शासकीय योजनेसाठी जे फॉर्म वापरला जातो?
केंद्र सरकार च्या PM - Kisan योजनेसाठी, राज्य सरकारच्या MAHA DBT वरील शासकीय योजनेसाठी, पिक विमा साठी, सरकार कडून पिक नुकसान भरपाई दिली जाते. तेव्हा या जे फॉर्म चा वापर केला जातो.नवीन जे फॉर्म मिळणेसाठी अर्ज कुठे करावा ?
नवीन जे फॉर्म काढण्यासाठी आपल्या जवळच्या Range Forest Officer यांच्या कार्यालय ला भेट द्या. आणि त्यांना विनंती लेखी अर्ज द्या तुम्हाला ७ दिवसात मिळेल नवीन जे फॉर्म.